शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

दाेन कोटी द्या, परिवहन सेवा सुरू करू; उल्हासनगर परिवहन समितीच्या सभापतींचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 01:29 IST

उल्हासनगर महापालिका परिवहन बस सेवा ठप्प

सदानंद नाईकउल्हासनगर :  महापालिका परिवहन बस सेवा पुन्हा सुरू करण्यासाठी परिवहन समितीचे सभापती दिनेश लहरानी हे महापालिकेकडे पाठपुरावा करीत आहेत. २ कोटींची तरतूद केल्यास परिवहन बस सेवा सुरू करणे शक्य असल्याचा दावा त्यांनी केला आहे.उल्हासनगर महापालिकेवर १३ वर्षांपूर्वी शिवसेना-भाजपची सत्ता आल्यानंतर, त्यांनी धूमधडाक्यात खाजगी ठेकेदारामार्फत परिवहन बस सेवा सुरू केली. मात्र काही वर्षांतच परिवहन बससेवेला घरघर लागली. डिझेल, बसचे स्पेअर पार्ट आदींच्या किमती वाढून बस सेवा तोट्यात चालल्याचे सांगून तिकिटांची दरवाढ करण्याची मागणी ठेकेदाराने महापालिका प्रशासनाकडे केली. 

दरम्यान, बस सेवा बंद ठेवण्यात आली, तरीही तिकीट दरवाढ करण्याला महापालिकेकडून प्रतिसाद मिळाला नाही. अखेर नागरिकांच्या सोयीसाठी सुरू केलेली परिवहन बस सेवा अवघ्या ४ वर्षांत बंद पडली. तेव्हापासून परिवहन बस सेवा सुरू करण्यासाठी कोट्यवधी रुपयांची तरतूद दरवर्षी केली जाते. महापालिका प्रशासन व सत्ताधारी-विरोधी पक्षांच्या भूमिकेमुळे अद्याप परिवहन बस सेवा सुरू झाली नसल्याची टीका सर्व स्तरातून होत आहे. दरवर्षी अंदाजपत्रकात परिवहन बस सेवा सुरू करण्यासाठी निधीची तरतूद केली जाते. मात्र परिवहन बस सेवेला मुहूर्त मिळत नाही. दरम्यान, दुसरीकडे परिवहन समितीवर लाखोंची उधळपट्टी दरवर्षी करण्यात येत असल्याची टीका होत आहे. 

गेल्या वर्षी तब्बल ७ वेळा निविदा काढूनही परिवहन बस सेवा सुरू करण्याला ठेकेदार मिळाला नाही, अशी माहिती वाहन विभागाचे व्यवस्थापक यशवंत सगळे यांनी दिली. परिवहन बस सेवा आपल्या सभापती कालावधीत सुरू होण्यासाठी दिनेश लहरानी पाठपुरावा करीत असून परिवहन समितीमधील लिपिकाला विभागात संपूर्ण दिवस काम नसल्याचे कारण पुढे करून दुसऱ्या विभागात काम करण्यास बजावले आहे.

मनात असेल तर सेवा सुरू हाेईल - लहरानीमहापालिका प्रशासन व नेत्यांच्या मनात असेल तर, परिवहन बस सेवा सुरू होऊ शकते, असे मत परिवहन समिती सभापती दिनेश लहरानी यांनी व्यक्त केले. पालिकेने २ कोटींची तरतूद करून संपूर्ण अधिकार दिल्यास, या निधीतून परिवहन बस सेवा सुरू करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.

 

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर