शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

शूटिंग चॅम्पियनशिप 50 मीटर फ्री पिस्टल स्पर्धेत डोंबिवलीच्या तरुणाची सुवर्ण कामगिरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2017 17:09 IST

मुंबई वरळी येथे नुकत्याच पार पडलेल्या 27 व्या ऑल इंडिया जी. वी. मावळकर शूटिंग चॅम्पियनशीप 50 मीटर फ्री पिस्टल इव्हेंटमध्ये डोंबिवलीतील विकास शिवाजी पोटे या तरुणाने सुवर्ण कामगिरी केली आहे.

डोंबिवली- मुंबई वरळी येथे नुकत्याच पार पडलेल्या 27 व्या ऑल इंडिया जी. वी. मावळकर शूटिंग चॅम्पियनशीप 50 मीटर फ्री पिस्टल इव्हेंटमध्ये डोंबिवलीतील विकास शिवाजी पोटे या तरुणाने सुवर्ण कामगिरी केली आहे. पुरुष कॅटेगरीतून 300 पैकी 261 गुण पोटेला मिळाल्याने तो सुवर्ण पदाची मानकरी ठरला आहे. भारतातून आलेल्या 110 शूटर्सना पोटे याने मागे टाकले आहे.ही स्पर्धा नुकतीच 25 सप्टेंबर रोजी वरळी पार पडली. पोटे याने 2015 साली नेमबाजी खेळाला सुरुवात केली. ठाण्यातील शूटिंग रेंजमध्ये त्याने सुरुवातीला एक महिना सराव केला. डोंबिवलीतील शूटिंग रेंजला त्याने भेट दिली. तेव्हा त्या ठिकाणी पुण्यातील गन फॉर ग्लोरीची शाखा सुरू झाल्याचे समजले. त्या ठिकाणी रेंजचे व्यवस्थापन चांगले असल्याने त्याने चांगली तयारी करण्याचा विचार मनाशी पक्का केला. खेळ खर्चिक असला तरी त्यावर मात करायची आणि कौशल्य हस्तगत करण्याचा चंग मनाशी बांधला. 2016 साली त्याने प्रथमच शूटिंग रेंजमध्ये सहभाग घेतला. पहिल्याच स्पर्धेत 400 पैकी 366 गुण मिळविले. त्यावेळी त्याला पहिलेच सुवर्ण पदक मिळाले. त्यामुळे त्याला राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळाली.26 व्या जी. वी मावळकर शूटींग स्पर्धेत 10 मीटर  अतरांच्या नेमबाजीत 400 पैकी 380 गुण मिळविले. त्याठिकाणी त्याचे सुवर्ण पदक हुकले. मात्र रौप्य पदक मिळाले. त्यानंतर 60 व्या नॅशलन शूटिंग रेंज स्पर्धेत 10 मीटरच्या रेंजमध्ये नेमबाजीकराता नॅशनल क्वालीफाई झाला. रेनॉड शॉट शूटर ही उपाधी मिळाली. 50 मीटरचा पल्ला त्याने पार करीत सुवर्ण पदक मिळाविल्याने त्याला आत्ता ऑलंपीक स्पर्धेचे वेध लागले आहे. त्याचे पुढील लक्ष्य औलंपिक खेळाचे आहे. त्यात सहभागी होऊन देशाला सुवर्ण पदक मिळवून देण्याचा मानस त्याने व्यक्त केला