शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे, पालघर, रायगड जिल्हावासीयांना खुशखबर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 14:00 IST

Corona Vaccine: तिन्ही जिल्ह्यांसाठी एक लाख कोरोनाच्या लसी प्राप्त 

ठाणे : मागील सात ते आठ महिन्यांपासून संपूर्ण देशभरात कोरोना या आजाराने थैमान घातले. या आजाराने अनेकांचे बळी घेतले आहे. त्यात सुरुवातीला या आजारावर कोणतेच ठोस औषध नसल्याने या आजाराबाबत नागरिकांच्या मनात प्रचंड भीती पसरली होती. तसेच या आजाराचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, यावर लस कधी येणार याची प्रतीक्षा सर्व सामान्य नागरिकांपासून सर्वांनाच लागून होती. आता, कोरोनाचा लसीची प्रतीक्षा  संपली असून ठाणे पालघर आणि रायगड जिल्ह्यासाठी एक लाख लसी आरोग्य उप संचालक विभागाकडे बुधवारी पहाटे प्राप्त झाल्या असून लवकरच तिन्ही जिल्ह्यातील लसीकरण केंद्रावर याचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली. 

    संपूर्ण देशाभारासह ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यात कोरोना या आजाराने हाहाकार उडवून दिला. त्यात या तिन्ही जिल्ह्यांपैकी ठाणे जिल्ह्यात बाधित रुग्णांसह या आजाराने मृत्यू होणार्यांची संख्या देखील अधिक आहे. त्यात या आजारावर लस कधी येणार याबाबत साशंकता निर्माण झाली होती. मात्र, मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यासाठी एक लाख 3 हजार लासी प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे या तिन्ही जिल्ह्यातील नागरिकांची लसीची प्रतीक्षा संपुष्टात आली असून दिलासा मिळाला आहे. त्यानुसार ठाणे जिल्ह्यासाठी सर्वाधिक 74 हजार लसी प्राप्त झाल्या असून जिल्ह्यातील 29 केंद्रांवर त्यांचे वितरीत करण्यात येणार आहेत. तर, पालघर जिल्ह्यासाठी 19 हजार 500 लसी ह्या सहा केंद्रांवर तर, रायगड जिल्ह्यासाठी 9 हजार 500 लसींचे पाच केंद्रांवर वितरण करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस