शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

धीरेंद्र शास्त्रींच्या दरबारात सापडली सोनसाखळी, प्रामाणिक महाराष्ट्र सुरक्षा बल जवानाचे कौतुक 

By धीरज परब | Updated: March 22, 2023 13:38 IST

धीरेंद्र शास्त्री यांच्या दर्शन सोहळ्यासाठी १८ आणि १९ मार्च रोजी भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती.

मीरारोड - बागेश्वर धामचे बाबा धीरेंद्र शास्त्री यांच्या दर्शन सोहळ्यात तब्बल ३६ महिलांच्या गळ्यातील दागिने महिला चोरांनी चोरल्याचा प्रकार घडला होता. पण त्याठिकाणी बंदोबस्तास असलेल्या महाराष्ट्र सुरक्षा बलच्या जवानाने २ लाखांची सापडलेली सोनसाखळी पोलिसांच्या स्वाधीन करून प्रामाणिकपणाचे दर्शन घडवले. 

मीरारोडच्या श्रीकांत जिचकार चौक ( एसके स्टोन चौकी ) जवळील मैदानात धीरेंद्र शास्त्री यांच्या दर्शन सोहळ्यासाठी १८ आणि १९ मार्च रोजी भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती. गर्दीचा फायदा घेऊन महिला चोरांच्या टोळीने धुमाकूळ घालत पहिल्याच दिवशी ३६ महिलांच्या गळ्यातील सोनसाखळ्या व मंगळसूत्र चोरली . 

एकीकडे चोरट्यांनी धुमाकूळ घातला असताना दुसरीकडे त्याच कार्यक्रम ठिकाणी बंदोबस्त साठी तैनात मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या सेवेतील महाराष्ट्र सुरक्षा बलचे जवान शिवाजी केदार यांना गर्दीच्या ठिकाणी २ लाख रुपये किमतीची सोन्याची साखळी सापडली. केदार यांनी ती महागडी सोन्याची चैन मीरारोड पोलिसांच्या स्वाधीन केली. केदार यांच्या प्रामाणिकपणा बद्दल पोलिसांसह मीरा भाईंदर महापालिकेचे आयुक्त दिलीप ढोले यांनी शाल, पुष्पगुच्छ देऊन कौतुक केले. 

टॅग्स :bageshwar dhamबागेश्वर धाम