शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

कुष्ठरोग रुग्णालयाच्या बांधकामास ‘जीएसटी’ बाधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2017 03:48 IST

कुष्ठरुग्णांकरिता केडीएमसीकडून उभारण्यात येणा-या पहिल्यावहिल्या रुग्णालयाच्या कामाला वस्तू व सेवाकराचा (जीएसटी) फटका बसला आहे.

कल्याण : कुष्ठरुग्णांकरिता केडीएमसीकडून उभारण्यात येणा-या पहिल्यावहिल्या रुग्णालयाच्या कामाला वस्तू व सेवाकराचा (जीएसटी) फटका बसला आहे. रुग्णालयाची निविदा मंजूर होऊनही प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली नसल्याने कुष्ठरुग्णांची परवड सुरु आहे.जीएसटी लागू झाल्याने मंजूर झालेल्या निविदांच्या फायली आयुक्त पी. वेलरासू यांनी माघारी मागितल्या होत्या. यात रुग्णालयाच्या उभारणीच्या कामाच्या फायलींचाही समावेश आहे. कुष्ठरुग्णांच्या हनुमाननगर वसाहतीमध्येच रुग्णालय प्रस्तावित आहे. त्यामुळे कुष्ठरु ग्णांना त्यांच्याच वसाहतीत उपचार घेणे शक्य होणार आहे. केडीएमसी प्रशासनाने रु ग्णालय उभारण्यासाठी ६० लाख रु पयांच्या निधीचीतरतूद अंदाजपत्रकात केलीआहे.प्रस्तावित रुग्णालय ठाणे जिल्ह्यातीलच नव्हे, तर महाराष्ट्रातील कुष्ठरुग्णांकरिता पहिले शासकीय रु ग्णालय ठरणार आहे. जागा आणि निधी उपलब्ध झाल्यामुळे रुग्णालय उभारणीचा मार्ग मोकळा झाला असताना, तसेच निविदा प्रक्रिया पार पडली असताना जुलै महिन्यात जीएसटी लागू झाला.परिणामी, रुग्णालयाच्या उभारणीत व्यत्यय आला. हनुमाननगर कुष्ठरोग वसाहतीत ११० कुष्ठरुग्ण राहतात. या रु ग्णांना वेळेवर उपचार मिळत नसल्याने त्यांच्या जखमा चिघळतात. तसेच रुग्णांची संख्याही वाढण्याची भीती आहे.राज्यात सध्या २२ हजार कुष्ठरु ग्ण असून त्यांच्यावर उपचार करण्यासाठी ख्रिश्चन मिशनरींची आसनगाव, वर्सोवा, वडाळा, मिरज येथे रु ग्णालये असली, तरी एकही शासकीय रु ग्णालय नाही.यासंदर्भात महापालिकेचे विशेष प्रकल्प विभागाचे कनिष्ठ अभियंता शैलेश मळेकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करूनही संपर्क होऊ शकला नाही.

टॅग्स :GSTजीएसटी