शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

मराठमोळ्या डोंबिवलीत गुजराथी तितुका मेळवावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2020 01:11 IST

डोंबिवलीतील एका सोसायटीच्या मित्र मंडळाने आयोजित केलेले अंडरआर्म ओपन क्रिकेटचे सामने राजकीय वर्तुळात वेगळ्याच कारणाने चर्चेला आले आहेत.

डोंबिवली : डोंबिवलीतील एका सोसायटीच्या मित्र मंडळाने आयोजित केलेले अंडरआर्म ओपन क्रिकेटचे सामने राजकीय वर्तुळात वेगळ्याच कारणाने चर्चेला आले आहेत. या क्रिकेट स्पर्धेचा भाजपशी काही संबंध नसल्याचे सांगण्यात येत असले तरी, येथे नमो रामो ट्रॉफी विजेत्या संघाला दिली जाणार आहे. या कार्यक्रमास भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांना पाचारण करण्यात आले असून, विशेष म्हणजे विशिष्ट समाजाच्या खेळाडूंनाच येथे प्रवेश दिला जाणार आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून मराठमोळ््या डोंबिवलीत ‘गुजराथी तितुका मेळवावा’चा प्रयत्न आगामी महापालिका निवडणुकीपूर्वी सुरु झाल्याची चर्चा शिवसेनेत आहे.युवा आशापूरा मित्र मंडळ अर्थात वायएएमएम ग्रुपतर्फे अंडरआर्म ओपन क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्याची घोषणा करण्यात आली आहे. त्याची जाहिरात सोशल मिडीयावर झळकली आहे. या सामन्यांमध्ये सोसायटीतील केवळ गुजराथी, राजस्थानी आणि कच्छी समाजाचे क्रिकेटपटुच सहभागी होऊ शकतील, असे या जाहीरातीत म्हटले आहे. या सामन्यांमध्ये अन्य भाषिक खेळाडुंना मज्जाव करण्यात आला आहे. ही स्पर्धा एका सोसायटीपुरती मर्यादीत असल्याने अन्य भाषिकांना मज्जाव करण्यात आला आहे. त्यात अन्य भाषिकांचा द्वेष करण्याचा उद्देश मुळीच नाही. स्पर्धा कोठे आणि केव्हा होणार आहे, हे अद्याप निश्चित नसल्याचे या मित्र मंडळातील एका सदस्याने सांगितले. मित्र मंडळाचे खुलासा अशा प्रकारचा असला तरी, महापालिकेच्या आगामी निवडणुका पाहता भाजपच्या आमदाराला त्याठिकाणी पाचारण करण्याची जाहिरात आधीच करणे, तसेच ट्रॉफीचे नाव नमो रामो ठेवणे, हे सगळे भाजपकडे झुकणारे आहे.महाविकास आघाडीच्या समीकरणानंतर कल्याण डोंबिवलीतही शिवसेना-भाजपची फारकत झाली, त्याचाच परिमाण म्हणून भाजपला आता गुजराथी, राजस्थानी, कच्छी वोट बँक आपलीशी वाटू लागली आहे. डोंबिवलीत या मतदारांची संख्या ८० हजाराच्या जवळपास आहे. लोकसभा व विधानसभा निवडणुकीत या मतदारांनी यापूर्वीही भाजपला मतदान केले आहे. महापालिका निवडणुकीत मराठी मते ही शिवसेना व मनसेत विभागाली जाणार आहेत. हे विभाजन पाहता भाजपने गुजराथी तितुका मेळवावा या उद्देशाने या स्पर्धा आयोजित केल्याचे स्पष्ट होत आहे.>याबाबत शिवसेना नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी म्हणाले की, अशा प्रकारच्या स्पर्धा आयोजित करुन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. डोंबिवलीने शहराने गुजराथी, कच्छ आणि राजस्थानी समाजाला समावून घेतले आहे. त्यांनी अन्य समाजांना मज्जाव करु नये. सर्वांसाठी स्पर्धा खुली ठेवावी.>मनसेचे गटनेते मंदार हळबे यांनी सांगितले की, सांघिक खेळातून एकसंघ होण्याची प्रेरणा मिळते. त्यास प्रांतवादाचा रंग देणे योग्य नाही. ही दुर्दैवी बाब आहे. यात आयोजकांनी सुधारणा करावी. आमदार रवींद्र चव्हाण यांनी आयोजक मित्रमंडळाचा भाजपशी संबंध नसल्याचे स्पष्ट केले. आमदार या नात्याने मला कार्यक्रमास बोलावल्याचे ते म्हणाले.दरवर्षी हे मंडळ अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित करते. तिथे आमदार या नात्याने मी उपस्थित राहतो. त्यात मतांचे राजकारण अथवा महापालिकेच्या निवडणुकीचा संबंध नाही. एक चांगला कार्यक्रम होऊ घातला असताना त्याला राजकीय रंग देणे योग्य नाही, असे चव्हाण म्हणाले.