शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

‘गुडविन ज्वेलर्स’च्या भागीदारांना आता डोंबिवलीच्या गुन्ह्यात अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2019 22:06 IST

‘गुडविन ज्वेलर्स’च्या फसवणुकीतील आमचे पैसे लवकर मिळवून द्या, अशी मागणी करून डोंबिवलीतील गुंतवणूकदारांच्या एका शिष्टमंडळाने ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्याकडे गुरुवारी गा-हाणे मांडले. या सर्वांना पोलिसांकडून सर्वतोपरी मदत केली जाईल, अशी ग्वाही यावेळी आयुक्तांनी या शिष्टमंडळाला दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.

ठळक मुद्देगुंतवणूकदारांचे पोलीस आयुक्तांना साकडेसर्वतोपरी मदत करण्याची दिली ग्वाही

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : ‘गुडविन ज्वेलर्स’चे मालक आणि या फसवणुकीतील मुख्य आरोपी सुनीलकुमार आणि सुधीरकुमार अकराकरण या दोन्ही भावांना ठाणे आर्थिक गुन्हे शाखेने आता डोंबिवलीच्या गुन्ह्यामध्ये गुरुवारी अटक केली. दरम्यान, या फसवणुकीतील आमचे पैसे लवकर मिळवून द्या, अशी मागणी करून गुंतवणूकदारांच्या एका शिष्टमंडळाने पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्याकडे गाºहाणे मांडले. या सर्वांना पोलिसांकडून सर्वतोपरी मदत केली जाईल, अशी ग्वाही यावेळी आयुक्तांनी या शिष्टमंडळाला दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.ठाण्यातील नौपाडा पोलीस ठाण्यात अकराकरण बंधूंविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. सुरुवातीला एक कोटी ७१ लाखांच्या फसवणुकीचा हा गुन्हा दाखल झाला होता. या दोघांनीही ठाणे न्यायालयात शरणागती पत्करल्यानंतर त्यांना सुरुवातीला या गुन्ह्यात आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली. त्यांना २४ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी मिळाली होती. त्यानंतर ठाणे न्यायालयाने २६ डिसेंबरपर्यंत तीत वाढ मिळाली होती. या कोठडीची मुदत गुरुवारी संपल्यानंतर त्यांना आता डोंबिवलीतील चार कोटींच्या फसवणूक प्रकरणामध्ये न्यायालयाच्या परवानगीने अटक केली आहे.दरम्यान, पोलीस आयुक्त फणसळकर यांची डोंबिवलीतील ‘गुडविन ज्वेलर्स’च्या गुंतवणूकदारांनी गुरुवारी भेट घेतली. गुडविनच्या संपत्तीमधून लवकरात लवकर आमचे पैसे परत मिळावेत, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. न्यायालयीन प्रक्रियेसाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासनही या शिष्टमंडळातील गुंतवणूकदारांनी आयुक्तांना दिले. यावेळी पोलीस आयुक्तांनी अंबरनाथ तसेच डोंबिवलीतील गुंतवणूकदारांना सर्वांच्या सोयीने एखाद्या दिवशी बोलवून त्यादिवशी उर्वरित कागदपत्रांची पूर्तता केली जाईल. त्याद्वारे आवश्यक ती माहितीही यावेळी गोळा करण्यात येईल. त्यामुळे गुंतवणूकदारांच्या वेळेमध्येही बचत होईल. तसेच न्यायालयाच्या मार्फतीने आरोपींच्या मालमत्तेच्या लिलावाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर गुंतवणूकदारांचे पैसेही परत करण्यात येतील. पण, या सर्व प्रक्रियेला काहीसा वेळ लागणार असल्याचेही आयुक्त फणसळकर यांनी स्पष्ट केले. पोलिसांच्या वतीने गुंतवणूकदारांना सर्वतोपरी मदत केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

 

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजी