शहरं
Join us  
Trending Stories
1
यश दयालसमोर धोनी ठरला फिका! नो बॉल.. फ्री हिट ट्विस्टनंतरही CSK नं गमावला सामना, RCB टॉपला
2
भारत-पाक सीमेवर मोठी कारवाई, राजस्थानात पाकिस्तानी रेंजर ताब्यात!
3
आयपीएल २०२५ मध्ये युवा फलंदाजांचा दबदबा, आरसीबीविरुद्ध आयुष म्हात्रेचं सुपरफास्ट अर्धशतक
4
अँथनी अल्बानीज पुन्हा होणार ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान! ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींनी केलं अभिनंदन
5
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
6
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
7
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
8
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
9
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
10
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
11
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
12
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
13
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
14
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
15
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
16
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
17
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं
18
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
19
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी
20
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान

९३ कोटींच्या नालेबांधणी कंत्राटाचे गौडबंगाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2018 04:20 IST

केंद्र सरकारच्या अमृत अभियान अंतर्गत राज्य सरकारने मंजूर केलेल्या ९३ कोटींच्या मीरा- भार्इंदर पालिकेच्या पर्जन्य जलवाहिनी बांधण्याच्या कामाचा कार्यादेश देऊन चार महिने उलटले तरी अजून कामाला सुरूवातच झालेली नाही.

- धीरज परबमीरा रोड : केंद्र सरकारच्या अमृत अभियान अंतर्गत राज्य सरकारने मंजूर केलेल्या ९३ कोटींच्या मीरा- भार्इंदर पालिकेच्या पर्जन्य जलवाहिनी बांधण्याच्या कामाचा कार्यादेश देऊन चार महिने उलटले तरी अजून कामाला सुरूवातच झालेली नाही. अनुदानापोटी १४ कोटींचा पहिला हप्ता पालिकेत फेब्रुवारीपासून पडून आहे. एकूण २२ काँक्रिटचे नाले बांधण्याचे काम एकाच कंत्राटदाराला दिले असून आपल्या मर्जीतले उपकंत्राटदार घुसवणे व टक्केवारी यामुळे काम सुरू झाले नसल्याचे समजते.मीरा- भार्इंदर महापालिकेने पावसाळी पाण्याचा निचरा होण्यासाठी सध्याचे पाणी वाहून जाण्याच्या २२ मार्गांचे काँक्रि टीकरण करण्याचा दुसऱ्या टप्प्याचा प्रस्ताव तयार केला होता. या आधी महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान योजने अंतर्गत हे काम केले जाणार होते. जून २०१५ मध्ये सरकारने महापालिकेस या कामासाठी एमएमआरडीएकडून ८० कोटी ४२ लाखांचे कर्ज घेण्यास मंजुरी दिली होती.दरम्यान, केंद्राच्या अमृत अभियान अंतर्गत मीरा- भार्इंदर महापालिकेचा समावेश झाल्यावर पर्जन्य जलवाहिन्या बांधण्याच्या दुसºया टप्प्याचे काम अमृत योजनेतून करण्याचे सरकारने मंजूर केले. त्यासाठी जुलै २०१७ मध्ये २२ काँक्रिटचे नाले बांधण्यासाठी ९४ कोटी खर्चाच्या प्रकल्पास मान्यता दिली.एकूण ९४ कोटींच्या या प्रकल्पासाठी केंद्राने ५० टक्क्या नुसार ४७ कोटी ३ लाख व राज्य सरकार २५ टक्क्या प्रमाणे २३ कोटी ५१ लाख इतके अनुदान देणार आहे. तर महापालिकेला स्वत:चा २५ टक्के म्हणजेच २३ कोटी ५१ लाख खर्चाचा वाटा उचलायचा आहे. कार्यादेश दिल्यापासून दोन वर्षात काम पूर्ण करायचे आहे. या कामाचा निधी तीन हप्त्यात सरकार देणार असून पहिला हप्ता २० टक्के रकमेचा तर उर्वरित दोन्ही हप्ते हे प्रत्येकी ४० टक्के रकमेचे असतील. ही कामे वेळेत पूर्ण करून घेण्यासह सर्व जबाबदारी ही आयुक्तांवर सोपवली आहे.महापालिकेने नाले बांधणीसाठी जुलै २०१७ मध्ये निविदा कढल्या होत्या. या सर्व २२ कामांचे ९२ कोटी ९६ लाख खर्चाचे कंत्राट आर अ‍ॅन्ड बी इन्फ्रा प्रोजेक्टस या कंपनीला दिले. २२ पैकी ११ काँक्रिट नाले सीआरझेड, कांदळवन, पाणथळ क्षेत्रातील असल्याने त्याची मंजुरी प्रलंबित आहे. २९ जानेवारीला उर्वरित ११ कामांचे आदेश दिले. पालिकेने कार्यादेश देण्याआधी कंत्राटदाराकडून १ कोटी ८९ लाखांची अनामत रक्कमही देखील भरुन घेतली आहे. कार्यकारी अभियंता दीपक खांबित यांनी कंत्राटदारास आदेश मिळताच तीन दिवसाच्या आत काम सुरु करण्यास सांगितले होते. महत्वाचे म्हणजे इतक्या मोठ्या रकमेचे काम हे कनिष्ठ अभियंता चेतन म्हात्रे यांच्यावर सोपवले आहे. साडेचार महिने झाले तरी काम मात्र सुरू झालेले नाही. फेब्रुवारीतच अनुदानाचा सुमारे १४ कोटींचा पहिला हप्ता पालिकेकडे आला. ही रक्कम अन्य कामांसाठी वापरायची नसली तरी ती नेमकी वेगळया खात्यात सुरक्षित आहे की अन्यत्र वापरात आणली गेली हे मात्र समजू शकलेले नाही.पावसाळ्यानंतर कामाला सुरुवातया प्रकरणी कार्यकारी अभियंता दीपक खांबित व कनिष्ठ अभियंता सचिन म्हात्रे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी फोन उचलला नाही. शहर अभियंता शिवाजी बारकुंड यांनी मात्र या प्रकरणी बोलण्यास नकार देतानाच सध्या पावसाळा असून त्यानंतर नाल्यांच्या कामास सुरूवात होईल असे सांगितले.

टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुकnewsबातम्या