शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात बंदी तरी ठाण्यात सहज मिळतो गुटखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2020 01:31 IST

वर्षभरात १२ कोटी २२ लाखांचा गुटखा जप्त : सिल्वासामार्गे भिवंडीत येतो गुटखा

जितेंद्र कालेकरठाणे : राज्यात  राज्यात सर्वत्र गुटखा, सुगंधित पानमसाला तसेच सुगंधित तंबाखू आणि चांदीचा वर्ख असलेल्या सुपारीला बंदी आहे. तरीही, ठाणे शहरासह जिल्हाभर गुटखा आणि पानमसाला चोरी चोरी चुपके चुपके विकला जात असल्याची बाब ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीत समोर आली. अन्न व औषध प्रशासन विभागानेही गेल्या वर्षभरात १२ कोटींचा माल जप्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली. ठाणे शहरात येणाऱ्या गुटख्याबाबतची पडताळणी केली असता यात अनेक बाबी समोर आल्या.

ठाणे अन्न व औषध प्रशासनाने जानेवारी ते १५ नोव्हेंबर २०२० या कालावधीमध्ये जिल्हाभर पोलिसांच्या माहितीवरून १६ तसेच प्रशासनाच्या ४७ अशा ६३ धाडी टाकल्या. यात १२ कोटी २२ लाख ४१ हजारांचा गुटखा आणि सुगंधित तंबाखू जप्त केली. ५१ गुन्हे दाखल झाले असून ४७ दुकाने सील केली, तर २७ वाहने जप्त केली आहेत. यात जप्त केलेल्या वाहनांचा पुढे लिलाव केला जातो.

जानेवारी ते  १५ नोव्हेंबरपर्यंत  झालेल्या कारवाया

ठाणे  - ०४ऐरोली - 02नवी मुंबई  - 01भिवंडी - 06कल्याण - 19

उ.नगर - 04भाईंदर  - 10एकूण - 63

१० ते २५ रुपये दरप्रस्तुत प्रतिनिधीने खोपट, राबोडी, मुंब्रा आणि वागळे इस्टेट येथील पानटपऱ्यांवर गुटख्याची मागणी केली. तिथे गुटखा तसेच त्यासोबत तंबाखूची छोटी पुडीही देण्यात आली. यामध्ये लहान पुडी १० तर मोठी पुडी २५ रुपयांमध्ये उपलब्ध होती.   

जिल्ह्यात गुजरातमधून गुटखागुजरातच्या वापी तसेच सीमेवरील सिल्वासा येथून ठाणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात हा गुटखा येतो. भिवंडीतील दापोडे गावात ट्रेलरमधून तो उतरविण्यात येतो. तिथून तो छोट्या टेम्पोमधून जिल्हाभरातील दुकानांमध्ये वितरीत केला जातो. एखाद्या टपरीवर गेल्यावर ग्राहकाची खात्री झाल्यावर हा टपरीवाला टपरीतूनच एका ठरावीक भागातून गुटखा काढून देत असल्याचे आढळले.

व्यसनाधीनता हे एक गुटखा उपलब्ध होण्याचे कारण आहे. संपूर्ण जिल्हाभर गेल्या वर्षभरात ६३ धाडी टाकल्या. यात ४७ दुकाने सील केली असून १२ कोटी २२ लाख ४१ हजारांचा गुटखा जप्त केला आहे.    -सुरेश देशमुख, सहआयुक्त,     अन्न व औषध प्रशासन विभाग, ठाणे व औषध प्रशास अधिकारी

गुटखा खाल्ल्याने तोंडाचा कर्करोग होतो. जबडा, जीभ काढण्यासारख्या मोठ्या शस्त्रक्रिया कराव्या लागतात. यासाठी येणारा खर्चही लाखोंच्या घरातला आहे. तरीही, कालांतराने मृत्यू ओढवतो. - डॉ. कैलास पवार,  जिल्हा शल्यचिकित्सक, ठाणे

स्थानक परिसरात विक्रीकळवा, मुंब्रा, कौसा रशीद कम्पाउंड, शीळफाटा, डायघर, कापूरबावडी, महागिरी मार्केट, कासारवडवली, वागळे इस्टेट, इंदिरानगर येथील पानटपरी, किराणा दुकाने, रेल्वे व एसटीस्थानक परिसरातही गुटखा आणि सुगंधित तंबाखू सहज उपलब्ध होते.

सहा कोटींचा गुटखा नष्टठाणे जिल्ह्यात टाकलेल्या ८० धाडींतील सुमारे सहा कोटी रुपयांचा गुटखा, पानमसाला आणि तंबाखूजन्य पदार्थ अलीकडेच शास्त्रोक्त पद्धतीने नष्ट केले आहे. हा गुटखा सुमारे ८० टन असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभाागाने दिली.

 

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारी