शहरं
Join us  
Trending Stories
1
उज्ज्वल निकम आता यापुढे संतोष देशमुख प्रकरणाची केस लढणार नाहीत? पण कारण काय? चर्चांना उधाण
2
६२ वर्षांच्या सेवेनंतर मिग-२१ लढाऊ विमान निरोप घेणार; १९६५ च्या युद्धात पाकिस्तानला टक्कर दिलेली
3
IPO मध्ये १ लाख गुंतवले, आता त्याचे राहिले फक्त ₹३,२००; कसं मोठ्या आयपीओंनी बनवलं गुंतवणुकदारांना कंगाल
4
"राजीनामा तर द्यावाच लागेल..."; कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंचा नवा व्हिडिओ आला समोर
5
“२५ वर्षे विधानसभेत, राजीनामा देण्यासारखे घडले काय?”; माणिकराव कोकाटे विरोधकांवर बरसले
6
“यालाही हनी ट्रॅप म्हणायचे का?”; फोटोला फोटोने उत्तर, ठाकरे गटाच्या आरोपावर भाजपाचा पलटवार
7
सोने, चांदी, बिटकॉइन स्वस्त होणार? रॉबर्ट कियोसाकी यांचा मोठा दावा; वॉरेन बफेही 'त्या' क्षणाची वाट पाहतायेत?
8
एअर इंडियाच्या बोईंग जेटच्या फ्युएल कंट्रोल स्विचची तपासणी पूर्ण; समोर आली महत्त्वाची माहिती
9
Video - स्टंटगिरी! हिरो बनण्याच्या नादात मर्सिडीज थेट समुद्रात नेली, दलदलीत अडकली अन्..
10
अकोला: शेतातून घरी परत असतानाच काळाची झडप, पित्यासह मुलगा पुरात गेला वाहून; मुलाचा मृतदेह सापडला
11
"राज्याला भिकारी म्हणून त्यांनी कळस गाठलाय"; कोकाटेंच्या राजीनाम्यासाठी सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांना विनंती
12
घटस्फोटीत महिलेशी फेसबुकवर मैत्री, भेटायला बोलावून बलात्कार, अंधेरीतील घटना!
13
"आता हे अचानक 'हशणार, बशणार' हे कुठून आलं?", अभिनेत्रीचा 'पुणे'करांना सवाल
14
Shravan 2025: श्रावणात 'या' राशींवर होणार महादेवाची कृपा; बरसणार सुखाच्या श्रावणसरी!
15
'सभागृहाचं कामकाज संपलं होतं, हे विधान धडधडीत खोटं'; रोहित पवारांनी कोकाटेंचे आणखी दोन व्हिडीओ केले पोस्ट
16
Deep Amavasya 2025: 'या' सोप्या टिप्स कामी येतील, तेलातुपाचे दिवे लख्ख उजळतील!
17
'मी बोलेन तेच...'; राज्यसभेतील 'ते' विधान आणि धनखड यांच्या बैठकीला दांडी, राजीनाम्यानंतर नड्डांनी मौन सोडलं
18
सचिनजींना भेदता आलं नव्हतं 'महाभारत'चं चक्रव्यूह, 'कोण होणार करोडपती'मध्ये दिलेलं चुकीचं उत्तर, पाहा व्हिडीओ
19
कुठे नेऊन ठेवलाय...! डोक्याला फेटा, गळ्यात हार अन् ढोलताशांचा गजर...; विधानभवनात 'राडा' करणाऱ्यांचं जंगी स्वागत
20
मुख्यमंत्री नितीश कुमारांना भारताचे उपराष्ट्रपती बनवा; भाजप आमदाराची मागणी

पावसामुळे हापूस, काजूवर करपा रोगाची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 23:43 IST

वीटभट्टी चालकांमध्येही चिंतेचे वातावरण

ठाणे :  मागील दोन ते तीन दिवसांपासून ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागासह शहरी भागात ढगाळ वातावरण होते. त्यानुसार रविवारी मध्यरात्रीपासून पावसाने हजरी लावली. सोमवारी सकाळीही पावसाची रिपरिप सुरू होती. यामुळे वातावरणात कमालीचा गारवा निर्माण झाला आहे. अचानक आलेल्या पावसामुळे गुरांच्या वैरणीसाठी खळ्यात साठवून ठेवलेला पेंढा भिजला असून हापूस आंबा आणि काजूच्या मोहरावर करपा रोगाचे संकट घोंगावू लागले आहे. याशिवाय वीटभट्टी चालकांमध्येही चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.ठाणे जिल्ह्यात दोन ते तीन दिवसांपूर्वीपासून झालेल्या बदलामुळे सर्वत्र ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. रविवारी मध्यरात्री तसेच सोमवारीही पावसाने आपले बरसणे सुरू ठेवले. त्यामुळे सकाळी कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांचे चांगलेच हाल झाले. कृषी विभागाने पुढील दोन दिवस उत्तर कोकण विभागामध्ये ढगाळ हवामान आणि पर्जन्यवृष्टीची शक्यता वर्तविली आहे. यामुळे वातावरणातील आर्द्रतेमध्ये वाढ होण्याची शक्यता असल्याने विविध पिकांवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. वातावरणातील वाढलेल्या आर्द्रतेमुळे हापूस आंबा आणि काजूच्या पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. त्यावर नियंत्रणासाठी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने शिफारस केल्याप्रमाणे बुरशीनाशकाची फवारणी करणे उपयुक्त होईल. यासाठी थायोफिनेट मिथाईल एक ग्रॅम प्रति लीटर किंवा कार्बेन्डेंझिम एक ग्रॅम प्रति लीटर किंवा प्रोपीनेब दोन ग्रॅम प्रति लीटर किंवा कार्बेन्डेंझिम १२ टक्के अधिक मॅन्कोझेब ६३ टक्के हे मिश्रण एक ग्रॅम प्रति लीटर पाणी यापैकी कोणत्याही एका बुरशीनाशकाची स्टिकर मिसळून फवारणी करावी. तसेच भाजीपाल्यामध्ये केवडा रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असल्याने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून मॅन्कोझेब २.५ ग्राम प्रति लीटर प्रमाणात १० ते १५ दिवसांच्या अंतराने फवारणी करावी, असा सल्ला दिला आहे.आरोग्याची काळजी घेण्याचे डॉक्टरांचे आवाहन आरोग्याच्या दृष्टीने काळजी घेण्यासाठी पिण्याचे पाणी उकळून प्यावे. तसेच कोरोनाबाबत घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन ठाणे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार यांनी केले आहे.ढगाळ वातावरण, मध्येच पडणारा पाऊस यामुळे वातावरणात गारवा पसरला आहे. त्यामुळे प्रकृतीकडे दुर्लक्ष करून नये, असेही खाजगी डॉक्टरांनी सांगितले.