शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
2
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
3
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
4
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
5
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
6
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
7
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
8
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
9
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
10
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
11
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
12
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
13
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
14
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
15
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
16
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
17
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
18
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
19
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
20
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका

हिंदी भाषिक भवन उभारणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2017 02:35 IST

मराठी माणसाच्या हिताची भाषा करणाºया शिवसेनेने मीरा-भार्इंदरमधील मतदारांना आकर्षित करण्याकरिता मराठीबरोबर हिंदी भाषेत आपला वचननामा

ठाणे : मराठी माणसाच्या हिताची भाषा करणाºया शिवसेनेने मीरा-भार्इंदरमधील मतदारांना आकर्षित करण्याकरिता मराठीबरोबर हिंदी भाषेत आपला वचननामा तर प्रकाशित केलाच, पण आगरी-कोळी भवनाबरोबर हिंदी भाषिक भवनाची उभारणी करण्याचेही आश्वासन दिले आहे.शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी १५ वर्षांपूर्वी मुंबईतील वाढता हिंदी भाषिक माणूस जोडण्याकरिता ‘मी मुंबईकर’ अभियान राबवले होते. १५ वर्षांपेक्षा जास्त काळ मुंबईत वास्तव्य करणाºया हिंदी भाषिकांना सोबत घेण्याचा उद्धव यांचा प्रयत्न राज ठाकरे यांच्या आंदोलनामुळे उधळला गेला. मात्र, मध्येमध्ये शिवसेना मनसेच्या धास्तीमुळे कडवी मराठीची भूमिका घेते. मात्र, मीरा-भार्इंदरकरिता शिवसेनेने मराठीमायबरोबर हिंदी मावशीलाही आपलेसे केले आहे.मीरा-भार्इंदरसाठी मेट्रो, क्लस्टर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक भवन, बाळासाहेब ठाकरे कलादालन, आगरी-कोळी भवन व हिंदी भाषिक भवन, आदिवासी विद्यार्थी वसतिगृह, नवघर-कनकिया आणि घोडबंदर चौपाटी, घोडबंदर किल्ला परिसरात शिवसृष्टी, नाट्यगृह, आरमार केंद्र, रोरोसेवा, कचरा व्यवस्थापन, युवक कल्याण व शिक्षण अशा एक नाही तर अनेक योजनांचा शिवसेनेच्या वचननाम्यात समावेश आहे. आदिवासी, कोळी, मागासवर्गीय समाजाला आपलेसे करण्याचा प्रयत्न शिवसेनेने या वचननाम्याच्या माध्यमातून केला आहे. शिवाय, सध्या सुरू असलेल्या तर काही पूर्णत्वास येत असलेल्या कामांचा उल्लेख शिवसेनेने आवर्जून केला आहे. परंतु, हा वचननामा मीरा-भार्इंदरमध्ये प्रसिद्ध न करता ठाण्यात प्रसिद्ध करण्यामागचे कारण मात्र गुलदस्त्यातच राहिले आहे. शनिवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते विविध प्रकल्पांचे भूमिपूजन तसेच लोकार्पण करण्यात आले. या वेळी हायलॅण्ड पार्क येथील शिवसेनेचे नगरसेवक संजय भोईर यांच्या कार्यालयात ठाकरे यांच्या हस्ते या वचननाम्याचे प्रकाशन करण्यात आले.मीरा-भार्इंदरमधील धोकादायक इमारतींसाठी क्लस्टर योजना मंजूर करून घेऊ. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक भवनाच्या कामाला सुरुवात होणार असून बाळासाहेब ठाकरे कलादालन उभारण्यासाठी पालिकेने २५ कोटींची तरतूद केल्याचे नमूद केले. आरमार केंद्र आणि गं्रथालय, तरणतलाव व स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आदींचा उल्लेखही करण्यात आला आहे. परंतु, यातील अनेक कामे अंतिम टप्प्यात असून काही कामे मार्गी लागण्याच्या प्रतीक्षेत, तर काही कामे प्रस्तावित करण्यात आली असून अशा काही जुन्याच बाबींचा उल्लेख शिवसेनेने आपल्या वचननाम्यात केला आहे. सर्वप्रथम शिवसेनेचाच वचननामा प्रसिद्ध झाला.

ठळक वैशिष्ट्ये...मूलभूत सोयीसुविधानागरी सुविधा - इको फ्रेण्डली स्मशानभूमी, गॅस व विद्युत शवदाहिनी, विरंगुळा केंद्र, ज्येष्ठ नागरिक भवन, अग्निशमन दलासाठी अद्ययावत सामग्री, पासपोर्ट आॅफिस, रेल्वे स्थानकांवर सरकते जिने, इको फ्रेण्डली टॉयलेट, मोफत वायफाय, दहीसर टोलनाक्यापासून मुक्तता, सुसज्ज अद्ययावत परिवहनसेवा, सीसीटीव्हींचे जाळे, पार्किंग झोन, फेरीवाल्यांसाठी मार्केट.युवक कल्याण व शिक्षणपायाभूत सुविधांनी सुसज्य शाळा, ग्रंथालये व लायब्ररी, दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी सराव परीक्षा, व्हर्च्युअल क्लासरूमद्वारे तज्ज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन, करिअर मार्गदर्शन शिबिर, अभ्यास केंद्रे तसेच स्टडी सेंटर.पर्यावरणाचा समतोलदरवर्षी १ लाख वृक्षलागवड, विविध संकल्पनांवर आधारित थीम गार्डन्सचे निर्माण, बटरफ्लाय गार्डनची संकल्पना, खारफुटी संरक्षण व जतन, आॅक्सिजन पार्कची उभारणी, रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प.महिला व बालकल्याणअक्षयकुमारच्या माध्यमातून सेल्फ डिफेन्स अ‍ॅकॅडमी, महिला बचत गटाची निर्मिती, महिला व मुलींसाठी नॅपकिन मशिन्स.आरोग्याच्या सोयीसुविधाकर्करोग निदान व रेडिएशन सेंटर, कार्डियाक रुग्णवाहिकांची संख्या वाढवणार, डायलेसीस सेंटर, हेल्थ क्लब, प्रभाग क्लिनिक तसेच छोट्या दवाखान्यांची निर्मिती. माझे मीरा-भार्इंदर, स्मार्ट मीरा-भार्इंदर पालिकेत ई-गव्हर्नन्स, पेपरलेस कारभार, आॅनलाइन परवाने, स्मार्ट अ‍ॅप, आॅनलाइन बांधकाम परवानेक्रीडा व सांस्कृतिकक्रीडासंकुलाची उभारणी, ओपन जिम, मोकळ्या परिसरात जॉगिंग ट्रॅकची बांधणी, जिम्नॅस्टिक सेंटर, एम्पी थिएटर, फुटबॉल व क्रिकेट प्रशिक्षणकचरा व्यवस्थापनअद्ययावत घंटागाड्या प्रकल्प सुरू करणार, घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प, सांडपाणी, कचराकुंड्या, उत्तन डम्पिंगचे न्यायालयाच्या आदेशानुसार कचºयाचे व्यवस्थापनपरिवहन व रस्ते सुरक्षापरिवहनच्या ताफ्यात नवीन बसेस, बसस्टॉप व नवीन बसस्थानक, एलिव्हेटेड उड्डाणपूल, सब वे, फुटओव्हर ब्रिज, रस्त्यांचे काँक्रिटीकरण आदींचा यात समावेश करण्यात आला आहे.दहीसरचा टोल बंद करणारठाणे महापालिकेच्या हद्दीबाहेर असलेल्या मुलुंडजवळील टोल बंद करण्याचे आश्वासन यापूर्वी शिवसेनेने आपल्या वचननाम्यात दिले होते. परंतु, अद्यापही हा टोल काही बंद झालेला नाही. असे असताना आता निवडणुकीवर डोळा ठेवून पुन्हा दहीसर टोलनाक्यापासून मुक्तता देण्याचे आश्वासन शिवसेनेने आपल्या वचननाम्यात दिले आहे.