कल्याण : क्रेडिटकार्ड तसेच बँक खात्याचा तपशील घेऊन दोघांना आॅनलाइनद्वारे एकूण १५ हजार ६६२ रुपयांना गंडा घातल्याची घटना कल्याणमध्ये घडली आहे. पहिल्या घटनेत खडकपाडा येथे राहणारे ३४ वर्षांचे गृहस्थ दादरहून परळला टॅक्सीने जात असताना राहुल व साहिल वर्माही त्यांच्यासोबत प्रवास करत होते. त्या वेळी दुकलीने त्यांना क्रेडिटकार्डची माहिती विचारली. त्यानंतर, आॅनलाइनद्वारे आठ हजारांची खरेदी केली. याप्रकरणी त्यांनी खडकपाडा पोलिसात तक्रार दिली.दुसऱ्या एका घटनेत एका गृहिणीस नितीन पवार व एका महिलेने मोबाइलवरून संभाषण करून आयसीआयसीआय बँकेतून अधिकारी बोलत असल्याचे सांगून माहिती घेतली. त्यानंतर, आॅनलाइनद्वारे महिलेच्या खात्यातून सात हजार ६६२ रुपयांचा व्यवहार केला. (प्रतिनिधी)
आॅनलाइनद्वारे दोघांना गंडा
By admin | Updated: April 24, 2017 23:53 IST