शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

‘सिग्नलशाळा’ आणि ‘वृद्धाश्रम’ला मदतीचा हात, पुष्कर श्रोत्री, विशाखा सुभेदार यांच्या हस्ते धनादेश प्रदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2019 20:04 IST

ऑन-ग्रिड सोलार सिस्टीम’, ‘क्लासमरूम कंटेनर्स’चे नूतनीकरण करण्यासाठी आर्थिक सहाय्य करण्यात आले.

ठळक मुद्दे‘सिग्नलशाळा’ आणि ‘वृद्धाश्रम’ला मदतीचा हातपुष्कर श्रोत्री, विशाखा सुभेदार यांच्या हस्ते धनादेश प्रदान ऑन-ग्रिड सोलार सिस्टीम’, ‘क्लासमरूम कंटेनर्स’चे नूतनीकरण करण्यासाठी आर्थिक सहाय्य

ठाणे :  सिग्नल वरील वंचित मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणाऱ्या ‘समर्थ भारत व्यासपीठ’ व वृद्धांना मायेची सावली देणाऱ्या ‘श्री अक्कलकोटस्वामी सेवा मंडळ’ या सामाजिक संस्थांच्या कार्याची दखल घेत सन्मान करण्यात आला. व्यावसायिक सामजिक दायित्वच्या (सिएसआर) माध्यमातून एसबीआय लाईफ इन्शुरन्स तर्फे या दोन्ही संस्थांना मदतीचा हात पुढे करत धनादेश सुपूर्द करण्यात आला. 

        यावेळी पर पडलेल्या कार्यक्रमाप्रसंगी  समर्थ भारत व्यासपीठ चे कार्यकारी अधिकारी भटू सावंत, अक्कलकोट सेवा मंडळाचे अध्यक्ष चिंतामणी रहातेकर, मराठी चित्रपट अभिनेते पुष्कर श्रोत्री, अभिनेत्री विशाखा सुभेदार, एसबीआय लाइफ इन्शुरन्सचे अध्यक्ष आनंद पेजावर,एसबीआय लाइफचे प्रेम विद्यार्थी आदी मान्यव कर्मचारी उपस्थित होते. या सहयोगाद्वारे, श्री अक्कलकोटस्वामी सेवा मंडळ येथे एकूण वीजबिलात जवळजवळ ८० टक्के बचत करण्यास मदत करणारी ‘ऑन-ग्रिड सोलार सिस्टीम’ उभारण्यासाठी आणि समर्थ भारत व्यासपीठतर्फे चालवल्या जाणाऱ्या ‘सिग्नल स्कूल’च्या ‘क्लासमरूम कंटेनर्स’चे नूतनीकरण करण्यासाठी आर्थिक सहाय्य करण्यात आले आहे. या उपक्रमाविषयी बोलताना अभिनेते पुष्कर श्रोत्री यांनी या दोन्ही संस्थांच्या सामाजिक कर्यासंबंधी गौरवोद्गार काढले. तसेच या समाजातील वंचित मुले व वृद्ध माय बाप यांना दयेची नाही तर मुख्य प्रवाहात आणण्याची गरज आहे अशी आशही श्रोत्री यांनी व्यक्त केली. यावेळी आनंज पेजावर यांनी  वयस्कर व्यक्ती व रस्त्यावर राहणारी मुले यांना उत्तम जीवन देण्यासाठी श्री अक्कलकोटस्वामी सेवा मंडळ व समर्थ भारत व्यासपीठ यांनी दिलेल्या संधीबद्दल आभार व्यक्त केले.समर्थ भारत

‘सिग्नल शाळा’ ‘समर्थ भारत व्यासपीठ’ने सुरू केलेली नावीन्यपूर्ण संकल्पना असून, तिचे उद्दिष्ट काम करणाऱ्या व रस्त्यावर राहणाऱ्या वंचित व गरजू बालकांना पारंपरिक शिक्षण देणे, हे आहे. याव्यतिरिक्त, हा ट्रस्ट बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीर, इंग्रजी बोलण्याचे विशेष वर्ग, पोषक आहार, समुपदेशन यांचे आयोजन करतो. http://signalshala.in/श्री अक्कलकोटस्वामी सेवा मंडळ:

श्री अक्कलकोटस्वामी सेवा मंडळ 2009 पासून आपल्या ‘अन्नछत्र’मध्ये (जे रोज संध्याकाळी आदिवासी मुलांना मोफक पोषक अन्न देते) आणि ‘वृद्धाश्रम’मध्ये (वृद्धाश्रम) बालके व ज्येष्ठ नागरिक यांना सेवा देत आहे. वृद्धाश्रमामध्ये 60 ते 87 वर्षे वयोगटातील 11 ते 12 ज्येष्ठ नागरिक आहेत. http://swamidhamsamarth.org/index.html

टॅग्स :thaneठाणेSocialसामाजिकPushkar Shrotriपुष्कर श्रोत्री