शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

कल्याणच्या पत्रीपुलाचे बांधकाम लष्कराकडे हस्तांतरित करा; आमदार नरेंद्र पवारांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2019 19:19 IST

कल्याण-डोंबिवली शहरातील वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा अंदाजे १०० वर्षापूर्वीचा पत्रीपूल पाडून नवीन पूल बांधण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे.

कल्याण-डोंबिवली शहरातील वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा अंदाजे १०० वर्षापूर्वीचा पत्रीपूल पाडून नवीन पूल बांधण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. मात्र गेली अनेक महिने कामामध्ये प्रगती जाणवत नाही. वाहतूक वाढल्याने नवीन समांतर पुलावर वाहतूक कोंडी होत असल्याने मोठ्या प्रमाणात अपघात घडत आहेत. प्रशासन गतीने काम करत नसल्याने कल्याणकरांना मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचाही सामना करावा लागत असल्याने आमदार नरेंद्र पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत पत्रीपूलाचे बांधकाम तातडीने लष्कराकडे हस्तांतरीत करण्याची मागणी केली. 

आंबिवली रेल्वे स्थानकावरचा पूल लष्कराने विक्रमी वेळात उभारल्याचे उदाहरण समोर असल्याने पत्रिपुलाचे बांधकामही लष्कराकडे सोपविण्यासंदर्भात आमदार नरेंद्र पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. नुकताच पत्रिपुलावर एका व्यक्तीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू झाला आहे. नवीन पुलाच्या बांधकामाचे भूमिपूजनही काही महिन्यांपूर्वी झाले आहे, मात्र कामात गती येत नसल्याने आमदार पवार यांनी ही मागणी केली आहे. या पूलावरुन नवी मुंबई, पनवेल, अंबरनाथ, उल्हासनगर, डोंबिवली तसेच लांब पल्ल्याच्या वाहनांची रहदारी असते. मात्र जुना पूल तोडल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे याचा फटका केवळ कल्याण – डोंबिवली नागरिकांनाच बसत नाही तर रुग्णवाहिकांनाही सहन करावा लागत आहे.    

यासंदर्भात पत्रिपुलाचे बांधकाम लष्कराकडे सोपविण्यासाठी तातडीने संबंधित विभागासा आदेश देऊन नागरिकांची वाहतूक कोंडीतून सुटका करावी अशीही मागणी आमदार नरेंद्र पवार यांनी यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका