शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

आधी रक्त द्या, मगच मृतदेह न्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2019 00:09 IST

कळव्याच्या रुग्णालयातील प्रकार : डीनवर शिवसेनेची आगपाखड, अपयश झाकण्यासाठी सत्ताधाऱ्यांची धडपड

ठाणे : कळवा रुग्णालयाची इमारती धोकादायक झाली असून ती पाच वर्षांत पडू शकते, अशी धक्कादायक कबुली रुग्णालयाच्या डीन संध्या खडसे यांनी दिल्यानंतर त्याचे पडसाद महासभेतही उमटले. त्यांच्या वक्तव्याचे क्लिपिंगचे भाजपचे गटनेते नारायण पवार यांनी सभागृहात सादर केले. खडसे यांनी केलेले आरोप खरे आहेत का, असा सवाल करून त्यांनी प्रशासनाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. यावेळी राष्टÑवादीचे सदस्यही खडसे यांच्या बाजूने उभे राहिले. आयुक्तांची परवानगी न घेता प्रशासनाच्या विरोधात बोलणे योग्य आहे का, असा सवाल शिवसेनेने करून त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाईची मागणी केली. आधी रक्त द्या मगच मृतदेह न्या, असा प्रकार येथे सुरू असल्याचे सांगून भाजपने शिवसेनेला चांगलेच अडचणीत आणले.

कळवा रुग्णालयाच्या असुविधांबाबत पाढा वाचल्यानंतर त्याची चर्चा लागलीच महासभेतही झाली. महासभा सुरू होताच नारायण पवार यांनी खडसे यांनी केलेल्या आरोपांवर प्रशासनाचे उत्तर मागितले. तसेच सत्ताधाऱ्यांवरही त्यांनी आक्षेप घेतले. त्यानुसार याचे पुरावे सादर करण्याची मागणी सत्ताधाºयांनी केल्यानंतर पवार यांनी खडसे यांची क्लिप सभागृहाला ऐकवली. त्यानंतर सर्वच लोकप्रतिनिधी प्रशासनावर घसरले. प्रशासनाच्या कामकाजाबाबत आक्षेप घेतल्याने त्यांच्यावर काय कारवाई होणार असा सवाल पवार यांनी केला. तर विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील यांनी खडसे यांचे म्हणणे खरे असून रुग्णालयाची अवस्था दयनीय असल्याचे स्पष्ट केले.शिवसेना सदस्यांचा तिळपापडअधिकारीच अशा पद्धतीने प्रशासनावरच आक्षेप घेत असतील तर कितपत योग्य आहे, असा सवाल सभागृह नेते नरेश म्हस्के यांनी केला. तर डीन यांनी असे विधान करतांना आयुक्तांची परवानगी घेतली होती का? असा सवाल माजी महापौर अशोक वैती यांनी केला. हाच मुद्दा उचलून सत्ताधाºयांनी खडसे यांना धारेवर धरले.त्यांनी या असुविधांबाबत दोन वर्षात किती वेळा पाठपुरावा केला, ३६५ दिवसापैकी त्या कितीदिवस रुग्णालयात हजर होत्या, त्यामुळे अशा प्रकारचे वक्तव्य करणे अयोग्य असून त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई व्हावी अशी मागणी विकास रेपाळे यांनी केली. अखेर उपायुक्त संदीप माळवी यांनी त्यांनी आयुक्तांची परवानगी घेतली नसल्याचे स्पष्ट केले.मात्र,या उत्तरावर लोकप्रतिनिधींचे समाधान झाले नाही. विरोधी पक्ष हा खडसे यांच्या बचावासाठी बोलतांना दिसला, तर सत्ताधाºयांनी खडसे यांच्या भूमिकेबाबतच संशय व्यक्त केला. खडसे यांच्याकडे कळवा रुग्णालयाचा चार्ज तीन वर्षे असून त्यांनी रुग्णालयासाठी काय काय केले.दरवर्षी एवढा निधी देऊनही कामे होत नसतील तर बिले अशीच काढली जातात का? असा सवाल महापौर मीनाक्षी शिंदे यांनी केला. त्यामुळे हे त्यांचे अपयश असून ते दुसºयांवर त्याचे खापर फोडण्याचे काम त्या इतरांवर करीत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. परंतु, यावर प्रशासनानो केवळ सारवासारवी केली.या निमित्ताने कळवा रुग्णालयातील आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यूझाला होता. त्याचे बिल 8000 झाले होते. त्यामुळे ते भरण्याच्या सुचना रुग्णालय प्रशासनाने संबधींतांना केल्या होत्या. परंतु, घरची परिस्थिती चांगली नसल्याने त्यांनी चार हजार भरण्याची तयारी दर्शविली. यावर येथील डॉक्टरांनी मग तुम्ही आधी रक्तदान करा, मगच मृतदेह घेऊन जा असा अजब सल्ला दिल्याची माहिती भाजपचे नगरसेवक भरत चव्हाण यांनी उघड केली.संपूर्ण इमारतीला दुरुस्तीची गरजया रुग्णालयात रोज हजारो रुग्ण उपचारासाठी येत असतात. परंतु, सध्या त्याच्या इमारतीची अवस्था पहिली तर अनेक ठिकाणी भिंतींना भेगा पडल्या आहेत. प्रवेशद्वारावरील छताचे काही भाग पडलेले असून लोखंडी शिगा दिसत आहेत. भिंतीवर गवत उगवले आहे, औषधे, इंजेक्शन आदींचे संपलेले साहित्य अस्तवस्त पडले असून स्लॅबही धोकादायक स्थितीत आले आहेत. त्यामुळे इमारतीची दुरुस्ती तत्काळ होणे गरजेचे आहे.

टॅग्स :kalwaकळवा