शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सुंदर कामाचे उदघाटन मुख्यमंत्री करीत असल्याचा आनंद; राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांची प्रतिक्रिया

By अजित मांडके | Updated: March 4, 2023 18:07 IST

ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विरुद्ध राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड असा सामना गेल्या काही दिवसंपासून रंगला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे या उपक्रमांतर्गत विविध विकासकामांचे लोकार्पण आणि रस्ते कामांचे भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात येत असताना कळव्यातील कार्यक्रमाला अनुपस्थित असलेले राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया व्यक्त करत 'मला या गोष्टीचा आनंद आहे की, या सुंदर कामाचे उदघाटन मुख्यमंत्री करीत आहेत', असे  म्हटले आहे. 

ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विरुद्ध राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड असा सामना गेल्या काही दिवसंपासून रंगला आहे. असे असतानाच कळव्यातील कार्यक्रमाला अनुपस्थित असलेले राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी समाजमाध्यमांवर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. २०१७ साली मिलिंद पाटील हे विरोधी पक्षनेते असताना कळवा खाडीकिनारी सुशोभिकरण प्रकल्पाच्या संचालक मंडळात असल्याकारणाने कळव्यासाठी हा प्रकल्प मंजूर झाला होता. हे काम बऱ्याच दिवसांपूर्वी पूर्ण झाले होते.

सगळ्या नगरसेवकांनी बैठक घेऊन याचे उदघाटन देखील करण्याचे ठरवले होते. पण, मिलिंद पाटील आजारी असल्याने उदघाटन करता आले नाही. मला या गोष्टीचा आनंद आहे की, या सुंदर कामाचे उदघाटन मुख्यमंत्री करीत आहेत. फक्त जनतेच्या माहितीसाठी की कळव्यातील कामे कशी व्यवस्थित होत आहेत आणि त्याचाच आम्हांला आनंद आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी समाज माध्यमांद्वारे व्यक्त केली आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडEknath Shindeएकनाथ शिंदे