शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

गुगल दाखविणार शहरातील सार्वजनिक शौचालये, शहरात 11 हजार 217 शौचालये

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2017 20:06 IST

हगणदारीमुक्त ठाणे करण्यासाठी पालिकेने आता थेट गुगलची मदत घेण्याचे निश्चित केले आहे. त्यानुसार शहरातील तब्बल 11 हजार 217 सार्वजनिक शौचालयांची माहिती आता गुगलवर उपलब्ध होणार आहे.

ठाणे, दि. 8 - हगणदारीमुक्त ठाणे करण्यासाठी पालिकेने आता थेट गुगलची मदत घेण्याचे निश्चित केले आहे. त्यानुसार शहरातील तब्बल 11 हजार 217 सार्वजनिक शौचालयांची माहिती आता गुगलवर उपलब्ध होणार आहे. त्यामुळे उघड्यावर शौच करण्याऐवजी ठाणेकरांनी गुगलची मदत घेऊन सार्वजनिक शौचालयांचा लाभ घ्यावा हा मूळ उद्देश असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे.एखाद्या गावाची माहिती, एखाद्या दिग्गज नेत्याची माहिती किंवा हॉटेल, मॉल, सिनेमागृह आदींसह इतर माहिती देण्यासाठी प्रचलित असलेले गुगल आता शहरातील सार्वजनिक शौचालयांची माहिती देखील उपलब्ध करून देणार आहे. केंद्राच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत आता ठाण्यातील सर्व सार्वजनिक शौचालये ही गुगलवर दिसणार आहेत. केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानाचा एक भाग म्हणून ठाणे शहराला हगणदारीमुक्त करण्यासाठी पालिकेने आता हे पाऊल उचलले आहे. ठाणे महापालिका अंतर्गत येणारे 11 हजार 217 सार्वजनिक शौचालयांना आता टॉयलेट लोकेटरद्वारे गुगलवर टाकले जाणार आहे. यासाठी क्वालिटी काऊन्सिल ऑफ इंडियाच्या (क्यू. सी .आय.) माध्यमातून संपूर्ण खर्च केला जाणार आहे.शहरातील सार्वजनिक शौचालये गुगल मॅपद्वारे टॉयलेट लोकेटर बसविण्यासाठी 1 कोटी 98 लाखांचा खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. तसेच ही सेवा सुरू केल्यानंतर यामध्ये 5 पेक्षा जास्त त्रुटी आढळून आल्यास पुन्हा त्यात सुधारणा करण्यासाठी 60 हजारांचा खर्च येणार आहे. असा एकूण 2 कोटी 58 लाखांचा खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. त्यावर नवीन करप्रणालीनुसार 18 टक्के जीएसटी लागणार असल्याने त्यात आणखी वाढ होऊन हा खर्च 3 कोटी 4 लाख 440 रुपये एवढा आता अपेक्षित धरण्यात आला आहे. त्यानुसार या खर्चापैकी 80 टक्के रक्कम कार्यादेश दिल्यानंतर आगाऊ देण्यात येणार असून उर्वरित 20 टक्के रक्कम काम पूर्ण झाल्यावर दिली जाणार आहे. त्यानुसार आता येत्या 2 ऑक्टोबर र्पयत ही शौचालये गुगल मॅपला जोडली जाणार असल्याचेही पालिकेने स्पष्ट केले.चौकट - पालिकेने मागील वर्षी केलेल्या शौचालयांच्या सव्र्हेत 3092 घरे ही सामुहीक शौचालयचा वापर करीत असून उर्वरित 60 हजार 198 घरे ही सार्वजनिक शौचालयांचा वापर करीत आहेत. दरम्यान, 6968 कुटुंबे म्हणजेच प्रत्येक कुटुंबातील 5 सदस्य पकडले असता, सुमारे 48 हजार जण हे उघडय़ावर प्रात:विधीसाठी जात असल्याची माहिती या सव्र्हेतून समोर आली होती. परंतु आता गुगल मॅपला ही शौचालये जोडली जाणार असल्याने याचे प्रमाण कमी होईल असा कयास पालिकेने लावला आहे.