शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

Hathras Gangrape : "गुंडाना आणि बलात्कारातील दोषींना पाठीशी घालणारे योगी सरकार बरखास्त करा"

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2020 17:15 IST

हाथरस येथील सामुहिक लैंगिक अत्याचार प्रकरणी ठाण्यातील सामाजिक संघटनांची राष्ट्रपतींसह पंतप्रधानांकडे मागणी

 ठाणे -  उत्तरप्रदेशमध्ये ठिकठिकाणी बलात्कार  गुंडगिरीचे साम्राज्य पसरले आहे. हाथरस येथील सामुहिक लैंगिक अत्याचार प्रकरणात तर उत्तरप्रदेश सरकार आणि पोलीस यंत्रणा बलात्कारातील आरोपींना उघडपणो पाठीशी घालत असल्याचे स्पष्ट होत आहे. पुरावे नष्ट करण्यापासून पिडित कुटंबातील लोकांना धमकावण्यासाठी पोलिस अधिकारी आणि सरकारी यंत्रणा उपयोगात आणली जात आहे.  त्यामुळेच उत्तरप्रदेश सरकार बरखास्त करुन उच्च न्यायालयाच्या निगराणीमध्ये हाथरस प्रकरणाच्या चौकशीची मागणी राष्ट्रपती  रमनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे विविध सामाजिक संघटनांनी एका संयुक्त निवेदनाद्वारे केली आहे. हाथरस घटनेतील पिडितेने वारंवार मागणी करुनही गुन्हा दाखल न करणो, तिची वेळेत वैद्यकीय तपासणी न करणो, योग्य वैद्यकीय उपचार न मिळाल्याने शेवटी या पिडितेचा मृत्यु झाला. परंतू, कुटूंबीयांकडे  मृतदेह सुपूर्द न करता पोलिसांनी रातोरात जबरदस्तीने रातोरात तिचा मृतदेह जाळून टाकला. जिल्हाधिकारी देखिल स्वत: मृत मुलीच्या कुटूंबीयांना धमकी देत असल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. त्यामुळेच उत्तरप्रदेश सरकार बरखास्त करुन उच्च न्यायालयाच्या निगराणीमध्ये हाथरस लैंगिक अत्याचार प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी राष्ट्रपतींसह पंतप्रधानांकडे करण्यात आली आहे.ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांना सोमवारी  जन आंदोलनांचा राष्ट्रीय समन्वयक, श्रमिक जनता संघ, भारतीय महिला फेडरेशन, वाल्मिकी विकास संघ, स्वराज अभियान, आयटक, कोळीवाडा पाडे संवर्धन समिती, व्यसनमुक्ती अभियान आणि संयुक्त कृती व जागृती समिती, जाग, ठाणो यांच्या संयुक्त शिष्टमंडळाने भेटून राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांच्या नावे निवेदन दिले आहे. शिष्टमंडळात कामगार नेते जगदीश खैरालिया, डॉ संजय गोपाळ, निर्मला पवार, सुब्रोतो भट्टाचार्य, डॉ गिरीश साळगावकर, कॉ. लिलेश्वर बन्सोड, बिरपाल भाल, संजय धिंगाण आणि अजय भोसले आदी सहभागी झाले होते. पिडितेच्या कुटूंबीयांना संरक्षण, हा खटला जलदगती ट्रॅकवर चालवून गुन्हेगारांना कठोर शासन करण्याची मागणीही निवेदनात जगदीश खैरलियां यांनी केली आहे. 

टॅग्स :Hathras Gangrapeहाथरस सामूहिक बलात्कारthaneठाणे