शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

समाजकंटकांच्या चमूने मोर्चाला लावले गालबोट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2018 00:33 IST

नितीन कंपनीजवळ मराठा आंदोलनाच्या कार्यकर्त्यांनी सकाळपासून रास्ता रोको केला होता.

ठाणे : नितीन कंपनीजवळ मराठा आंदोलनाच्या कार्यकर्त्यांनी सकाळपासून रास्ता रोको केला होता. या आंदोलनातील प्रमुख कार्यकर्त्यांशी पोलीस सतत संपर्कात होते. तब्बल तीन तासांनंतर पोलिसांनी प्रमुख कार्यकर्त्यांना रस्त्यावरील जमावाला दूर करण्याची विनंती केली. त्यानुसार, प्रमुख कार्यकर्त्यांनी जाऊन जमावाला विनंती केली. मात्र, जमावात घुसलेले समाजकंटक हे मूळ आंदोलकांशी हुज्जत घालू लागले. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात येताच पोलिसांनी ताबा घेतला आणि लाठीमार करून जमावाला पांगवले. यावेळी १८ ते २० वयोगटांतील तरुणांचा एक जमाव पोलिसांना शिवीगाळ करत होता. मारण्याकरिता पुढे धावून येत होता. त्यांनीच मोठमोठे दगड भिरकावून पोलिसांना जखमी केले. जमावातील मुले परस्परांशी हिंदीत बोलत होती. त्यामुळे समाजकंटकांनी मराठा आंदोलनाला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले. त्यापैकी काही तरुणांना पोलिसांनी अटक केल्याने ते सराईत गुन्हेगार आहेत किंवा कसे, ते चौकशीत स्पष्ट होईल.साडेतीन तास चक्काजाम केल्यानंतर पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी लाठीमार सुरू केला. सुरुवातीला तरुणांचा चमू पळाला. एकाने पोलिसांच्या दिशेने बीअरची बाटली फेकली. भलेमोठे दगड पोलिसांच्या दिशेने मारून तीन पोलिसांना जखमी केले. त्यांच्यापैकी काही तरुण पोलिसांच्या अंगावर जाऊन शिवीगाळ करत होते. एका पोलीस कॉन्स्टेबलला घेरून मारण्याचा प्रयत्न करणार, तोच अन्य पोलीस मध्ये पडल्याने त्याची सुटका झाली. रुग्णवाहिकेला दिली मोकळी करून वाटमुंबई आणि नाशिककडे जाणारी वाहतूक आंदोलनामुळे संपूर्णपणे ठप्प झाली होती. परंतु, असे असतानाही आंदोलनकर्त्यांनी रुग्णवाहिकेला वाट मोकळी करून दिली. येणाऱ्या प्रत्येक रुग्णवाहिकेसोबत आंदोलनातील कार्यकर्ते पुढच्या टोकापर्यंत जाऊन सोडण्याचे काम करत होते. तसेच ‘बेस्ट’मध्ये अडकून राहिलेली महिला व तिच्या मुलासाठीदेखील वाट मोकळी करून दिली.स्थानिकांनीच पाच जणांना दिले पकडूननितीन कंपनी येथील छोट्यामोठ्या गल्लीतून पोलिसांवर, खाजगी वाहनांवर दगडफेक होऊ लागताच पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. मात्र, दगडफेक सुरूच राहिल्याने आतापर्यंत इमारतींच्या आडोशाला उभ्या असलेल्या काही सजग ठाणेकरांनी व मूळ मराठा आंदोलकांनी झडप घालून दगडफेक करणाºया त्या तरुणांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. असे पाच जण पोलिसांच्या स्वाधीन केल्याने आता हे नेमके काय षड्यंत्र आहे, ते स्पष्ट होईल, असे मूळ आंदोलकांचे म्हणणे आहे.पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आंदोलकांमध्ये किसननगर, लोकमान्यनगर, इंदिरानगर येथील तरुणांचा समावेश असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. ज्यांच्याकडून हा हिंसाचार घडला, ते समाजकंटक असल्याचे मराठा समाजाच्या समन्वय समितीकडून सांगण्यात आले.शहराच्या विविध ठिकाणी सकाळपासून झालेल्या दगडफेकीच्या घटनांत शंभरहून अधिक गाड्यांची तोडफोड करण्यात आली. यामध्ये टीएमटीच्या पंचवीसहून अधिक बसचा समावेश आहे. पोलिसांनी सुमारे पंचवीसहून अधिक आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले.

टॅग्स :Maratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाthaneठाणे