शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

कबरस्तानसाठी जागा द्या अन्यथा आत्मदहन करीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2019 05:23 IST

मुस्लिम युवकाचा इशारा : सध्याची सुविधा अत्यंत अपुरी, प्रशासनाची धावपळ सुरू

भार्इंदर : पश्चिमेस मुस्लिम समाजाच्या कबरस्तानासाठी पालिकेने जागा दिली असली, तरी मुस्लिम लोकसंख्येच्या प्रमाणात ती अत्यंत अपुरी आहे. त्यामुळे पालिकेने पर्यायी व पुरेशी जागा द्यावी, अशी मागणी मुस्लिम समाजाचे अझीम तांबोळी या युवकाने केली आहे. त्यावर ठोस कार्यवाही होत नसल्याने संतापलेल्या अझीमने यंदा तर पालिकेतच आत्मदहन करू, अशा इशारा दिला आहे.

भार्इंदर पश्चिमेस महेशनगर व उत्तन येथे मुस्लिम समाजासाठी कबरस्तानाची सोय आहे, तर बोहरी समाजातील मुस्लिमांसाठी येथील आंबेडकरनगरसमोर स्वतंत्र कबरस्तान आहे. महेशनगर येथील कबरस्तानाची जागा केवळ सहा गुंठे इतकीच आहे. उत्तनचे कबरस्तान मूळ शहरापासून पाच ते सात किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे शहरी भागातील मुस्लिमांना महेशनगर येथील कबरस्तान सोेयीचे ठरते. याखेरीज, भार्इंदर पूर्वेला एकही कबरस्तान नसल्याने तेथील मुस्लिम समाजाला महेशनगर येथील कबरस्तानाचा आधार मिळतो.मीरा रोड येथे एकमेव कबरस्तान असून काजूपाडा, दहिसर चेकनाका ते मीरा रोड परिसरातील मुस्लिम समाजाला ते सोयीस्कर ठरत आहे. शहरातील मुस्लिमांची संख्या एक लाखाहून अधिक असून त्यापैकी भार्इंदर पूर्व-पश्चिम भागांत मुस्लिमांची लोकसंख्या २५ हजारांहून अधिक आहे.भार्इंदर पूर्वेच्या प्रस्तावित कबरस्तानावर सध्या वाद सुरू असल्याने त्याची निर्मिती अनिश्चित कालावधीसाठी लांबली आहे. त्यामुळे तेथील मुस्लिमांसाठी महेशनगरच्या कबरस्तानाचा पर्यायच महत्त्वाचा ठरू लागला आहे. या कबरस्तानाची जागा अत्यंत अपुरी असल्याने अनेकदा मृतदेह दफन करण्यासाठी जागा नाही. त्यामुळे दफनास विलंब लागतो, तर अनेकदा मृतदेह मीरा रोडच्या कबरस्तानात दफन करण्यासाठी न्यावा लागतो. यात वेळ व पैसा वाया जाऊन नातेवाइकांचा मनस्ताप वाढतो. तसेच मृतदेहाची हेळसांड होत असल्याने महेशनगर येथील कबरस्तानाला पर्यायी व पुरेशी जागा भार्इंदर पश्चिमेलाच उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी तांबोळी यांनी अनेक वर्षांपासून पालिकेकडे लावून धरली आहे. बांधकाम विभागाने नगररचना विभागाला पत्रव्यवहार करूनही जागा उपलब्धतेबाबत कळवूनही त्यावर अद्याप कोणतीही कार्यवाही न झाल्याने अझीम यांनी अखेर आत्मदहनाचा इशारा दिला आहे. यामुळे प्रशासनाची धावपळ सुरू झाली असून अझीम यांना आत्मदहनापासून परावृत्त करण्यासाठी पोलिसांना पत्र पाठवले आहे.सध्या महेशनगर येथील कबरस्तानाची जागा कमी पडत असल्याने पालिकेकडून कबरस्तानासाठी आरक्षित केलेल्या अतिरिक्त जागेत पर्यायी कबरस्तान सुरू करावे, अशी मागणी अनेकदा करूनही त्यावर कार्यवाही केली जात नसल्यानेच आत्मदहनाचा इशारा दिला आहे. - अझीम तांबोळी, मुस्लिम युवक

टॅग्स :thaneठाणे