शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

धनगरांना आरक्षण द्या, अन्यथा दिड कोटी धनगारांचा भाजपाला दे धक्का

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2018 16:26 IST

मराठ्यानंतर आता धनगर समाजाने सुध्दा आरक्षणासाठी एल्गार पुकारला आहे. धनगर समाजाला आरक्षण मिळाले नाही तर भाजपाला धक्का दिला जाईल असा इशारा समाजाच्या वतीने देण्यात आला आहे.

ठळक मुद्देम्हसवड येथे होणार धनगर समाजाचे साहित्य समेंलनसमेंलनाच्या अध्यक्षपदी डॉ. मुरहरी केळे यांची निवड

ठाणे : चार वर्षांपासून आरक्षण देण्याचे गाजर दाखवून सरकार धनगरांना गृहीत धरत आहे.मराठा समाजाच्या आरक्षणाचा तिढा जवळपास सुटत आला असताना अद्यापही धनगर मात्र वाऱ्यावर असल्यामुळे समाजामध्ये संतापाची लाट असून त्याचा फटका भाजप सरकारला आगामी निवडणुकीत बसेल. सरकारने धनगर आरक्षणाची मागणी पूर्ण केलेली नाही. गेली ६८ वर्षे आरक्षणासाठी झगडणाºया धनगरांना आरक्षण देण्याची सरकारची इच्छा नाही. भाजपाला देशातील दीड कोटी धनगरांमुळे सत्ता मिळाली आहे. पुढल्या वर्षी निवडणुका होणार आहेत. तेंव्हा, सरकारला धनगरांच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असा इशारा धनगर साहित्य परिषदेचे अध्यक्ष जयसिंग शेंडगे यांनी दिला.                  धनगर साहित्य परिषदेने जानेवारी महिन्यात आदिवासी-धनगर साहित्य संमेलन आयोजिले आहे. त्याची माहिती देण्यासाठी शुक्र वारी ते ठाण्यात आले होते. याप्रसंगी धनगर साहित्य परिषद उपाध्यक्ष संभाजीराव सूळ, धनगर प्रतिष्ठानचे अध्यक्ष दीपक कुरकुंडे, आदी यावेळी उपस्थित होते. सातारा येथील म्हसवड मध्ये तिसऱ्या आदिवासी-धनगर साहित्य संमेलन १८ ते २० जानेवारी २०१९ मध्ये होणार आहे. या संमेलनात समाजाचे आरक्षण, शिक्षण, साहित्य, राजकारण तसेच समाजातील महिलांच्या विकासाबाबत ठराव करून तो केंद्र आणि राज्य सरकारकडे पाठविण्यात येणार आहे. १८ जानेवारीला सकाळी धनगरी ढोल गजरात व मेंढ्याशेळ्यांसह साहित्य दिंडी निघेल. त्यानंतर दहा वाजता उद्घाटन सोहळा पार पडेल. दोन दिवसांच्या या संमेलनात आरक्षण, समाजाचे राजकारण आणि एकीकरण यावर चर्चासत्र होईल. याशिवाय ढोल नृत्य, पोवाडे, ओव्या, वाघ्यामुरळी फड, डोंगरी नृत्य, आदी सांस्कृतिक कार्यक्र म होतील.* धनगर साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदी डॉ. मुरहरी केळेया आदिवासी धनगर साहित्य संमेलनासाठी संमेलनाच्या अध्यक्षपदी ठाण्याचे लेखक डॉ. मुरहरी केळे यांची निवड करण्यात आली. केळे यांची सात पुस्तके प्रकाशित झाली आहेत. ते मराठवाडा भूषण पुरस्कार, कवीवर्य नारायण सुर्वे साहित्य पुरस्कारांनी सन्मानित झालेले आहेत. त्रिपुरा राज्याच्या विद्युत विभागाचे ते व्यवस्थापकीय संचालकही आहेत. 

टॅग्स :thaneठाणेMorchaमोर्चाtmcठाणे महापालिका