गोरखपूर, वाराणसी, पाटलीपुत्र रेल्वे गाड्यांचे आरक्षण ४ डिसेंबरपर्यंत फुल्ल, दक्षिणेकडे प्रतिसाद कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2020 01:09 AM2020-11-22T01:09:09+5:302020-11-22T01:09:24+5:30

प्रवासी पडू लागले बाहेर : वेटिंग तिकीट मिळणेही झाले बंद, तरीही रांगा कायम

Gorakhpur, Varanasi, Patliputra train reservations full till December 4, response to south less | गोरखपूर, वाराणसी, पाटलीपुत्र रेल्वे गाड्यांचे आरक्षण ४ डिसेंबरपर्यंत फुल्ल, दक्षिणेकडे प्रतिसाद कमी

गोरखपूर, वाराणसी, पाटलीपुत्र रेल्वे गाड्यांचे आरक्षण ४ डिसेंबरपर्यंत फुल्ल, दक्षिणेकडे प्रतिसाद कमी

Next

अनिकेत घमंडी

डाेंबिवली : कोरोनाच्या काळात २२ मार्चपासून रेल्वेची प्रवासी वाहतूक १५ जूनपर्यंत बंद होती. त्यानंतर, जसजसे अनलॉक सुरू झाले, तसतसे लांब पल्ल्यांच्या गाड्यांमधील प्रवासी वाहतूक टप्प्याटप्पाने देशभरात सुरू झाली. महाराष्ट्रात विशेषतः मुंबईमधून अनलॉक-५ च्या केंद्राच्या घोषणेनंतर प्रवासी हळूहळू बाहेर पडायला सुरुवात झाली. नोव्हेंबर २० ते ४ व ९ डिसेंबर या कालावधीतील लांब पल्ल्यांच्या गाड्यांच्या आरक्षणाचा धांडोळा घेतला असता उत्तरेकडे गोरखपूर, वाराणसी, पाटलीपुत्र मार्गावर मुंबईहून सुटणाऱ्या गाड्यांचे आरक्षण फुल्ल असल्याची माहिती समोर आली आहे.

मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी पी.डी. पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार २० नोव्हेंबर ते ४ व ९ डिसेंबर या कालावधीत त्या भागात जाणाऱ्या गाड्यांची आरक्षण तुलनेने दक्षिणेकडे जाणाऱ्या गाड्यांपेक्षा अधिक आहे. फर्स्ट, सेकंड आणि थ्री टायर एसी, स्लीपर, फर्स्ट, सेकंड सीटिंग आरक्षण आणि सामान्य डबे यांचा समावेश असल्याचे सांगण्यात आले. 

या गाड्यांमध्ये आरक्षण फुल्ल
सीएसएमटी ते वाराणसी मार्गावर क्रमांक ०१०९३ महानगरी विशेष गाडी, ०१०१५ एलटीटी गोरखपूर, ०२१४१ एलटीटी पाटलीपुत्र आणि ०२५३४ ही सीएसएमटी लखनऊ तसेच ०२५४२ या एलटीटी-गोरखपूर या लांब पल्ल्यांच्या गाड्यांची आरक्षणे २१ नोव्हेंबर ते ४ डिसेंबर या कालावधीत फुल्ल असून बहुतांश गाड्यांचे वेटिंग तिकीटही आरक्षण तिकीट खिडक्यांवर मिळणे बंद झाले आहे. याखेरीज आठवड्यातून तीन वेळा असलेल्या १०५५ एलटीटी-गोरखपूर या गाडीचे आरक्षण जवळपास फुल्ल झाले आहे.

या मार्गावरील गाड्यांमध्ये आरक्षण कमी
उत्तर, दक्षिणेबरोबरच पुणे, नाशिक, मनमाड, औरंगाबाद, सोलापूर या मार्गांवरदेखील लांब पल्ल्यांच्या गाड्या सुरू झाल्या असल्या, तरी तूर्तास आरक्षणाचे प्रमाण कमीअधिक असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

Web Title: Gorakhpur, Varanasi, Patliputra train reservations full till December 4, response to south less

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे