शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

सरकारी बाबुंनी आरोग्य विषयक धोरण ठरवू नयेत - डॉ. यशवंत देशपांडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2017 18:26 IST

आरोग्याची धोरण सरकारी बाबुंनी ठरवू नयेत. त्यामुळे अंमलबजावणी करतांना अनेक अडथळे येतात असे आवाहन महाराष्ट्र मेडीकल असोसिएशनचे डॉ. यशवंत देशपांडे यांनी केले. डोंबिवलीतील दोन दिवसीय ठाणे जिल्ह्यातील डॉक्टर परिषदेचा समारोप रविवारी झाला.

-  डोंबिवलीतील दोन दिवसीय डॉक्टर परिषदेचा समारोपडोंबिवली: आरोग्याची धोरण सरकारी बाबुंनी ठरवू नयेत. त्यामुळे अंमलबजावणी करतांना अनेक अडथळे येतात असे आवाहन महाराष्ट्र मेडीकल असोसिएशनचे डॉ. यशवंत देशपांडे यांनी केले. डोंबिवलीतील दोन दिवसीय ठाणे जिल्ह्यातील डॉक्टर परिषदेचा समारोप रविवारी झाला. त्याआधी पत्रकारांसमवेत बोलतांना वरील आवाहन करत शासनाच्या धोरणांवर नाराजी व्यक्त केली. विविध ठिकाणची स्थानिक परिस्थिती वेगवेगळी असते. पण तरीही सर्वच डॉक्टर नियमांनूसार काम करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत असल्याचा दावा डॉ. देशपांडे यांनी केला.सरकारच्या कमकुवत धोरणांचा त्रास डॉक्टरांना होत असल्याचे अनेकदा नीदर्शनास आले आहे. त्यासाठी शासनाकडे पत्रव्यवहार केला जातो, पण बदल मात्र होत नाहीतच ही खंत त्यांनी व्यक्त केली. आयएमएचे प्रतिनिधी सर्वत्र रुग्णांना चांगलीच सेवा देण्यासाठी तत्पर असतात. पण रुग्णालयांवर होणारे हल्ले, डॉक्टर्स- नर्सवर होणारे हल्ले हे शोभनिय नाही. सुरक्षा यंत्रणेने त्यासंदर्भात सतर्कता दाखवणे आवश्यक आहे. त्यातही सातत्याने अशा घटना घडत असतील तर ते अडचणीचे होते, डॉक्टरांच्या मानसीकतेचे खच्चीकरण होत आहे. कल्याणच्या दूर्घटनेचे पडसाद राज्यभर उमटले असून डॉक्टरांमध्ये तीव्र नाराजी आहे. असे गढूळ वातावरण असू नये अशी मत विविध डॉक्टरांनी परिषदेत व्यक्त केली. डॉक्टर हा देखिल माणुस असून देव नाही, शास्त्राचा आधार घेत डॉक्टर रुग्णांना वाचवण्याचा प्रयत्न करतात. कोणताही रुग्ण बरा होऊ नये असे कोणत्याही डॉक्टरला वाटत नाही. रोज हजारो-लाखो रुग्ण देशभर सर्वत्र विविध रुग्णालयात उपचारासाठी दाखल होतात, कधीतरीच उपचारात चालढकल पणा होत असेल म्हणुन सबंध डॉक्टरांवर गालबोट लागता कामा नये अशीही अपेक्षा या परिषदेदरम्यान व्यक्त करण्यात आल्याचे इंडियन मेडीकल असोसिएशनचे राष्ट्रीय पदाधिकारी डॉ. मंगेश पाटे यांनी केले.डॉक्टरांवर होणा-या हल्याची केंद्र सरकार, राज्य शासन यांच्यासह पोलिसांनी गंभीर दखल घ्यावी, पोलिसांना गोपनिय विभागामार्फत मिळणा-या माहितीद्वारे डॉक्टरांना सूचित करणे आवश्यक आहे. तसेच मेडीकेअर अ‍ॅक्ट २०१० हा काय आहे याची माहिती सर्व डॉक्टरांना करुन द्यावी, जेणे करुन डॉक्टरांवर, रुग्णालयांवर हल्ले झाल्यानंतर तातडीने त्या कायद्याचा आधार घेत गुन्हे दाखल करावेत असे, आवाहन आयएमएच्या महिला पदाधिकारी डॉ. अर्चना पाटे यांनी महिला डॉक्टरांच्या वतीने व्यक्त केले. डॉक्टर परिषदेचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल आयएमएच्या डोंबिवली शाखेचे राष्ट्रीय पदाधिका-यांनी कौतुक करत, कल्याणच्या हॉस्पिटल हल्ला प्रकरणी ठाणे जिल्ह्यातील डॉक्टरांनी दाखवलेली एकजूट महत्वाची होती. त्याबद्दलही सर्व डॉक्टरांचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. रवी वानखेडकर, डॉ. देशपांडे यांनी समाधान व्यक्त केले.

टॅग्स :dombivaliडोंबिवली