शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

ग्रीन झोन झाला तीन दिवसात रेड झोन याला जबाबदार कोण, कोपरीत कोरोनाचे ११ रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2020 15:01 IST

ठाणे पूर्व हा भाग मागील महिनाभर कोरोनापासून दूर होता. त्यामुळे तो ग्रीन झोन म्हणून पालिकेने घोषीत केला होता. मात्र मागील काही दिवसात या भागात कोरोनाचे तब्बल ११ रुग्ण आढळल्याने हा भाग ग्रीन झोन मधून थेट रेड झोनमध्ये आला आहे.

ठाणे : ठाण्यात लॉकडाऊन घोषीत झाल्यानंतर मागील जवळ जवळ महिनाभर कोपरीत कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नव्हता. मात्र मागील तीन ते चार दिवसात येथे रुग्णांच्या संख्येत अचानक वाढ झाली आणि येथील ग्रीन झोन अचानक पालिकेला रेड झोन म्हणून घोषीत करण्यात आला. त्यातही ग्रीन झोन असतांनाही येथील अत्यावश्यक सेवा बंद ठेवण्यात आल्या होत्या. येथील दोन्ही बाजूच्या सीमाही बाहेरच्यांसाठी बंद ठेवण्यात आल्या होत्या. असे असतांनाही या भागात कोरोनाचा शिरकाव कसा झाला असा प्रश्न आता पालिकेला पडला आहे.                   ठाणे शहरात आजच्या घडीला २६० च्यावर कोरोना बाधीत रुग्णांची संख्या झाला आहे. ज्या भागात कोरोना रुग्ण आढळत आहेत, ते भाग पालिकेकडून रेड झोन म्हणून घोषीत करण्यात आले आहे. मागील आठवड्यात लोकमान्य सावरकरनगर भागात बंद करण्यात आला. त्यानंतर दोन दिवसापूर्वी वागळे पटटयात २९ कोरोना बाधीत रुग्ण आढळल्यानंतर तो भागही आता ३ मे पर्यंत पूर्णपणे लॉकडाऊन करण्यात आला आहे. त्यानंतर आता कोपरीही ३ मे पर्यंत पूर्णपणे लॉकडाऊन करण्यात आला आहे. ठाण्याच्या विविध भागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या आढळून येत असतांना कोपरीत मात्र मागील जवळ जवळ महिनाभर कोरोना बाधीत रुग्ण आढळले नव्हते. त्यामुळे मागील १५ दिवसापूर्वी पालिकेने येथील दोन्ही बाजूच्या सीमा बंद केल्या. तसेच नागरीकांना अत्यावश्यक सेवांचा पुरवठा घरोघरी केला जात होता. एवढी सगळी खबरदारी घेतल्यानंतरही कोपरीत अखेर कोरोनाचा शिरकाव झाला आहे. यामध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याला काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. हा कोपरीतील पहिला रुग्ण ठरला होता. त्यामुळे पालिकेने खरबदारीचे उपाय योजन्यास सुरवात केली. हा पोलीस मुंब्रा पोलीस ठाण्यात कार्यरत होता. त्यामुळे इतर ठिकाणाहून हा संसर्ग कोपरीत आल्याची चर्चा होती. परंतु त्यानंतर मागील तीन दिवसात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या थेट ११ वर गेली आहे. मंगळवारी एकाच दिवशीच या भागात ६ कोरोना बाधीत रुग्ण आढळून आले आहेत. त्यातील पाच रुग्ण आनंद नगर झोपडपटटी भागातील असल्याची माहिती पुढे आली आहे.त्यामुळे पालिकेने आता संपूर्ण कोपरीच येत्या ३ मे पर्यंत लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. ग्रीन झोन असतांना ज्या पध्दतीने नागरीकांना घरपोच अत्यावश्यक साहित्य मिळत होते. तशीच सेवा आताही ठेवली जाणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले. दुसरीकडे केवळ मेडीकल दुकानेच येथे उघडी राहितील असेही पालिकेने स्पष्ट केले आहे. परंतु ग्रीन झोनचा रोड झोन होण्यास येथील काही नागरीकच जबाबदार असल्याची माहिती पुढे येत आहे. येथील काही नागरीक परिसरातून बाहेर गेल्यानेच कोपरीत कोरोनाचा संसर्ग आल्याची माहिती पुढे आली आहे. दरम्यान आता या कोरोना बाधीत रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांना पालिकेने क्वॉरान्टाइन केले आहे. तर ज्या ज्या भागात हे रुग्ण आढळले आहेत, त्या भागांचा सर्व्हे पालिकेच्या माध्यमातून सुरु झाला आहे. तसेच येथील नागरीकांची तपासणीही केली जाणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाcorona virusकोरोना वायरस बातम्या