शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

प्रशासनाने नोटीस देण्यापूर्वी कोचिंग क्लास सोबत बैठक करावी, संघटनेची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2019 14:02 IST

प्रशासनाने नोटीस देण्यापूर्वी कोचिंग क्लास सोबत बैठक करावी अशी मागणी संघटनेने केली आहे.

ठळक मुद्दे प्रशासनाने नोटीस देण्यापूर्वी कोचिंग क्लास सोबत बैठक करावी, संघटनेची मागणी तीन दिवसांपूर्वी शहरातील सर्व क्लासेसला नोटीस मध्ये दिलेल्या नऊ अटींची पुर्तता करावी असा आदेश सर्व सामान्यांचे क्लास आम्ही बंद पडू देणार नाही : संघटनेची मागणी

ठाणे : गुजरातमध्ये घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमिवर अग्निशमन विभागाने अग्निसुरक्षेच्या दृष्टीने शहरातील सर्व क्लासेसला सात दिवसांच्या आत उपाययोजना करण्यासंदर्भात नोटीस पाठविल्या असून अन्यथा क्लास बंद करावे असा आदेश दिला आहे. परंतू प्रशासनाने या नोटीस देण्यापुर्वी किंवा दिल्यानंतर एकदा तरी कोचिंग क्लास संचालकांसोबत एक बैठक करावी, आमचे म्हणणे ऐकावे आणि आम्हाला अग्निसुरक्षेच्या उपाययोजनासंदर्भात मार्गदर्शन करावे अशी मागणी कोचिंग क्लास संघटनेने गुरूवारी आयोजित पत्रकार परिषदेत केली आहे.            गुजरात राज्यातील सुरत शहरातील तक्षशिला कॉमप्लेक्समध्ये लागलेल्या आगीत निष्पाप २२ विद्यार्थ्यांचा नाहक बळी गेला. ही घटना घडल्यानंतर अग्निशमन विभागाने तीन दिवसांपूर्वी शहरातील सर्व क्लासेसला नोटीस मध्ये दिलेल्या नऊ अटींची पुर्तता करावी असा आदेश दिला आहे. यावर आक्षेप घेत कोचिंग क्लासेस संघटनेचे म्हणणे आहे की, प्रशासनाने संबंधीत क्लास संचालकांना धडाधड नोटीस दिली असून क्लास बंद करायला सांगितल्यामुळे आम्ही धास्तावलो आहोत. आमचा रोजगार या क्लासेसवर चालतो. क्लासेस बंद करायचे असतील तर आम्हाला शासकीय नोकऱ्या द्याव्यात अशी मागणी केली आहे. अग्निसुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजनासंदर्भात अग्निशमन विभागाकडे आम्ही बैठक घेण्याची मागणी केली पण त्यांनी आम्हाला बैठक नाकारली आहे, प्रशासन आम्हाला दाद देत नाही, शासनाने मसुदा संदर्भात कमिटी स्थापन केलेली नाही त्यामुळे शासन उदासीन आहे असा आरोप संघटनेने केला आहे. या घटनेमुळे सरसकट सगळे क्लास बंद करणे चुकीचे आहे यामुळे बेरोजगारी वाढेल, घरगुती क्लासेससंदर्भात सरसकट या नऊ अटी लावणे आम्हाला मान्य नाही फायर आॅडीट संदर्भाथ मार्गदर्शन करण्यासाठी आम्हाला शासकीय मार्गदर्शक द्यावा, सर्व सामान्यांचे क्लास आम्ही बंद पडू देणार नाही असे संघटनेचे अध्यक्ष सतिश देशमुख आणि सचिव सचिन सरोदे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

 

टॅग्स :thaneठाणेEducationशिक्षणGujaratगुजरात