शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

पालकमंत्र्यांनी साधला अचूक ‘निशाणा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2017 00:48 IST

गेली कित्येक वर्षे पडीक असलेल्या अंबरनाथमधील शूटिंग रेंज पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न पालिकेने सुरू केला आहे. या शूटिंग रेंजचे भूमिपूजन पालकमंत्री एकनाथ शिंदे

अंबरनाथ : गेली कित्येक वर्षे पडीक असलेल्या अंबरनाथमधील शूटिंग रेंज पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न पालिकेने सुरू केला आहे. या शूटिंग रेंजचे भूमिपूजन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शुक्रवारी झाले. या वेळी रायफलचा वापर करून पालकमंत्र्यांनी अचूक निशाणा साधला.अंबरनाथ विम्कोनाका पसिसरात अंबरनाथ पालिकेचे शूटिंग रेंज होते. १९९८ पासून ते बंद होते. या शूटिंग रेंजचा वापर होत नसल्याने ही जागा पडीक होती. या ठिकाणी पुन्हा रेंज सुरू करण्यासाठी सुचिता देसाई यांनी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याकडे पाठपुरावा केला होता. अखेर, पालिकेने सव्वा कोटीचा प्रकल्प आराखडा तयार करत या कामाला मंजुरी दिली.या शूटिंग रेंजच्या जागेची स्वच्छता करून त्या ठिकाणी नव्याने शूटिंग रेंज सुरू करण्यात येणार आहे. अंबरनाथमधील राजकीय नेते विकासकामांसाठी एकत्रित कसे येतात, हे पाहण्यासाठी इतर राजकीय मंडळींनी अंबरनाथमध्ये यावे. विकासाच्या मुद्यावर अंबरनाथकर एकत्रित येतात, ही चांगली बाब आहे. यापुढेही वेगाने शहरातील प्रकल्प पूर्ण करण्याचे आवाहन शिंदे यांनी केले. अंबरनाथमध्ये जे उपक्रम सुरू आहेत, त्यामुळे हे शहर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर म्हणून पुढे येत आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. खासदार शिंदे यांच्या पुढकारातून हा प्रकल्प मूर्त स्वरूप घेत असून येत्या १० महिन्यांत ते काम पूर्ण होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.शूटिंग रेंजसोबत नेताजी मैदानाचेही भूमिपूजन शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. या मैदानाचे सपाटीकरण करून लवकरच त्या मैदानाचेही काम सुरू करण्यात येणार असल्याचे खासदार डॉ. शिंदे यांनी सांगितले.