शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

Gram Panchayat Election Result: ठाणे जिल्ह्यात भाजपची मुसंडी, ४२ पैकी २५ सरपंचपदांवर भाजपचा झेंडा

By अनिकेत घमंडी | Updated: December 20, 2022 17:38 IST

डोंबिवली : ठाणे जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत भाजपाने मुसंडी मारली असून, भिवंडीत १४ पैकी १०, शहापूरात पाचपैकी दोन ग्रामपंचायतीत सरपंचपद ...

डोंबिवली : ठाणे जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत भाजपाने मुसंडी मारली असून, भिवंडीत १४ पैकी १०, शहापूरात पाचपैकी दोन ग्रामपंचायतीत सरपंचपद जिंकले आहे. मुरबाडमध्ये १४ पैकी ८, कल्याणमधील ९ पैकी ५ ग्रामपंचायतीतही भाजपाने यश संपादन केले. तर भिवंडी तालुक्यातील प्रतिष्ठीत कोनगाव व कारिवली ग्रामपंचायतीतही भाजपचा झेंडा फडकला आहे. या निकालांच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागावर केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांचे वर्चस्व कायम राहिल्याचा दावा मंगळवारी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला.

 जिल्ह्यातील ४२ ग्रामपंचायतीच्या निवडणुका रविवारी झाल्या होत्या. या ग्रामपंचायतींची मतमोजणी आज सकाळी नऊपासून सुरू झाली. या निवडणुकीत पहिल्या फेरीपासून भाजपाच्या सरपंचपदाच्या उमेदवारांनी आघाडी घेतली. भिवंडी तालुक्यातील १३ पैकी १० ठिकाणी भाजपाचे सरपंचपदाचे उमेदवार विजयी झाले. तर दोन ठिकाणी बाळासाहेबांची शिवसेना, तर एका ठिकाणी उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवाराला विजय मिळाला. शहापूरमध्ये पाचपैकी दोन ग्रामपंचायतीत भाजपाने एकहाती वर्चस्व मिळविले. तर मुरबाडमधील १४ पैकी ८ व कल्याणमधील ९ पैकी पाच ठिकाणी भाजपाचे उमेदवार विजयी झाले आहेत.

भिवंडी तालुक्यातील सर्वाधिक प्रतिष्ठीत व श्रीमंत कोनगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी भाजपच्या  रेखा सदाशिव पाटील, कारिवलीत संजय परशुराम नाईक, आमणे येथे विश्वपाल रामदास केणे, सापे येथे भाजपाचे गोरखनाथ बारकू सुतार, कोपरमध्ये हेमंत घरत, आवळे विश्वगड येथे प्रिती पवन देसले, खालिंग बु. येथे राजाराम पाटील, दुगाडमध्ये प्रेमा प्रकाश मुकणे, कांबे येथे आरती विजय जाधव, अकलोली येथे संचिता म्हसकर यांनी भाजपाचा झेंडा फडकविला.

भाजपाच्या उमेदवारांनी दणदणीत यश मिळविल्यामुळे तालुक्याच्या ग्रामीण भागावर केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांचे वर्चस्व असल्याचे पुन्हा सिद्ध झाले आहे.  कपिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भिवंडी भाजपचे तालुकाध्यक्ष पी. के. म्हात्रे, जिल्हा परिषदेचे सदस्य देवेश पाटील यांनी निवडणुकीची रणनीती आखल्याचे ते म्हणाले.

शहापूरातही दोन ग्रामपंचायती -शहापूर तालुक्यात झालेल्या पाच ग्रामपंचायतींपैकी दोन ग्रामपंचायतींवर भाजपाने एकहाती वर्चस्व सिद्ध केले आहे. तालुकाध्यक्ष भास्कर जाधव व सुभाष हरड यांच्या प्रयत्नाने चिखलगाव व बाभळे येथे भाजपला यश मिळाल्याचे त्यांनी सांगितले.

मुरबाड, कल्याणमध्ये आघाडीमुरबाडमधील १४ पैकी ८ ग्रामपंचायतीत भाजपाला यश मिळाले. तळेगाव, साकुर्ली, डोंगरन्हावे, मोहघर, कान्होळ, तोंडली, वैशाखरे, मोहघर येथे भाजपाचा झेंडा फडकला. तर कल्याणमधील ९ पैकी पाच ठिकाणी भाजपाने सरपंचपद जिंकल्याचे ते म्हणाले.

तीन महिन्यांपूर्वीही भिवंडीत भाजपाच अव्वलसुमारे तीन महिन्यांपूर्वी भिवंडी तालुक्यात झालेल्या निवडणुकीतही ३१ ग्रामपंचायतींमध्ये भाजपाने सर्वाधिक १२ ग्रामपंचायती जिंकल्या होत्या. तर उद्धव ठाकरे गटाला ८, बाळासाहेबांची शिवसेना, श्रमजीवी आणि मनसेला प्रत्येकी एक, तर मार्क्सवादी कम्युनिस्ट व अपक्षांना प्रत्येकी एका जागेवर यश मिळाल्याची माहिती त्यांनी दिली.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतsarpanchसरपंचthaneठाणेbhiwandiभिवंडी