शहरं
Join us  
Trending Stories
1
जागरूक हो मतदारराजा; महाराष्ट्रासह १० राज्यांतील ९६ जागांसाठी आज होणार मतदान
2
बाळासाहेबांवर अन्याय करणाऱ्यांना सोबत कसे घेतले? राज ठाकरे, ठाण्यातील लोंढ्यांबाबत चिंता
3
पंतप्रधानांची निवड तुम्ही संगीत खुर्चीतून करणार का? उपमुख्यमंत्री फडणवीसांचा विरोधकांना सवाल
4
लोकशाही न मानणाऱ्या नरेंद्र मोदींची पावले हुकूमशाहीकडे; शरद पवारांची टीका
5
मूल दुसऱ्याचे पण आपल्याला हवे, यांना सगळे रेडीमेड पाहिजे; उद्धव ठाकरेंची भाजपवर कडाडून टीका
6
ही लोकसभेची निवडणूक भाजप विरुद्ध जनता अशी झालेली आहे: प्रकाश आंबेडकर
7
“यापुढे विधानसभा, लोकसभेची निवडणूक लढविणार नाही, राजकीय संन्यास…”: एकनाथ खडसे
8
भाजपाने उद्योग, नोकऱ्या गुजरातला पळविल्या, उद्या मंत्रालयही पाठवले जाईल: आदित्य ठाकरे
9
सत्तेच्या लालसेपोटी उद्धव ठाकरे रामाला विरोध करणाऱ्यांबरोबर; पुष्करसिंह धामी यांची टीका
10
४ जूनला भाजपा जाऊन इंडिया आघाडीचे सरकार येईल: शशी थरूर, देशभरात हवा बदलल्याचा दावा
11
मुंबईत प्रचाराचा सुपरसंडे! मतदानाआधीचा शेवटचा रविवार; सभांमुळे वातावरण तापले
12
चौथ्या टप्प्यातही नात्यांची कसोटी; विखे, गावित, खडसे, मुंडे यांची प्रतिष्ठा पणाला
13
पोट भरण्याचे अन् विजेचे वांदे; महागाईविरोधात ‘पीओके’ पेटले
14
पाटण्यात 'मोदी वादळ', पंतप्रधानांच्या रोड शोला 3.5 किलोमीटरपर्यंत प्रचंड गर्दी
15
RCB ने प्ले ऑफच्या आशा कायम राखल्या, DC च्या अडचणी वाढल्या; विराट-अनुष्का खूश 
16
"...तर इस्रायल दुसऱ्याच दिवशी गाझावरील हल्ले थांबवेल"! पण हमासला बायडेन यांची एवढी एक गोष्ट ऐकावी लागेल
17
चिखलीत व्यावसायिक स्पर्धेतून गोळीबार, एक जण गंभीर जखमी 
18
पुण्यात रवींद्र धंगेकराचं पोलीस ठाण्यातच ठिय्या आंदोलन; वाचा नेमकं काय घडलं?
19
निवडणूक बंदोबस्तासाठी आलेल्या अमरावतीच्या होमगार्डचा मृत्यू
20
२२ वर्षीय फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, विराट कोहली पाहा किती खूश झाला; Video 

रहिवाशाच्या मृत्यूनंतर इमारतीवर हातोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 09, 2019 12:44 AM

अखेर सोडली घरे : हक्क कायम राहण्याकरिता दिले भोगवटा प्रमाणपत्र

डोंबिवली : पश्चिमेकडील महात्मा फुले रस्त्यावरील ४० वर्षे जुन्या अतिधोकादायक दोन मजली गोडसे इमारतीवर गुरुवारी महापालिकेने हातोडा घातला. बुधवारी दुसऱ्या मजल्यावरील घरामध्ये स्लॅब कोसळून विकास फडके या रहिवाशाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी दखल घेत इमारत तातडीने रिकामी करून सगळ्यांचे हक्क अबाधित राहण्यासाठी महापालिकेने भोगवटा प्रमाणपत्र देण्याचे आदेश कार्यकारी अभियंता सुनील जोशी यांना दिले.जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ह’ प्रभागक्षेत्र अधिकारी ज्ञानेश्वर कंखरे यांनी गुरुवारी सकाळपासून दुपारपर्यंत गाळेधारक, भाडेकरू यांना भोगवटा प्रमाणपत्र देऊन जागा खाली करण्याचे आदेश दिले होते. दुपारी अडीचनंतर इमारत मोकळी केल्यानंतर तातडीने पाडण्यास सुरुवात करण्यात आली. पश्चिमेकडील महात्मा फुले रस्ता, गांधी रस्ता हे दोन्ही प्रचंड वर्दळीचे रस्ते या इमारतीलगत येतात. त्यामुळे त्या ठिकाणी पोकलेन, जेसीबी आणून कारवाई करण्यात अडथळे येत आहेत. कोणाचेही नुकसान होऊ नये, अपघात होऊ नये, या उद्देशाने गर्दीची वेळ टाळून कारवाई केली जाणार असल्याने पुढील काही दिवस ही कारवाई सुरू राहणार आहे. महापालिकेने वेळोवेळी रहिवाशांना इमारत अतिधोकादायक असल्याबाबत नोटिसा दिल्याची माहिती स्थानिक नगरसेवक शैलेश धात्रक यांनी दिली.दरम्यान, बुधवारच्या दुर्घटनेत मरण पावलेले रहिवासी फडके यांच्या पार्थिवावर बुधवारी रात्रीच त्यांच्या कुटुंबीयांनी अंत्यसंस्कार केले.गाळेधारक अगोदर इमारतीमधून बाहेर पडायला तयार नव्हते. परंतु, इमारत जीर्ण झाली असल्याने १८ जणांना नोटिसा देत तातडीने जागा रिकामी करण्यास सांगितले. तसेच कागदपत्रांची पूर्तता करून भोगवटा प्रमाणपत्र दिले. त्यानंतर, सगळ्यांनी सामान काढून जागा रिकामी केल्यावर दुसरा मजला पाडण्याचे काम सुरू झाले आहे. - ज्ञानेश्वर कंखरे,प्रभागक्षेत्र अधिकारी, ‘ह’ प्रभाग