शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
5
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
6
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
7
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
8
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
9
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
10
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
11
आयोग नव्हे, मतदारच राजा !
12
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
13
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
14
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
15
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
16
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
17
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
18
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
19
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
20
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी

भाईंदर येथील कांदळवनाजवळ दिसला सुवर्णकोल्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2019 02:06 IST

भाईंदर पोलीस ठाण्यामागे कांदळवनाजवळ असलेल्या नेहरूनगर झोपडपट्टीत शनिवारी ‘गोल्डन फॉक्स’ अर्थात ‘सुवर्ण कोल्हा’ आढळला. त्याच्या पायाला जखम झालेली होती.

मीरा रोड : भाईंदर पोलीस ठाण्यामागे कांदळवनाजवळ असलेल्या नेहरूनगर झोपडपट्टीत शनिवारी ‘गोल्डन फॉक्स’ अर्थात ‘सुवर्ण कोल्हा’ आढळला. त्याच्या पायाला जखम झालेली होती. अग्निशमन दलाने प्राणिमित्रांच्या मदतीने त्याला पकडून ठाणे वनविभागाकडे सुपुर्द केले. ३० वर्षांनंतर या भागात कोल्हा दिसला, असे रहिवाशांचे म्हणणे आहे. आधीच या भागात फ्लेमिंगो, सीगल व अन्य वन्य पक्षी येत असताना आता कोल्ह्याचे दर्शन घडले.नेहरूनगरमध्ये राहणाऱ्या कमळीबाई माछी यांच्या घराच्या व्हरांड्यात अडगळीत शनिवारी सकाळी हा कोल्हा दिसला. त्याला हटकले असता सुरुवातीला कुत्रा असल्याचे वाटले. पण, शेजारी राहणारे प्रभाकर मांगेला जेव्हा पाहायला आले, तेव्हा त्यांना हा कुत्रा नसून कोल्हा असल्याचे लक्षात आले.प्रभाकर यांनी याबद्दल अग्निशमन दलास कळवले. या दलातून त्यांना वनविभागाचा क्रमांक देण्यात आला. तसेच दिलीप रणावरेंसह अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी गेले. अक्षय पाटील व अ‍ॅलॅक्स डिसोझा हे प्राणिमित्र तरुणही घटनास्थळी आले.कोल्ह्याच्या गळ्यात फास टाकला असता त्याने झटक्यात दोरी चावून तोडून टाकली. तो चावण्यास धावून येत असल्याने काहीसे भीतीचे वातावरण नागरिकांमध्ये पसरले. त्याच्या पायाला जखम झाली होती.परंतु, अग्निशमन दलाचे जवान व प्राणिमित्रांनी कुशलतेने कोल्ह्याला पकडून अग्निशमन केंद्रात आणले. तेथून त्याला ठाण्याच्या तीनहातनाका येथील वनविभागाच्या कार्यालयात नेण्यात आले.कोल्ह्याची वैद्यकीय तपासणी व जखमेवर उपचार करू. वनविभागाचे अधिकारीही तेथे जाऊन पाहणी करतील व आपला अहवाल देतील, असे उपवनसंरक्षक जितेंद्र रामगावकर यांनी सांगितले.वाढत्या शहरीकरणाचा परिणामवाढत्या शहरीकरणात येथील कांदळवनाची तोड, भराव, बेकायदा झोपड्या व बांधकामे, कचरा-सांडपाण्यामुळे खाड्यांचे प्रदूषण आदींमुळे जंगलात आहार कमी झाल्याने हा कोल्हा भक्ष्याच्या शोधार्थ आला असावा, अशी शक्यता वनशक्तीचे स्टॅलिन दयानंद यांनी वर्तवली आहे.

 

टॅग्स :thaneठाणे