'हरित जिल्ह्यासाठी बंधारे ठरतील वरदान'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2020 11:43 PM2020-01-02T23:43:10+5:302020-01-02T23:43:13+5:30

एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन : भादाणे बंधाऱ्याची केली पाहणी

'Harbor will be a boon for green district' | 'हरित जिल्ह्यासाठी बंधारे ठरतील वरदान'

'हरित जिल्ह्यासाठी बंधारे ठरतील वरदान'

Next

ठाणे : जिल्हा परिषदेच्या माध्यमातून बांधण्यात येत असलेल्या वनराई बंधाºयामुळे जिल्हा हिरवागार होण्यास मदत होईल. या बंधाऱ्यांमध्ये पाणी उपलब्ध असल्याने शेतकºयांना दुबार पीक घेणे सहज शक्य झाल्याचे प्रतिपादन राज्याचे गृह, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. मुरबाड तालुक्यातील भादाणे गावातील काळू नदीवर बांधलेल्या विस्तीर्ण वनराई बंधाºयाची गुरुवारी प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर ते बोलत होते.

या काळू नदीवर बांधलेल्या या बंधाºयावर सगळ्यांनी जलप्रतिज्ञादेखील घेतली. त्याचबरोबर पवित्र असणाºया गंगा नदीचे जल शिंदे यांच्या हस्ते या बंधाºयात सोडण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष दीपाली पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे, उपाध्यक्ष सुभाष पवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अशोक पाटील, मुरबाड गटविकास अधिकारी विश्वनाथ केळकर यांच्यासह जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य यावेळी उपस्थित होते.

जिल्ह्यात १६०० बंधाºयांचे काम पूर्ण
शासनाचा एकही पैसा खर्च न करता जिल्ह्यात लोकसहभागातून वनराई बंधारे बांधले जात आहेत. आतापर्यंत एक हजार ६०० बंधारे बांधून पूर्ण झाले आहेत. आपल्याला जास्तीतजास्त बंधारे बांधावयाचे आहेत. त्यासाठी लोकांची एकजूट महत्त्वाची आहे. लोकसहभागातून विकासाचे हे उत्तम उदाहरण असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

भादाणे बंधाºयामुळे रब्बी पिकांना फायदा
मुरबाड तालुक्यातील भादाणे येथील हा बंधारा १६ हजार ५०० गोण्यांनी तयार केलेला आहे. बंधाºयावर शेतकरी आजघडीला भाजीपाला लागवड करत आहे. तसेच बंधाºयाच्या जवळच वीटभट्टी सुरू केली आहे. त्यामुळे गावातील ३० ते ४० कुटुंबांचा उदरनिर्वाह होण्यास मदत झाल्याची बाब शिंदे यांच्या निदर्शनात मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे यांच्या संकल्पनेतून २ आॅक्टोबर रोजी बंधाºयाच्या मोहिमेला सुरुवात झाली होती. तेव्हापासून आजतागायत पाचही तालुक्यांत बंधारे बांधले जात आहेत. या बंधाºयांच्या पाण्यामुळे रब्बी हंगामातील पिके घेतली जात आहेत. तसेच जनावरांनादेखील हे पाणी उपयुक्त ठरत आहे.

Web Title: 'Harbor will be a boon for green district'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.