शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! रात्रीच्या अंधारात पाकिस्तानचा भारतीय चौक्यांवर गोळीबार; ऑपरेशन सिंदूर पुन्हा सुरु होणार?
2
कर्नाटक उच्च न्यायालयाचा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा धक्का, आरएसएसला मोठा दिलासा मिळाला
3
"मनसे कार्यालयात घुसून जो कुणी त्यांना मारेल..."; सुनील शुक्ला यांची राज ठाकरेंवर जहरी टीका
4
मंत्रिमंडळ बैठक: जात वैधता प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय; रेल्वेसाठी निधी, १०० उपक्रम निश्चित
5
ट्रम्प पाहत राहिले..! भारताचा रशियासोबत मोठा करार, आता देशात तयार होणार सुखोई सुपरजेट
6
“स्वाभिमान असेल तर शिंदे-पवारांनी सरकारमधून बाहेर पडावे, अमित शाह...”; संजय राऊतांची टीका
7
Crime: 'तुला जिवंत सोडणार नाही' धमकीनंतर २४ तासात गर्लफ्रेन्डला जिवंत जाळलं!
8
नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला...
9
हिंदीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमेरिकेत स्थायिक, 'त्या' कारणाने ८ वर्षांनी मोडला संसार, आज...
10
धक्कादायक! रजनीकांत यांच्या घरी बॉम्ब ठेवल्याची धमकी, पोलिसांकडून तातडीने तपास
11
कैसन बा...ठीक बा...! एकनाथ शिंदेंनी साधला उत्तर भारतीयांशी संवाद; उद्धव ठाकरेंना लगावला टोला
12
"तुमची सेवा करणं हे सरकारचं प्राधान्य"; मुख्यमंत्र्यांसमोर लोकांनी मांडल्या समस्या
13
क्राइम पेट्रोल मनात बसले! रुग्णाने आजारी असूनही डॉक्टरांची घेतली धास्ती, पुढे जे झाले...
14
जमीन-दुकान विकून अमेरिका गाठली अन् बेड्या घालून भारतात परतले 'ते' तरुण! नेमकं काय झालं?
15
Dev Diwali 2025: देवदिवाळी नेमकी कधी? १ की २१ नोव्हेंबरला? हा गोंधळ कशामुळे? वाचा!
16
प्रेक्षकांवर ‘राजा’ फेकणाऱ्या नाकामुराचा गुकेशने केला टप्प्यात कार्यक्रम; पाहा Video...
17
'द फॅमिली मॅन' सीझन ३ 'या' तारखेला होणार प्रदर्शित; 'नोव्हेंबर'मध्ये थरार पाहण्यासाठी सज्ज व्हा!
18
Yogi Adityanath: आता यूपीतील लोकांना उपचारांसाठी दिल्लीला जाण्याची गरज नाही: योगी आदित्यनाथ 
19
Jaipur Bus Accident: कामगारांनी भरलेली बस हाय-टेन्शन लाईनच्या संपर्कात आली, १० जण गंभीर भाजले; दोघांचा मृत्यू
20
२०२५ मध्ये तिसऱ्यांदा डिविडेंड देणार 'ही' डिफेन्स कंपनी, एका शेअरवर ६ रुपयांचा फायदा; पटापट चेक करा डिटेल्स

रेल्वे कॉरिडॉरकरीता हिरवी कत्तल!

By admin | Updated: October 30, 2015 23:39 IST

पश्चिम रेल्वेवरील मुंबई-अहमदाबाद रेल्वे कॉरिडॉर करीता स्थानिकांच्या जमिनीचे संपादन केल्यानंतर प्रकल्पाला अडथळा ठरणारी झाडे तोडण्यात येणार आहेत.

बोर्डी : पश्चिम रेल्वेवरील मुंबई-अहमदाबाद रेल्वे कॉरिडॉर करीता स्थानिकांच्या जमिनीचे संपादन केल्यानंतर प्रकल्पाला अडथळा ठरणारी झाडे तोडण्यात येणार आहेत. बोर्डी वनक्षेत्रातील अठराशे झाडांच्या तोडणीकरीता छापणीचे काम वनविभागाच्या मदतीने पूर्ण झाले आहे. डहाणू ते वसई या पट्ट्यातील कत्तल होणाऱ्या झाडांचा आकडा मोठ्या संख्येने वाढणार आहे.मुंबई-अहमदाबाद रेल्वे कॉरिडॉरकरीता अडथळा ठरणारी झाडे तोडली जाणार आहेत. याबाबत डहाणू वनविभागातून बोर्डी वनपरिक्षेत्र कार्यालयास तोडीकरीता झाडांना छापणी करण्याचे काम वनक्षेत्रपाल डी. जे. सोनावणे यांच्याकडे सोपविले होते. यावेळी चिखले, घोलवड, बोरीगाव, ब्राम्हणपाडा, वेवजी इ. गावातील १८०३ झाडावर छापणी प्रक्रिया वनपाल व वनरक्षकांनी पुर्ण केले आहे. त्यापैकी अनुसूचित प्रजातीच्या गटात मोडणारी आंबा, साग, चिंच, खैर अशी ७६५ झाडे असून उर्वरीत बिगर अनुसूचित प्रकारातील झाडे आहेत. सदर रेल्वे कॉरीडॉरकरीता सुमारे दोन हजार झाडे कापली जाणार असतील तर डहाणू ते वसई या पट्ट्यात कत्तल होणाऱ्या झाडांची संख्या अनेक पटीने वाढणार आहे. त्यामुळे पालघर जिल्ह्णातील वनक्षेत्रात घट होऊन पर्यावरणाचे संतुलन बिघडणार आहे. शासनाने विकासाच्या नावाखाली हिरवी कत्तल करण्याचा घाट घातला आहे. तरी तोड होणाऱ्या झाडांच्या दहापट झाडे लावण्याची अट बंधनकारक करावी असे मत पर्यावरण प्रेमींनी मांडले आहे. (वार्ताहर)