शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

विक्रमगडकरांच्या दबावतंत्राने सरकारी पेच

By admin | Updated: April 5, 2016 01:13 IST

विक्रमगडकरांना तालुक्याच्या दर्जानंतर नगरपंचायतीचा दर्जा हवा असताना गावकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसून नगरविकास खात्याने ग्रामपंचायतीच्या निवडणुका घोषित केल्या

तलवाडा : विक्रमगडकरांना तालुक्याच्या दर्जानंतर नगरपंचायतीचा दर्जा हवा असताना गावकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसून नगरविकास खात्याने ग्रामपंचायतीच्या निवडणुका घोषित केल्या. मात्र, याविरोधात सर्वपक्षीय उमेदवारांसह अपक्षांनी बहिष्काराचे अस्त्र उगारून ही निवडणूक न लढवण्याचा आपला निर्णय यशस्वी केला. २९ मार्च ते २ एप्रिल या उमेदवारी अर्ज भरण्याच्या दिवशी एकही अर्ज न दाखल झाल्याने गावकऱ्यांचा निवडणुकीवरील बहिष्कार यशस्वी ठरला आहे. त्यामुळे नगरपंचायत स्थापण्यासाठी राज्य सरकारवरील दबाव वाढला आहे आणि निवडणुकांबाबतचा पेचही कायम आहे.विक्रमगड ग्रामपंचायतीचा नगरपंचायत होण्याचा प्रस्ताव नगरविकासमंत्र्याकडे प्रस्तावित असताना नगरपंचायतीची निवडणूक घेण्याऐवजी ग्रामपंचायत निवडणूक जाहीर करण्यात आल्याने गावकऱ्यांमध्ये संतापाची भावना आहे. याबाबत, मुख्यमंत्र्यांकडे प्रस्ताव सादर करूनसुद्धा ग्रामपंचायत निवडणूक घेण्यात येत असल्याविरोधात नगरपंचायतीसाठी सर्व पक्ष एकत्र आले आणि त्यांनी गेल्या महिनाभरापासून या विषयास विरोध करीत ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा एकमुखी निर्णय घेतला होता. अखेरच्या दिवशी एकही अर्ज दाखल न झाल्याने नगरपंचायतीसाठी केलेल्या ऐक्याचा विजय झाल्याची प्रतिक्रिया उमटत आहे. जिल्ह्यातील प्रतिष्ठेची असलेली ग्रामपंचायत निवडणूक होणार नसल्याने एकजुटीची इतर ग्रामपंचायतींच्या सरपंच, सदस्य यांनी प्रशंसा केली आहे.शासनाच्या घोषणेप्रमाणे शहर व लोकसंख्येनुसार ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये रूपांतर करण्याचे प्रस्ताव मागवण्यात आले होते. त्यामध्ये विक्रमगड ग्रामपंचायतीचे २०११ च्या जनगणनेनुसार १० हजार लोकसंख्येप्रमाणे १७ वॉर्ड आहेत़ या अनुषंगाने ही नगरपंचायत घोषित होणे अपेक्षित असताना ग्रामपंचायतीची निवडणूक १७ एप्रिल रोजी घेतली जात असल्याने हा पेच उभा राहिला आहे. यासंदर्भात रविवारी सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद घेऊन या ग्रामंपचायत निवडणुकीवर बहिष्कार टाकल्याचे स्पष्ट केले. तसेच, या विषयाबाबत हायकोर्टामध्ये याचिका दाखल करण्यात आलेली आहे़ राज्यातील प्रत्येक तालुकास्तरावरच्या आणि १० हजारांहून अधिक लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींना नगरपंचायतीचा दर्जा देण्याचा निर्णय सरकारने दोन वर्षांपूर्वीच आघाडी सरकारने घेतला होता़ त्या दृष्टीने सरकारी यंत्रणेने सर्वेक्षणही केले होते़ त्यानंतर, तसा प्रस्तावही मागवण्यात आले होते़ त्यानंतर, पालघर जिल्ह्यातील लोकसंख्येने जास्त असलेल्या ग्रामपंचायतीने जिल्हा परिषदेला गेल्या वर्षीच तसा प्रस्ताव पाठवला होता़ महाराष्ट्रात अनेक ठिकाणी तालुका ग्रामपंचायती नगरपंचायती होऊन निवडणुका झाल्या़ शहापूर व मुरबाडचे उदाहरण सर्वांसमोर आहे. जिल्हा परिषद प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार हे प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून नगरविकास खात्याकडे पाठवण्यात आले आहेत़ मात्र, तरीही आता होणाऱ्या निवडणुकीत या ग्रामपंचायतींना नगरपंचायतीचा दर्जा न देता ग्रामपंचायत म्हणून निवडणुका घेतल्या जात आहेत़ त्यामुळे सर्व पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी निवडणूक आयोगाच्या या निर्णयाला आक्षेप घेतला होता़ ठाणे जिल्ह्यात ग्रामपंचायतींना नगरपंचायतींचा दर्जा देऊन निवडणुका घेतल्या आहेत़ त्यामुळे पालघरमध्ये हा निर्णय का घेण्यात आला नाही, असा प्रश्न सर्वपक्षीयांनी केला आहे़ च्विक्रमगड तालुक्यातील विक्रमगड ग्रामपंचायत वगळता ३५ ग्रामपंचायतींच्या निवडणुका १७ एप्रिलला होणार आहेत़ तालुक्यातील १४३ प्रभागांतून ३९२ उमेदवारांची निवडणूक घ्यावयाची असून त्यामध्ये अनु. जमातीसाठी (महिला) १९५ जागा व इतर सर्वांसाठी १९७ जागांचा समावेश आहे़ च्फॉर्म भरण्याच्या पहिल्या दिवसापासूनच उमेदवारांची गर्दी होती, तर शेवटच्या दोन दिवसांत गर्दीचा ओघ वाढून २९ मार्च व १ एप्रिलदरम्यान ११७६ उमेदवारी अर्ज सादर करण्यात आले असून त्याची छाननी सोमवार, ३ एप्रिलला होणार आहे़ च्तहसील कार्यालयाची जागा अपुरी असल्याने फॉर्म देण्यासाठी व स्वीकारण्यासाठी तहसील कार्यालयासह कृषी कार्यालय, पंचायत समिती व आयटीआय येथे १२ अधिकाऱ्यांची नियुक्ती केली होती़ च्२०१६ मध्ये माकपाची डोल्हारी बु. ग्रामपंचायतीची परंपरा मोडीत डोल्हारी बु़ ग्रामपंचायतीमध्ये गेल्या ४० ते ४५ वर्षांपासून बिनविरोधात माकपाची सत्ता आहे़