शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

वाड्मयीन श्रीमंती वाढो- मधु मंगेश कर्णिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2019 23:41 IST

अंबरनाथमध्ये पुस्तक नगरी उपक्रमाचे शानदार उद्घाटन

अंबरनाथ : शहरात सुरू करण्यात आलेला पुस्तक नगरी हा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे. अंबरनाथची वाङ्मयीन श्रीमंती अशीच वृद्धिंगत होवो, वाचकांची अभिरूची सातत्याने वाढत राहो, असे आशीर्वाद पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांनी शनिवारी दिले.अंबर भरारी, ग्रंथाभिसरण मंडळ आणि कोकण मराठी साहित्य परिषदेच्या वतीने अंबरनाथमध्ये या उपक्र माचे प्रजासत्ताक दिनी लोकार्पण झाले. मधु मंगेश कर्णिक साहित्य उद्यानात हा सोहळा झाला. इतिहास, कला, कथा, कादंबरी, पत्रकारिता अशा विविध विषयांची पुस्तके वाचकांना उपलब्ध होणार आहेत.साहित्य नगरी नावाची चळवळ वर्षभरापासून अंबर भरारी या संस्थेच्या वतीने सुरू करण्यात आली होती. यात ग्रंथाभिसरण संस्था आणि कोकण मराठी साहित्य परिषदेच्या वतीने सहकार्य करण्यात आले. या उपक्र मासाठी पुस्तके दान करण्याचे आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद देत या उपक्रमासाठी सर्वसामान्य वाचक, सरकारी अधिकारी, साहित्यिक संस्था, सामाजिक संघटना, पत्रकार यांनी पुस्तके दान केली.ज्या प्रमाणे तारे आकाशात असल्याने आकाशाचे सौंदर्य अधिक खुलते, तसे या जगात कवी, साहित्य, पुस्तके असल्याने आनंद मिळतो. या जगातून कवी, साहित्य, साहित्यिक, पुस्तके नष्ट झाली तर जगात काय उरेल असा सवाल कर्णिक यांनी यावेळी केला. आपल्या मनाला, आत्म्याला आनंद देण्याचे काम पुस्तक, साहित्यातून होत असते. अंबरनाथ हे साहित्यावर अपार प्रेम करणारे शहर आहे म्हणूनच लोकसहभागातून ‘साहित्य नगरी’उभारणारे पहिले शहर म्हणून मान मिळाला आहे असे गौरवोद्गार त्यांनी काढले. वि. स. खांडेकरांचे जावई कर्नल श्रीराम पेंढारकर यांची या सोहळ्यात भेट होणे हा दुग्धशर्करा योग जुळून आल्याचेही त्यांनी सांगितले.भिलार येथे सरकारला कोट्यवधी खर्च करून जे यश मिळाले नाही ते अंबरनाथ मध्ये लोकसहभागातून पुस्तक नगरी साकारून मिळाले, असे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सांगितले. ही नगरी मुंबई, ठाणे, पुणे या शहरांपेक्षा साहित्य संस्कृती क्षेत्रात सर्वात पुढे जाईल आणि म्हणूनच या शहराचा खासदार असल्याचा मला सार्थ अभिमान आहे. या शहरात चित्रपट महोत्सव, शिवमंदिर महोत्सव, साहित्य संमेलन, युवा साहित्य संमेलन असे उपक्र म यशस्वी होत आहेत. म्हणूनच या शहरात पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांच्या नावाने साहित्य उद्यान साकारले आहे. डॉ. महेश केळुस्कर, प्रदीप ढवळ, नगराध्यक्षा मनीषा वाळेकर आदी मान्यवरांची भाषणे झाली.भविष्यात १०० केंद्रे उभारण्याचा निर्धारया माध्यमातून सध्याच्याघडीला २० हजार पुस्तके जमा झाल्याची माहिती अंबर भरारीचे प्रमुख माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी यांनी दिली. या पुस्तकांच्या मदतीने शहरातील ३५ ठिकाणी पुस्तकांचे केंद्र उभारण्यात आले आहे.येत्या काळात १०० केंद्र उभारून त्यात विविध विषयांना वाहिलेल्या पुस्तकांचा संग्रह उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचेही चौधरी यांनी सांगितले.

टॅग्स :literatureसाहित्य