शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

अधिकृत बिल्डरांची ‘केडीएमसी’कडून गोची; नव्या नगर परिषदेच्या प्रक्रियेमुळे फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2020 00:20 IST

विकास शुल्क घेण्यास नकार

कल्याण : केडीएमसीतील १८ गावांची स्वतंत्र नगर परिषद स्थापन करण्याची प्रक्रिया सरकारने सुरू केली आहे. त्याचा फटका या गावांमधील अधिकृत बांधकाम करणाऱ्या बिल्डरांना बसला आहे. मनपाने त्यांच्या बांधकाम प्रस्तावांना मंजुरी दिली आहे, परंतु त्यांच्याकडून विकास शुल्क घेण्यास नकार दिला आहे. त्यामुळे बिल्डरांची गोची झाली आहे.

राज्य सरकारने केडीएमसीतील २७ पैकी १८ गावे वगळून त्यांची स्वतंत्र नगर परिषद स्थापन करण्याची अधिसूचना काढली आहे. त्याबाबत हरकती व सूचना जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत मागविल्या होत्या. मात्र, ही गावे केडीएमसीत असताना अधिकृत बिल्डरांनी गावांमध्ये इमारती उभारण्यासाठी आराखडा मनपाच्या नगररचना विभागाकडे मंजुरीसाठी पाठविला होता. मनपानेही त्यांना मंजुरी दिली आहे. मात्र, त्यांच्याकडून विकास शुल्क स्वीकारण्यास नकार दिला आहे. कारण, १८ गावे केडीएमसीतून वगळण्याच्या प्रक्रियेस २४ जूनला सुरुवात झाली आहे.

१८ गावांमधील नांदिवली येथे इमारत उभारण्यासाठी बांधकाम परवानगी बिल्डर मनोज राय यांनी महापालिकेकडे मागितली होती. मार्चमध्ये त्यांना मंजुरी मिळाली. त्यामुळे त्यांनी इमारतीसाठी एक कोटी २४ लाख रुपयांचे विकास शुल्क भरण्याची तयारी केडीएमसीच्या नगररचना विभागाकडे दर्शवली. मात्र, या विभागाने १८ गावे वगळण्यात येणार असल्याने ते शुल्क घेतले नाही. राज्य सरकार ही गावे कधी केडीएसीतून वगळते, तर कधी पुन्हा समाविष्ट करते. सरकारच्या धरसोड वृत्तीचा फटका अधिकृत बांधकाम करणाºया बिल्डरांना बसला असल्याचे राय यांनी सांगितले.

मग मंजुरीचे काय करायचे? बिल्डरांचा सवाल

लॉकडाऊनमुळे केडीएमसीच्या पाणीपट्टी व घरपट्टीच्या करवसुलीवर परिणाम झाला आहे. महापालिकेच्या तिजोरीत विकास शुल्कापोटी बºयापैकी रक्कम जमा होते. मग, आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी विकास शुल्क स्वीकारण्याऐवजी नाकारणे कितपत योग्य आहे.विकास शुल्क भरायचे नाही, तर मंजुरीचे काय करायचे. त्याला दुसरा पर्याय प्रशासनाने दिलेला नाही. लॉकडाऊनमुळे रिअल इस्टेटचा व्यवसाय मंदावला आहे. त्यात महापालिकेकडून केली जाणारी गोची अधिकच अडचणीची ठरत असल्याचे बिल्डरांनी सांगितले.

38,000 कोटींचा महसूल बुडाला

२७ गावांसाठी एमएमआरडीएने विकास आराखडा तयार केला होता. त्याला मूलत: मंजुरी मिळण्यासाठी २०१४ साल उजाडले. तर, दुसरीकडे २७ गावांमध्ये 79,000 पेक्षा जास्त बेकायदा बांधकामे उभी राहिली. त्यात घरे घेणाऱ्यांची अनेकांनी फसवणूक केली.याशिवाय, केवळ दोन वर्षांचा हिशेब केल्यास बेकायदा बांधकामांमुळे ३८ हजार कोटी रुपयांचा सरकारी महसूल बुडाला आहे. बेकायदा बांधकामांना मोकळे रान सोडून अधिकृत बिल्डरांची गोची करण्याचा हा प्रकार असल्याची ओरड अधिकृत बिल्डरांनी केली आहे.

१५ ते १८ कोटींचा महसूल बुडणार : केडीएमसीचे सहायक संचालक नगररचनाकार मा.द. राठोड म्हणाले की, १८ गावांमध्ये काही बिल्डरांना मार्चपूर्वी बांधकाम परवानगी दिली गेलेली आहे. सध्या त्यांच्याकडून विकास शुल्क घेणे बंद केले आहे, ही वस्तुस्थिती आहे. हे शुल्क न घेतल्यास महापालिकेच्या तिजोरीत १५ ते २० कोटींचा कमी महसूल जमा होऊ शकतो. १८ गावे वगळण्याची प्रक्रिया पूर्ण होऊन सरकार जो काही निर्णय घेईल, त्यानुसार पुढील कार्यवाही केली जाणार आहे.

टॅग्स :kalyanकल्याणkdmcकल्याण डोंबिवली महापालिका