शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

हर्षदचा मृतदेह सापडला ३६ तासांनंतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2018 03:11 IST

पूर्वेतील नांदिवली नाल्यात मंगळवारी रात्री वाहून गेलेल्या हर्षद रमेश जिमकळ (२४) याचा मृतदेह ३६ तासांच्या अथक प्रयत्नानंतर गुरुवारी सकाळी आयरे गावानजीक बचाव पथकाला मिळाला.

डोंबिवली : पूर्वेतील नांदिवली नाल्यात मंगळवारी रात्री वाहून गेलेल्या हर्षद रमेश जिमकळ (२४) याचा मृतदेह ३६ तासांच्या अथक प्रयत्नानंतर गुरुवारी सकाळी आयरे गावानजीक बचाव पथकाला मिळाला. हर्षदचा शोध घेण्यासाठी नौसैनिक आले होते. मात्र, ते पाण्यात उतरण्यापूर्वीच केडीएमसीच्या अग्निशमन दलाच्या पथकाच्या हाती त्याचा मृतदेह लागला.आयटीआयचे प्रशिक्षण घेणारा हर्षद मंगळवारी रात्री ८ च्या सुमारास क्लासहून घरी परतत होता. त्यावेळी नांदिवली नाल्याजवळ लघुशंकेसाठी तो उभा राहिला होता. त्यावेळी तोल गेल्याने तो नाल्यात पडला आणि पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहू लागला. या घटनेची माहिती प्रत्यक्षदर्शींनी मानपाडा पोलीस आणि पालिकेच्या अग्निशमन विभागाला कळवली.१५० मिमी इतका पाऊस, २५ फुटी नाल्याच्या पाण्याचा प्रचंड प्रवाह, कोपर खाडीपर्यंत जाणाऱ्या पाच किमी नाल्याचा मोठा विस्तार, दोन्ही किनाºयांना असलेली झाडी, भरपूर चिखल यांची पर्वा न करता केडीएमसीचे अग्निशमन दल, महसूल यंत्रणा, ठाणे आपत्ती निवारण दल, खाजगी स्वयंसेवी संस्थेने आपल्या पथकांच्या मदतीने हर्षदचा शोध घेण्यासाठी दिवसरात्र मोहीम राबवली. चार ते पाच वेळा या नाल्याचा कानाकोपरा तपासण्यात आला. अखेर, घटनास्थळापासून दोन किमी अंतरावर आयरे परिसरातील ज्योतीनगर येथे हर्षदचा मृतदेह गुरुवारी सकाळी ८ च्या सुमारास हाती लागला. पोलिसांनी विच्छेनानंतर तो कुटुंबीयांच्या ताब्यात दिला. शिव मंदिर येथील स्मशानभूमीत त्याच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी परिसरातील स्थानिक रहिवासी उपस्थित होते.जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी या संपूर्ण बचाव मोहिमेत स्वत: बारकाईने लक्ष घातले होते. निवासी उपजिल्हाधिकारी शिवाजी पाटील, प्रांताधिकारी प्रसाद उकर्डे, तहसीलदार अमित सानप यांनी स्थानिक यंत्रणा, नौदल, पोलीस, ठाणे पालिकेचे आपत्ती दल यांच्यात योग्य तो समन्वय ठेवून ही मोहीम यशस्वी केली.केडीएमसीचे मुख्य अग्निशमन अधिकारी दिलीप गुंड आणि सुधाकर कुलकर्णी, खाजगी स्वयंसेवी संस्थेचे गजानन काळण, ठाणे आपत्ती निवारण दलाचे झळके यांनी आपल्या पथकांच्या मदतीने ही मोहीम राबवली.कुटुंबीयांना मानसिक धक्काडोंबिवलीतील पूर्वेतील गांधी चौक परिसरातील मुक्ताई इमारतीत तिसºया मजल्यावर हर्षद आई, वडील आणि मोठ्या भावासह राहत होता. त्याच्या बहिणीचे लग्न झाले आहे. हर्षदच्या वडिलांची सहा महिन्यांपूर्वीच बायपास झाली आहे. हर्षदच्या अचानक झालेल्या मृत्यूमुळे कुटुंबीयांना मानसिक धक्का बसला आहे.

टॅग्स :Deathमृत्यूdombivaliडोंबिवली