-----------------------------------------------
रिक्षाची चोरी
कल्याण : सउदी अक्रम शेख यांनी त्यांची रिक्षा मंगळवारी गोविंदवाडी बायपास ब्रिजवर खोत यांच्या बिल्डिंगसमोर उभी केली होती. तेथून ती रिक्षा मध्यरात्री चोरीला गेली. याप्रकरणी शेख यांनी दिलेल्या तक्रारीवरून बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
-----------------------------------------------
‘लसीकरण केंद्र सुरू करा’
डोंबिवली : केडीएमसी परिक्षेत्रात प्रतिदिन कोरोना रुग्ण वाढत असून दुसरीकडे लसीकरण मोहीम युद्धपातळीवर सुरू आहे. लसीकरणासाठी सध्या कार्यरत असलेली केंद्रे अपुरी पडत असल्याने डोंबिवली परिसरातील बालाजी गार्डन, दावडी येथील रिजन्सी संकुल, गोग्रासवाडी, कासाबेला/कासारिओ, गांधीनगर, पी ॲण्ड टी कॉलनी, लोकग्राम, पिसवली/आडिवली, देशमुख होम्ससह इतर दाटीवाटीच्या लोकवस्तीमध्ये लसीकरण केंद्रे सुरू करा, अशी मागणी कल्याण ग्रामीणचे आमदार प्रमोद (राजू) पाटील यांनी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
-----------------------------------------------
‘संरक्षक भिंत बांधावी’
कल्याण : कल्याण रेल्वेस्टेशन येथील फलाट क्रमांक १ची संरक्षक भिंत तुटलेल्या अवस्थेत आहे. या अर्धवट स्थितीतील तुटलेल्या भिंतीमुळे प्रवासी ये-जा करत असून प्रसंगी अपघात होऊन त्यांचे मृत्यूही होत आहेत. मागील वर्षी एका तरुणीचा असाच अपघाती मृत्यू झाला होता. त्यामुळे ही भिंत तातडीने बांधण्यात यावी, अशी मागणी मनसेचे शहर संघटक रूपेश भोईर यांनी कल्याण रेल्वे स्टेशनच्या प्रबंधकांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
-------------------------------------------------