शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पाणी मिळाले, निधीही मिळाला, वितरणाचे काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2018 00:10 IST

पाण्यासाठी बारवीमध्ये आरक्षण मिळाले. योजना सुरू करण्यासाठी अमृत योजनेतून निधीही मिळाला. मात्र, असे असले तरी पाण्याची कोंडी मात्र अजूनही कायम आहे.

अंबरनाथ आणि बदलापूरमधील पाणीसमस्या सोडवण्यासाठी बारवी धरणातून ५० दशलक्ष लीटर पाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. अर्थात, हे पाणी घेण्यासाठी दोन्ही पालिका क्षेत्रात जलशुद्धीकरण केंद्राची आवश्यकता भासणार आहे. त्यासाठी लागणारा निधीही सरकारने मंजूर केला आहे. पाण्यासाठी बारवीमध्ये आरक्षण मिळाले. योजना सुरू करण्यासाठी अमृत योजनेतून निधीही मिळाला. मात्र, असे असले तरी पाण्याची कोंडी मात्र अजूनही कायम आहे. वाढीव पाणी मिळत असले, तरी जीवन प्राधिकरणाच्या ढिसाळ कारभारामुळे हे पाणी नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचे काम मात्र ठोसपणे होत नाही. त्यामुळे प्राधिकरणाने आधी ही पाणीकोंडी सोडवणे गरजेचे आहे.बारवी धरणात उंची वाढल्याने ४८८ दशलक्ष लीटर अतिरिक्त पाण्यातून काही शहरांसाठी पाण्याचे आरक्षण मंजूर करण्यात आले आहे. त्यात अंबरनाथसाठी २४ दशलक्ष लीटर अतिरिक्त पाणी मंजूर करण्यात आले आहे, तर बदलापूरकरिता २६ दशलक्ष लीटर पाणी मंजूर करण्यात आले आहे. आजघडीला बदलापूर शहरासाठी जीवन प्राधिकरणामार्फत ४० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा केला जात आहे.बदलापूरची वाढती लोकसंख्या पाहता हा पाणीपुरवठा अपुरा पडत आहे. त्यामुळे बदलापूरला अतिरिक्त पाण्याची गरज भासत होती. बारवी धरणाची उंची वाढवण्याच्या कामानिमित्ताने बदलापूरला अतिरिक्त पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला होता. मात्र, बारवी धरणातून नेमके किती पाणी मिळणार, याबाबत कुणालाच शाश्वती नव्हती. बदलापूरला सरकारने २६ एमएलडी पाणी मंजूर केल्याने पुढील २० वर्षांच्या पाण्याचा प्रश्न निकाली निघणार आहे. मात्र, इतके पाणी उपलब्ध होणार असले, तरी त्याचे नियोजन करण्यासाठी जीवन प्राधिकरण कमी पडत आहे. वाढीव पाणी मिळणार असले, तरी अजूनही वितरणाचे नियोजन झालेले नाही.अंबरनाथच्या लोकसंख्येचा विचार करता ७० दशलक्ष लीटर पाण्याची गरज आहे, तर बदलापूरला ५२ दशलक्ष लीटर पाण्याची गरज आहे. सोबत, अंबरनाथच्या आयुध निर्माणी कारखान्याला नऊ दशलक्ष लीटर पाणी देणे बंधनकारक आहे. या तिन्हींचा विचार करता आजघडीला अंबरनाथ आणि बदलापूरसाठी १३१ दशलक्ष लीटर पाण्याची गरज आहे. जीवन प्राधिकरण त्या अनुषंगाने बॅरेज धरणातून ९० दशलक्ष लीटर पाणी उचलत आहे, तर एमआयडीसीकडून १००, भोज धरणातून सहा आणि चिखलोली धरणातून सहा असे एकूण ११२ दशलक्ष लीटर पाणी उपलब्ध होते. मात्र, गरजेपेक्षा २० दशलक्ष लीटर पाणी कमी पडत असल्याने प्राधिकरणाने ३० दशलक्ष लीटर पाण्याची तत्काळ मागणी केली होती. या मागणीच्या प्रमाणात सरकारने दोन्ही शहरांसाठी एकूण ५० दशलक्ष लीटर पाणी मंजूर केले आहे. मात्र, असे असले तरी वितरणव्यवस्थेत सुधारणा अजूनही झालेली नाही. त्यामुळे बदलापूरमध्ये उल्हास नदीवर उपसाविहीर बांधण्यासाठी १०८ दशलक्ष लीटर क्षमतेचे नवीन जलशुद्धीकरण केंद्र बांधणे, ३४ किलोमीटरच्या वितरणवाहिन्या टाकणे, सात नवीन जलकुंभ उभारण्याचे काम प्रस्तावित करत त्यासाठी ६३ कोटींची योजना तयार केली होती. त्या योजनेलाही मंजुरी दिली असून आता बदलापूरमधील वाढीव पाण्यासोबत वितरणव्यवस्थेत सुधारणा होण्यास मदत होणार आहे.या योजनेत बदलापूर पूर्व भागात मानकवली, एमआयडीसी शिरगाव, मॅरेथॉननगरी, कीर्ती पोलीसलाइन या भागात, तर पश्चिम भागात बौद्धवाडा, ठाकूरवाडी, सोनवली, वालिवली, वडवली असे नऊ नवीन जलकुंभ प्रस्तावित आहेत.प्राधिकरणाने सक्षम होणे गरजेचेयाआधीही नगरोत्थान योजनेतून आणि अमृत योजनेच्या पहिल्या टप्प्यात निधीची तरतूद केली होती. तरीही, वितरणव्यवस्थेत तीळमात्र सुधारणा झालेली नाही. अनेक वर्षे पाणी नाही, अशी बोंब मारून पाणीटंचाईचे कारण पुढे केले जात होते. मात्र, आज परिस्थिती बदलण्याची शक्यता आहे. तरीही, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्राधिकरणाने सक्षम होणे गरजेचे आहे.

टॅग्स :water transportजलवाहतूकbadlapurबदलापूर