शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

वजे्रश्वरी मंदिरावरील दरोडयाचा तपास सीआयडी्रकडे द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2019 23:09 IST

भिवंडीतील वज्रेश्वरी देवीच्या दानपेटीतील लुटीच्या प्रकरणाचा राज्य गुन्हे अन्वेषण विभागामार्फत तपास करण्यात यावा, अशी मागणी शिवसेना उपनेते अनंत तरे यांनी गृहराज्यमंत्री दिपक केसरकर यांच्याकडे केली आहे.

ठळक मुद्देशिवसेना उपनेते अनंत तरे यांचे गृहराज्यमंत्र्यांना साकडेतीन कोटींच्या अफरातफरीची उच्चस्तरीय चौकशीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

ठाणे: भिवंडी तालुक्यातील वज्रेश्वरी देवीच्या मंदिरातील दानपेटी दरोडा टाकून लुटण्यात आली. सहा दिवस उलटूनही आरोपींचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. त्यामुळे या प्रकरणाचा तपास आता राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपविण्यात यावा, अशी मागणी श्री एकवीरा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अनंत तरे यांनी गृहराज्यमंत्री दिपक केसरकर यांच्याकडे केली आहे. तर करोडोंच्या अफरातफरीची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.वज्रेश्वरी मंदिराला बुधवारी शिवसेना उपनेते तरे यांनी भेट देऊन ही चोरीची घटना कशा पद्धतीने घडली, याबाबतची शिवसेना पदाधिकाऱ्यांसह पाहणी केली. यावेळी स्थानिक ग्रामस्थांनी वजे्रश्वरी देवस्थानामध्ये चाललेल्या भ्रष्टाचारासंदर्भात तरे यांच्याबरोबर चर्चा केली. वज्रेश्वरी देवी हे राज्यभरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. यापूर्वीही मंदिरात चोरीचे प्रकार घडले असून यापूर्वीही घडलेल्या चोरीच्या प्रकरणाचा अद्याप छडा लागलेला नाही. त्यामुळे आता पुन्हा पडलेल्या दरोडयाच्या घटनेमुळे लाखो भाविकांच्या श्रद्धेला तडा गेल्याचे तरे यावेळी म्हणाले. वजे्रश्वरी मंदिरातील सुरक्षा रक्षकाला बांधून पाच ते सहा दरोडेखोरांनी देवीच्या मुख्य गाभाºयातील दानपेटया फोडून दहा ते १२ लाख रुपये लंपास केले आहेत. परंतू, घटनेला सहा दिवस उलटूनही पोलिसांना कोणताही धागादोरा हाती लागलेला नाही. त्यामुळे ग्रामस्थ आणि भाविकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.या सर्व घटनेची इथ्यंभूत माहिती ग्रामस्थांनी तरे यांना दिल्यानंतर दरोडयाचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागामार्फत करण्यात यावा, अशी मागणी तरे यांनी गृहराज्यमंत्री केसरकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे आहे. तर देवस्थानच्या तीन कोटी रुपयांची एका विश्वस्तांनी एफडीआरमध्ये केलेल्या आफरातफरीची देखिल उच्चस्तरीय चौकशी करावी, ही मागणी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्ववारे केली आहे. यावेळी गणेशपुरी येथील नित्यानंद स्वामी देवस्थानच्या विश्वस्त अ‍ॅड. संध्या जाधव, श्री एकवीरा देवस्थान ट्रस्टचे उपाध्यक्ष मदन भोई आदी यावेळी उपस्थित होते.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीRobberyदरोडा