शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

मीरा रोडच्या मुलांनी बनवले खतमिश्रित मातीचे गणपती बाप्पा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2018 03:04 IST

रासायनिक रंगाचा वापर करून बनवल्या जाणाऱ्या गणपतीच्या मूर्तींमुळे पर्यावरणाचा -हास होत असल्याने मीरा रोडच्या गीतानगरमधील अजय राठोड व ४१ मुलांनी खतमिश्रित मातीच्या ८१ लहान मूर्ती रंगाचा वापर न करता बनवल्या आहेत.

- धीरज परबमीरा रोड : घातक असे प्लास्टर आॅफ पॅरिस व रासायनिक रंगाचा वापर करून बनवल्या जाणाऱ्या गणपतीच्या मूर्तींमुळे पर्यावरणाचा -हास होत असल्याने मीरा रोडच्या गीतानगरमधील अजय राठोड व ४१ मुलांनी खतमिश्रित मातीच्या ८१ लहान मूर्ती रंगाचा वापर न करता बनवल्या आहेत. बाप्पाच्या उदरात बदाम आदी झाडांचे बीज रोवले असून अनंत चतुर्दशीच्या दिवशी छोटे खड्डे खणून त्यात पाणी भरून त्यात या बाप्पांचे विसर्जन करत वृक्षलागवड केली जाणार आहे.गीतानगरच्या फेज-२ व ३ मध्ये ११९ इमारती आहेत. येथे राहणारे संशोधक अजय राठोड हे ग्रीन अर्थ सिव्हिलायझेशन मोहीम चालवतात. त्यासाठी त्यांचे विविध शोध आदी सुरू असतात. गणेशोत्सवासाठी सर्रास प्लास्टर आॅफ पॅरिसच्या मूर्ती व त्यावर रासायनिक रंग वापरला जातो. पीओपी जलाशयात साचून राहते व ते अत्यंत घातक असते. रंगही घातक असतात. याचे अत्यंत वाईट परिणाम होतात.मीरा- भार्इंदरमध्येही गणपतीच्या मूर्तींसाठी वर्षाला तब्बल दीड हजार टन पीओपीचा वापर केला जातो. पर्यावरणपूरक उत्सव साजरे करण्याचे निर्देश सरकार, न्यायालयाचे असले तरी त्याचे सर्रास उल्लंघन केले जाते. यामुळे आधीच सांडपाण्याने दूषित नैसर्गिक जलाशय खूपच प्रदूषित झाले आहेत. यातूनच राठोड यांनी मातीच्या लहान मूर्तींची संकल्पना राबवली. त्या अनुषंगाने त्यांनी खतमिश्रित माती आणली. मुलांना गणपतीच्या मूर्ती बनवण्यासाठी प्रोत्साहित केले. ३ ते १५ वयोगटांतील ४१ मुलांनी यासाठी तयारी दर्शवली. गणेशोत्सव असतानाही चांगला प्रतिसाद मिळाला.>गोट्याचा गणपतीअसे नामकरणमाती आणि खतमिश्रित बाप्पांच्या मूर्तींमधील बियांमुळे वृक्षारोपण होणार आहे.बदाम, पिंपळाची झाडे लावल्यामुळे चिमणी, पोपट आदी पक्ष्यांची वर्दळ वाढणार आहे.या संकल्पनेला गोट्याचा गणपती असे नामकरण करून सोशल मीडियाच्या माध्यमातून जनजागृती करणार असल्याचे अजय म्हणाले. सहभागी मुलांना प्रशस्तीपत्रक देऊन कौतुक करण्यात आले.

टॅग्स :mira roadमीरा रोड