शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पेन्शनचे पैसे घेतल्याचा संशय घेणाऱ्या आजीचा खून करणाऱ्या नातवाला अटक

By जितेंद्र कालेकर | Updated: October 11, 2024 00:10 IST

ठाण्याच्या वागळे इस्टेट मधील घटना: वरवंटयाने डोक्यावर केले प्रहार.

जितेंद्र कालेकर, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: पेन्शनचे १२ हजार रुपये घेतल्याचा संशय घेणाऱ्या दयावती हरिराम चौहान या ७७ वर्षीय आजीच्या डोक्यावर वरवंटयाने प्रहार करीत तिचा खून करणाऱ्या अभि उर्फ अवि विष्णू चौहान (२०, रा. साठेनगर, वागळे इस्टेट, ठाणे) या आरोपीला अटक केल्याची माहिती श्रीनगर पोलिसांनी गुरुवारी दिली. त्याला १५ ऑक्टाेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.

साठेनगरातील संत मुक्ताबाई चाळीमध्ये राहणाऱ्या दयावती यांच्या निवृत्ती वेतनाचे १२ हजार रुपये चोरीस गेले होते. हे पैसे तिचाच नातू अभि याने चोरल्याचा संशय तिला होता. याच संशयातून त्याची बहिण खुशबू हिच्याबरोबरही त्याचे कडाक्याचे भांडण झाले होते. हाच राग मनात धरुन अभि याने ९ ऑक्टाेंबर २०२४ रोजी दुपारी १२.४५ वाजण्याच्या सुमारास आजीशी भांडण करुन घराच्या लोखंडी ग्रीलचा दरवाजा आतून बंद केला. त्यानंतर घरातील वरवंटयाने आजीच्या डोक्यात चार ते पाच वेळा प्रहार केले. यात ती गंभीर जखमी होऊन रक्त भंबाळ झाली. तिचा आरडाओरडा झाल्याने शेजारील काही लोकांनी त्याला अडविण्याचा प्रयत्नही केला. मात्र, रागाच्या भरात त्याने तिच्यावर हल्ला केला. या हल्ल्याची माहिती मिळताच घटनास्ळी वागळे इस्टेट परिमंडळाचे उपायुक्त अमरसिंह जाधव,

श्रीनगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक गुलझारीलाल फडतरे आणि उपनिरीक्षक नितीन हांगे यांच्या पथकाने धाव घेतली. त्यावेळी घरातच असलेला हल्लेखोर आरोपी नातू अभि याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली.

टॅग्स :thaneठाणे