शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
3
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
4
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
5
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
6
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
7
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
8
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
9
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
10
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
11
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
12
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
13
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
14
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
15
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
16
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
17
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
18
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
19
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
20
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस

ठाणेकर रंगकर्मींना सरकारने दाखवली मुंबईची वाट, घाणेकर नाट्यगृहाच्या दुरूस्तीच्या घोळापायी हक्काचा प्रेक्षक गमवल्याचे शल्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2017 03:34 IST

ठाणे : नाट्यगृह उपलब्ध न झाल्याने ठाणे शहरात दरवर्षी होणारी हौशी राज्य नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी ठाणेकर प्रेक्षकांनी गमावली आहे.

प्रज्ञा म्हात्रेठाणे : नाट्यगृह उपलब्ध न झाल्याने ठाणे शहरात दरवर्षी होणारी हौशी राज्य नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी ठाणेकर प्रेक्षकांनी गमावली आहे. या स्पर्धेत सहभागी होणा-या नाट्य संस्थांना नाटक सादर करण्यासाठी मुंबईतील साहित्य संघात जावे लागणार असल्याने रंगकर्र्मींनी नाराजी व्यक्त केली.५७ वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत सहभागी होणा-या ठाण्यातील नाट्यसंस्थांना महाराष्ट्र शासनाने मुंबईत नाटक सादर करण्यास भाग पाडल्याने ठाण्यातील नाट्यकर्मींनी आक्रोश व्यक्त केला. ठाणे शहरात अनेक वर्षांपासून या स्पर्धेची प्राथमिक फेरी घेण्यात येत होती. मात्र यावर्षी घाणेकर नाट्यगृहाची दुरुस्ती सुरू असल्याने ठाणे शहरात सादर होणारी रायगड आणि नवी मुंबंईतील नाट्यसंस्थांसाठी पनवेल हे नवे केंद्र यावर्षी पहिल्यांदाच सुरू करण्यात आले आहे. ठाणे शहरातील नाट्य संस्थांना मात्र मुंबईची वाट दाखवण्यात आली आहे.घाणेकर नाट्यगृहाला गडकरी रंगायतन किंवा ठाणेनजीकच्या मुलुंडमधील कालीदास नाट्यगृहाचा पर्याय होता. मात्र तिथे ही स्पर्धा न घेता ठाणे शहराशी असलेल्या हौशी नाट्याचे नातेच शासनाने तोडून टाकल्याच्या भावना रंगकर्र्मींनी व्यक्त केल्या. या निमित्ताने आम्ही ठाण्यातील हक्काचा प्रेक्षक गमावला असल्याची खंत ‘लोकमत’शी बोलताना अनेकांची व्यक्त केली.महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने ५७ वी हौशी मराठी नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी ६ नोव्हेंबरपासून होणार आहे. डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहातील मिनी थिएटरचे काम सुरू असल्याने या ठिकाणी असणाºया ‘ठाणे केंद्रा’ची ओळखच संपवण्यात आली आहे. कल्याण केंद्रावर सादर होणारी नाटके यावर्षी डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले नाट्यगृहात सादर होणार आहेत.ठाणेकर नाट्यसंस्थांना मुंबईत प्रयोग करण्यासाठीचा आर्थिक भूर्दंड सहन करावा लागणार आहे. याशिवाय मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागणार आहे. हे व्यावसायिक कलाकार नाही, हौशी कलाकार आहे. त्यामुळे त्यांना इथून मुंबईला जाऊन नाटक सादर करण्यासाठी तारेवरची कसरतच करावी लागणार आहे, असे मत गेली अनेक वर्षे राज्य नाट्य स्पर्धेत सहभागी होणा-या एका नाट्यकर्मीने मांडले.ठाणे केंद्रासाठी नाट्यगृह ठाण्यात उपलब्ध करणे ही शासनाची जबाबदारी आहे. या नाट्यसंस्थांना मुंबईत घुसविणे चुकीचे आहे. वर्षानुवर्षे नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये या स्पर्धा होतात, हे माहित असताना पालिकेला तसे आधीच सांगणे गरजेचे होते. त्यातून दुरुस्तीचे काम जलद झाले असते.असा मुद्दा मांडतानाच मुंबईला पाठविल्यामुळे खर्च वाढलाच, पण राज्य नाट्य स्पर्धेत उतरणा-या स्थानिक नाट्य संस्थांचा प्रेक्षक असतो, प्रोत्साहन देणारे रसिक आम्ही गमावला, याला फक्त शासनाचा अनागोंदी कारभार जबाबदार आहे, अशा भावना नाट्यसंस्था आणि रंगकर्मींनी व्यक्त केल्या.