शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

‘त्या’ नराधमांना फाशी द्या!,कल्याणमध्ये काढला निषेध मोर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2018 03:02 IST

धुळे जिल्ह्यातील राईनपाडा येथे घडलेल्या हत्याकांडप्रकरणी नाथपंथी डवरी गोसावी भटके विमुक्त समाजाच्या वतीने बुधवारी कल्याण तहसीलवर भव्य मोर्चा काढण्यात आला होता.

कल्याण : धुळे जिल्ह्यातील राईनपाडा येथे घडलेल्या हत्याकांडप्रकरणी नाथपंथी डवरी गोसावी भटके विमुक्त समाजाच्या वतीने बुधवारी कल्याण तहसीलवर भव्य मोर्चा काढण्यात आला होता. या समाजातील पाच जणांची निर्घृण हत्या केल्याप्रकरणी जीवे मारल्याचे गुन्हे दाखल करून दगडाने ठेचून आणि लोखंडी सळईने मारणाऱ्या त्या नराधमांना फाशीची शिक्षा मिळावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. याप्रकरणी शिष्टमंडळाच्या वतीने नायब तहसीलदार विशाल इंदूलकर यांना निवेदन देण्यात आले.नराधमांना फाशीची शिक्षा द्यावी, त्याचबरोबर गावातील सरपंच, ग्रामसेवक, ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील, तंटामुक्त अध्यक्ष यांच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करावा आणि त्यांनाही फाशीची शिक्षा व्हावी. मृत पावलेल्या पाचही जणांच्या कुटुंबांना प्रत्येकी २५ लाख आणि त्यांच्या मुलांना शासकीय सेवेत नोकरी द्यावी, आदी मागण्या करण्यात आल्या. यामध्ये समाजातील गोंधळी, बहुरूपी, नाथपंथी डवरी गोसावी, वासुदेव, मरिआईवाले, नंदीबैलवाले आदी कलावंतांना सरकारी मानधन दरमहिना पाच हजार देण्यात यावे आणि एसटी जातीमध्ये समावेश करावा. समाजाला अ‍ॅट्रॉसिटी कायद्याचे संरक्षण मिळावे. मुलामुलींना नोकरीत प्राधान्य मिळावे, या प्रमुख मागण्यांसह अन्य मागण्यांचा समावेश होता.कल्याण-मुरबाड रोडवरील शासकीय विश्रामगृह येथून काढण्यात आलेल्या मोर्चाचे आयोजन भटके विमुक्त जाती-जमाती सामाजिक संघटना (कल्याण) यांच्या वतीने करण्यात आले होते. समाजबांधवांनी मोठ्या संख्येने मोर्चाला उपस्थिती लावली होती. छगन शिंदे, बाबुराव जगताप, सुंदर डांगे, गोरखनाथ गोसावी, गणेश शिंदे या समाज प्रतिनिधींच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला.

टॅग्स :thaneठाणे