शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यातील टंचाईग्रस्त गावांना मोठा दिलासा; पेयजलसाठी 129 कोटींचा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2018 21:45 IST

पाणी पुरवठामंत्री बबनराव लोणीकर यांचा पाठपुरावा

ठाणे : जिल्ह्यातील टंचाईग्रस्त असणाऱ्या गावांना मोठा दिलासा मिळाला असून या वर्षी राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेमध्ये 195 गावांसाठी 133 पाणी पुरवठा योजना मंजूर केल्या आहेत. मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल, राष्ट्रीय ग्रामीण पेयजल व शौचालय बांधकामासाठी एकूण 171 कोटी 23 लक्ष इतका निधी मंजूर केल्याची माहिती पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी दिली आहे.

 राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेला मार्च,२०१५ मध्ये केंद्र शासनाने स्थगिती दिली होती. मागील २ वर्षांत केवळ संसद आदर्श ग्राम व गुणवत्ता बाधित गावांमध्येच योजना घेण्याचे केंद्र सरकाचे निर्देश होते. त्यामुळे मागील २ वर्षांमध्ये खूप कमी योजना राज्यामध्ये मंजूर करण्यात आल्या होत्या. ही स्थगिती उठविण्यासाठी लोणीकर यांनी सातत्याने केंद्र शासनाकडे पाठपुरावा केला. याबाबत केंद्रीय मंत्री उमा भारती यांची दिल्लीत भेट घेतली व ही बंदी उठविण्याची मागणी केली. त्यांच्या पाठपुराव्यामुळे केंद्र शासनाने २०१८-१९ मध्ये राज्यातील पाणी पुरवठा योजना घेण्यासाठी परवानगी दिली व त्याप्रमाणे २०१८-१९ चा आराखडा तयार करण्यात आला.

जंबो आराखडा मंजूरया आराखडयामध्ये विधिमंडळ सदस्य, सरपंच यांनी सुचविलेल्या सर्व योजनांना समाविष्ट करुन  या वर्षी जिल्ह्यातील 195  वाडया/वस्त्यांसाठी 133 योजनांचा समावेशक असा आराखडा तयार करण्यात आला.  याकरिता एकूण 85 कोटी 45 लक्ष रुपये एवढा खर्च लागणार आहे. यामुळे २ वर्षाच्या कालखंडानंतर या वर्षी हा जंबो आराखडा मंजूर करण्यात आलेला आहे. या आराखडयामध्ये मागील चालू असलेल्या योजनांसाठी 43 कोटी 74 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. नवीन व चालू असणाऱ्या अशा 215 गावे/वाडयांसाठी 142 योजनांसाठी एकूण रु. 129 कोटी 19 लाख रुपयांचा  आराखडा अंतिमत: मान्य करण्यात आलेला आहे.

या अगोदर ठाणे जिल्ह्यासाठी मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेच्या माध्यमातून 29 गावांसाठी 10 योजना मंजूर केल्या असून त्यासाठी 41 कोटी 14 लक्ष एवढा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. 

हागणदारीमुक्तसाठी ठोस प्रयत्न मागील ३ वर्षात स्वच्छ भारत मिशन मध्येही बबनराव लोणीकरांनी उल्लेखनीय काम करुन ३१ मार्च २०१८ रोजी महाराष्ट्र राज्य हे संपूर्ण हागणदारीमुक्त करुन दाखविले. जिल्ह्यातील या हागनदारीमूक्त गावांमध्ये झालेल्या शौचालयाच्या बांधकामासाठी उर्वरीत आवश्यक निधी 90 लक्ष रुपये  ऑगस्ट 2018 मध्ये मंजूर करण्यात आला आहे परिणामस्वरुप 2018-19 च्या राष्ट्रीय ग्रामीण पेयजल आराखडयामध्ये सर्व गावे हागणदारीमुक्त झाल्यामुळे जिल्हयांतील जास्तीत जास्त गावांचा समावेश राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेच्या आराखडयात केला आहे.

जिल्ह्यासाठी खालीलप्रमाणे तालुकानिहाय मंजूर करण्यात आलेल्या योजना खालीलप्रमाणे आहे.

  • अंबरनाथ 20 गावे 14 योजना, 3 कोटी 41 लक्ष       
  • भिवंडी  53 गावे 32 योजना, 37 कोटी 94 लक्ष
  • कल्याण 9 गावे 6 योजना, 4 कोटी 26 लक्ष 
  • मुरबाड 29 गावे 48 योजना, 13 कोटी 42 लक्
  • शहापूर 53 गावे 33 योजना, 24 कोटी 39 लक्ष
टॅग्स :water scarcityपाणी टंचाईthaneठाणे