शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! राष्ट्रवादीतील पक्षप्रवेशाचा हायव्हॉल्टेज ड्रामा; "मला टॉर्चर केले गेले, अन्..."
2
महापुरुषांचा अपमान करणाऱ्या नेत्यांची यादीच वाचली; जितेंद्र आव्हाडांनी भाजपाला सुनावलं
3
"कंगनाकडे राणी लक्ष्मीबाईसारखे शौर्य आणि...", योगी आदित्यनाथांनी उधळली स्तुतीसुमने
4
"महात्मा गांधींबाबत माहित नाही, मग त्यांना राज्यघटनेबाबतही…’’, मल्लिकार्जुन खर्गेंचा नरेंद्र मोदींवर संताप
5
"हा उद्योग केल्यावर दोन दिवस झोप लागली नाही"; रक्ताचे नमुने बदलणाऱ्या डॉक्टरने दिली कबुली
6
सरकार स्थापन होताच 25 दिवस खास तरुणांसाठी! अखेरच्या रॅलीत काय-काय बोलले पंतप्रधान मोदी?
7
महाराष्ट्रात निकाल काय? Lokniti-CSDS च्या विश्लेषकांची भविष्यवाणी; महायुतीला धक्का
8
"नरेंद्र मोदींनी पंतप्रधानपदाची प्रतिष्ठा घालवली...", मनमोहन सिंग यांची पत्रातून टीका
9
दोन मुलांच्या मृत्यूची जबाबदारी ड्रायव्हरच घेईल; ब्रिजभूषण यांची उडवाउडवीची उत्तरे
10
जम्मूमध्ये पोलीस ठाण्यावर हल्ला; लष्कराच्या १६ जवानांवर गुन्हा दाखल
11
आरोग्य सांभाळा! 'या' लोकांसाठी AC ठरू शकतो घातक; फुफ्फुसांचं होईल मोठं नुकसान
12
आमचे येथे श्रीकृपेकरून... अनंत अंबानींचं शुभमंगल 'आमची मुंबई'तच; 'असा' आहे तीन दिवसांचा सोहळा 
13
"देशात इंडिया आघाडीची त्सुनामी, वाराणसीत नरेंद्र मोदी पराभूत होणार’’ मोदींविरोधात निवडणूक लढवणाऱ्या काँग्रेस नेत्याचा दावा
14
"जितेंद्र आव्हाड मनोविकृत, त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा", मंत्री गुलाबराव पाटलांची मागणी
15
OYO ला आर्थिक वर्ष २४ मध्ये १०० कोटींचा निव्वळ नफा; पहिल्यांदाच नफ्यात आली कंपनी
16
"होय, मी संन्यास घ्यायला तयार"; अजित पवारांची अट अंजली दमानियांकडून मान्य, पण...
17
“PM मोदींनी महात्मा गांधींबाबत केलेले विधान म्हणजे देशाचे दुर्दैव”; पृथ्वीराज चव्हाणांची टीका
18
अरे देवा! नवऱ्याने रील बनवण्यास केली मनाई; नाराज झालेली बायको मुलीसह झाली फरार
19
Gautam Gambhir च्या विरोधात 'दादा'? गांगुलीचा BCCI ला सल्ला अन् चाहते बुचकळ्यात!
20
TATA चा 'हा' शेअर विकून बाहेर पडतायत गुंतवणूकदार; एक्सपर्ट म्हणाले, "१३५ पर्यंत येणार..."

लोकल वेळेवर धावण्याचा खर्च शासनाने झटकला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2018 6:43 AM

लोकलच्या वेळापत्रकात आमूलाग्र बदल घडवून चाकरमान्यांची लेटमार्कपासून सुटका करण्यासाठी, मैलाचा दगड ठरणा-या कम्युनिकेशन बेस ट्रेन कंट्रोल (सीबीटीसी) या सुमारे १५ ते २० हजार कोटी रुपये खर्चाच्या प्रकल्पाचा ५० टक्के हिस्सा देण्यास महाराष्ट्र शासनाने नकार दिला आहे.

- नारायण जाधव ठाणे : लोकलच्या वेळापत्रकात आमूलाग्र बदल घडवून चाकरमान्यांची लेटमार्कपासून सुटका करण्यासाठी, मैलाचा दगड ठरणा-या कम्युनिकेशन बेस ट्रेन कंट्रोल (सीबीटीसी) या सुमारे १५ ते २० हजार कोटी रुपये खर्चाच्या प्रकल्पाचा ५० टक्के हिस्सा देण्यास महाराष्ट्र शासनाने नकार दिला आहे. यातील चर्चगेट-विरार धिमा मार्ग आणि सीएसटी-पनवेल धिम्या मार्गांसाठीच्या १३ हजार कोटींहून अधिक खर्चाची जबाबदारी राज्य शासनाने सिडको, एमएमआरडीएसह मुंबई आणि नवी मुंबई महापालिकेवर ढकलली आहे.या प्रकल्पासाठी एमएमआरडीए, सिडको, मुंबई महापालिकेने प्रत्येकी १५ टक्के, तर नवी मुंबई महापालिकेने तो ५ टक्के खर्च उचलावा, असा निर्णय राज्याच्या नगरविकास विभागाने घेतला आहे. या संस्थांनी अर्थसंकल्पीय तरतूद करून, प्रशासकीय मंजुरी घेऊन तो निधी मुंबई रेल्वे विकास महामंडळाकडे सुपुर्द करावा, असे आदेश ९ मार्च रोजी शासनाने दिले आहेत. मात्र, कोणताही फायदा नसताना मुंबई, नवी मुंबई महापालिकेसह सिडको आणि एमएमआरडीएने हा हजारोद्यकोटींच्या खर्चाचा भार का उचलावा, त्यात त्यांचा काय फायदा, असा सवाल केला जात आहे, तसेच राज्य शासनाने मुंबई व नवी मुंबईतील स्थानिक लोकप्रतिनिधींना न विचारताच, हे आदेश काढल्याने त्यांच्याकडूनही विरोध होण्याची शक्यता आहे.कोणत्या मार्गावर होणार सीबीटीसी प्रणालीमुंबईतील चर्चगेट-विरार धिमा मार्ग, सीएसटी-कल्याण-कसारा धिमा मार्ग आणि सीएसटी-पनवेल धिमा मार्ग या तीन उपनगरीय मार्गांवर सीबीटीसी प्रणाली कार्यान्वित करण्यात येणार आहे. त्यास रेल्वमंत्री पीयूष गोयल यांनी मान्यता दिली आहे. यानुसार, सीएसटी-कल्याण-कसारा मार्गावर ही प्रणाली लागू करण्याचा खर्च ९००० कोटी, चर्चगेट -विरार मार्गांचा खर्च ४२२३ कोटी आणि सीएसटी-पनवेल मार्गाचा खर्च ४००० कोटींहून अधिक आहे. यातील आता पहिल्या टप्प्यात चर्चगेट-विरार धिमा मार्ग आणि सीएसटी-पनवेल धिम्या मार्गावर ही प्रणाली लागू करण्यात येणार आहे. यासाठी राज्य शासनाने ५० टक्के खर्चाची जबाबादरी उचलावी, असे रेल्वेचे निर्देश आहेत. मात्र, राज्य शासनाकडे आता निधींची चणचण असून, राज्यावर आधीच ४ लाख कोटींहून अधिक कर्ज आहे. त्यामुळे आता या दोन्ही मार्गांवरील खर्च शासनाने एमएमआरडीए, सिडको आणि मुंबई, तसेच नवी मुंबई महापालिकेवर ढकलला आहे. त्यामुळे आता हा निधी उभारण्याची कसरत त्यांना करावी लागणार आहे.>काय आहे सीबीटीसी प्रणालीसध्या मुंबई उपनगरीय रेल्वेचा कारभार पूर्णत: सिग्नल यंत्रणेनुसार चालतो. त्यामुळे उपनगरीय वाहतूक वेळेवर होण्यात अडचणी येतात. मात्र, सीबीटीसी प्रणालीनुसार अत्याधुनिक अशा संदेशवहनाने मोटरमन, गार्ड आणि नियंत्रण कक्ष यांच्यात सिग्नल यंत्रणेबाबत समन्वय होऊन, वाहतूक सुरळीत आणि अपघात विरहित होण्यास मदत होणार आहे, तसेच दोन लोकलमधील अंतर कमी होऊन, मुंबईकरांना जास्तीच्या लोकल उपलब्ध होणार आहेत. यात अधिकच्या लोकलसाठी डब्यांची खरेदीदेखील करण्यात येणार आहे.

टॅग्स :localलोकल