शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

#GoodBye2017: एक दिवसाच्या जल्लोषाचा विशेष परवाना बेकायदा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2017 02:56 IST

ठाणे- ३१ डिसेंबरसारख्या एक दिवसाच्या जल्लोषासाठी अग्निसुरक्षेचा विशेष परवाना देण्याची कोणतीही तरतूद कायद्यात धक्कादायक माहिती अग्निशमन अधिका-यांनी दिली.

डोंबिवली- ३१ डिसेंबरसारख्या एक दिवसाच्या जल्लोषासाठी अग्निसुरक्षेचा विशेष परवाना देण्याची कोणतीही तरतूद कायद्यात धक्कादायक माहिती अग्निशमन अधिका-यांनी दिली. कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात लहान-मोठी सुमारे ९०० हॉटेल आहेत. ३१ डिसेंबरसह विविध सण-उत्सवांसाठी गर्दी होते. पण यातील ब-याचशा पार्ट्यांची कल्पनाच आम्हाला नसल्याने त्यावर नियंत्रण ठेवणार कसे, असा प्रश्न अग्निशमन दलाच्या अधिका-यांनी उपस्थित केला. एक्साईज विभागही अशा विशेष तरतुदीसाठी प्रयत्नशील असल्याची माहिती त्यांच्या अधिकाºयांनी दिली. त्यामुळे कल्याण-डोंबिवलीसह ठाणे जिल्ह्यात ३१ डिसेंबरच्या निरोपासाठी आणि नववर्षाच्या स्वागतासाठी होणाºया पार्ट्यांमध्ये आपत्कालीन परिस्थिती ओढावल्यास तिला सामोरे कसे जायचे, हा मोठा पेच आहे. कल्याण-डोंबिवलीत मोकळ््या जागेत, हॉलमध्ये होणाºया समारंभांत जर आपत्कालीन परिस्थिती ओढवली, तर अडचणीत वाढ होणार असल्याचे सांगण्यात आले. अग्नीशमन दलाच्या अधिकाºयांशी चर्चा केल्यावर त्यांनीही नेमक्या किती ठिकाणी मोठ्या प्रमाणात पार्ट्या होणार आहेत, याची माहिती नसल्याचे सांगितले. त्यासंदर्भात ३० डिसेंबरला संध्याकाळी माहिती मिळेल, असे जिल्हाधिकारी कार्यालयाने सांगितले आहे. तशी माहिती मिळाली तरी संध्याकाळनंतर नेमक्या किती ठिकाणी पोचता येईल, याबद्दल ते साशंक आहेत.>अंबरनाथ-बदलापुरात निम्मीच सुरक्षाअंबरनाथ, बदलापूर परिसरात निम्म्याच हॉटेलांनी सुरक्षेचे नियम कसेबसे पाळल्याची माहिती असून उरलेल्या ठिकाणी या नियमांकडे सपशेल दुर्लक्ष होत असल्याचे दिसून आले.नववर्षानिमित्त सर्व हॉटेल आणि धाबे फुल्ल होणार आहेत, याची कल्पना असतानाही अंबरनाथ पालिकेच्या अग्निशमन विभागामार्फत कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नाही. शहरात ३० ते ३५ हॉटेलांनाच परवानगी देण्यात आली आहे. उरलेली सर्व हॉटेल बेकायदा सुरू राहतील.मुंबईतील आगीनंतर अग्निशमन विभाग जागा झाला आहे. त्यांनी आता शहरातील हॉटेल, धाबे यांच्या सुरक्षेची चाचणी सुरू केली आहे. बदलापूर आणि परिसरात अग्नीशमन विभागाच्या ना हरकत दाखल्यांच्या जीवावर अवघ्या ३५ हॉटेलमध्ये सुरक्षेचे उपाय योजल्याची शक्यता आहे. निम्म्या हॉटेलांनीच सुरक्षेकडे लक्ष पुरवले आहे. उरलेल्यांनी सुरक्षेच्या कोणत्याच उपाययोजना आखलेल्या नाहीत. त्यामुळे या दोन्ही शहरांतील नागरिकांची सुरक्षा रामभरोसे आहे.