शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

असंघटित कामगारांसाठी चांगला निर्णय लवकरच घेतला जाणार - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

By जितेंद्र कालेकर | Updated: October 16, 2022 21:25 IST

असंघटित कामगारांसाठी लवकरच चांगला निर्णय घेतला जाणार असल्याची ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी ठाण्यात दिली.

ठाणे:

असंघटित कामगारांसाठी लवकरच चांगला निर्णय घेतला जाणार असल्याची ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी ठाण्यात दिली. गेल्या काही दिवसांपासून बंजारा भवनाची मागणीही पूर्ण केली जाणार असून त्याबाबत सिडकोच्या अधिकाºयांबरोबर चर्चा करुन हा प्रश्न मार्गी लावणार असल्याचेही शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केले. 

आॅल इंडिया बंजारा सेवा संघाच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा भव्य सत्काराचा तसेच अत्याधुनिक रुग्णवाहिकेच्या लोकार्पणाचा कार्यक्रम ठाण्यातील ढोकाळी येथील हायलँड मैदानात आयोजित केला होता. त्याप्रसंगी आपल्या सत्काराला उत्तर देतांना मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. महाराष्टÑासह कर्नाटक, तेलंगणा आणि उत्तरप्रदेश येथूनही मोठया प्रमाणात बंजारा समाज बांधव आणि महिलांची मोठया प्रमाणात उपस्थिती होते. मुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या भाषणाची सुरुवात बंजारा भाषेतून केली. त्याला उपस्थितांनी टाळयांच्या गजरात दाद दिली. मुख्यमंत्री पुढे म्हणाले, या समाजाचे महाराष्टÑाच्या उभारणीत, विकासात मोठे योगदान आहे. हा कष्टकरी समाज असला तरी शिक्षणापासून वंचित आहे. आता तो मागे राहणार नाही. तुमचे हक्काचे सरकार आहे, अशी ग्वाही त्यांनी दिली. या समाजाने चांगले दिवस पाहिले पाहिजे. मेहनतीबरोबर मुलांना चांगले शिक्षण द्या. उद्योग, रोजगार आणि नोकरीसाठी सरकार मदत करेल. समाजाला न्याय देण्याचेही काम करणार आहे. गेल्या तीन महिन्यात ५०० हून अधिक अध्यादेश आणि ७२ मोठे निर्णय सरकारने घेतले. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी कृती आराखडा केला जात आहे उसतोड कामगारांसाठी नाक्यावरील असंघटीत कामगारांसाठी लवकरच चांगला निर्णय घेतला जाणार आहे. तांडा वस्तीचा विकास करण्यासाठी त्याठिकाणी मुलभूत सुविधा पुरविण्यात येणार आहे. पोहरा देवीचे बंद पडलेले काम तातडीने सुरु केले जाईल. या समाजाला न्याय देण्याचे तसेच इतरही समस्या सोडविण्याचे काम संजय राठोड यांच्या केले जाणार असल्याची ग्वाही 

सेवा लाल जयंतीला जिल्हाधिकारी स्तरावर सुटी-सेवालाल जयंतीच्या दिवशी सार्वजनिक सुटी देण्याची तसेच बंजारा भवनासाठी जागा देण्याची मागणी सुरुवातीला बंजारा समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. शंकर पवार यांनी केली. या दोन्ही मागण्या मुख्यमंत्र्यांनी मान्य करीत सेवाललाल जयंतीच्या दिवशी जिल्हाधिकारी स्तरावर सुटी देण्याचे जाहीर केले. तर सिडको अधिकाºयांशी बोलून लवकरच नवी मुंबईत बंजारा भवनासाठी जागा दिली जाणार असल्याची ग्वाही यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली. म्हणूनच आले ५० आमदारराज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड हे सहकारी असल्यामुळे त्यांच्यावरील संकटात त्यांच्या मागे खंबीरपणे उभा राहिलो. दिलेला शब्द पाळतो म्हणूनच आपल्या सोबत ५० आमदार आल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला.पोहरादेवी तीर्थस्थळाच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही - उपमुख्यमंत्रीबंजारा भाषेतून संवाद साधत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, बंजारा समाज हा सिंधू संस्कृतीशी नाते सांगणारा आहे. पर्यावरणाची पूजा करणारा हा समाज आहे. टॅटू चा जनक हा समाज आहे. या समाजाकडे मोठे ज्ञान भांडार आहे. अशा या बंजारा समाजाच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेऊन सर्व प्रश्न मार्गी लावण्यात येईल. तसेच केंद्र शासनाकडे असलेले प्रलंबित प्रश्न ही तातडीने सोडविण्यासाठी नेहमी प्रयत्न करू. देशभरात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जे राष्ट्रीय महामार्ग बनविले ते सर्व हे लमाण मार्गावर आहेत. या मार्गावरूनच पारंपरिक बंजारा समाज भ्रमण करत असे. सेवालाल महाराज यांच्या रूपाने समाजाला दिशा, विचार देणारे संत मिळाले. त्याच्यामुळे समाजाचे वैश्विक संघटन तयार झाले. पोहरादेवी विकासासाठी शंभर कोटी दिले. त्याचे काम आता वेगाने पूर्ण होईल. जागतिक दजार्चे हे स्थान होईल. पोहरा देवीच्या विकासासाठी एक पैसाही कमी पडू देणार नाही.अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड म्हणाले की, गरिब, कष्टकरी असलेला बंजारा समाजाचे अनेक प्रश्न आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील राज्य शासन बंजारा समाजाच्या सर्व मागण्या सोडवेल असा विश्वास आहे. या समाजासाठी मुंबईत हक्काचे भवन उभारण्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी. तसेच जातीच्या आरक्षणासंबंधी एकसुत्रीपणा आणण्यासाठी राज्य शासनाने मदत करावी. समाजातील विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणासाठी सवलती, वसतीगृहात प्रवेश याबरोबरच नागरी सुविधा मिळाव्यात. 

यावेळी संघाचे अध्यक्ष शंकर पवार यांनी प्रास्ताविकात समाजाच्या मागण्या मांडल्या. गुलबग्यार्चे खासदार उमेश जाधव यांनीही मनोगत व्यक्त केले.

टॅग्स :thaneठाणेEknath Shindeएकनाथ शिंदे