शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

300 स्क्वेअर फुटाचे घर द्या अन्यथा निवडणुकीवर बहिष्कार; ठाणे झोपडपट्टी धारकांचा निर्धार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2019 15:05 IST

झोपडपट्टी पुनर्वसन योजनेंतर्गत मुंबई हद्दीतील रहिवाशांना 300 स्क्वेअर फुटाचे घर दिले जात आहे. मात्र ठाण्यातील झोपडीधारकाला 269 स्क्वेअर फुटाचे घर दिले जात आहे.

ठाणे - झोपडपट्टी पुनर्वसन योजनेंतर्गत मुंबई हद्दीतील रहिवाशांना 300 स्क्वेअर फुटाचे घर दिले जात आहे. मात्र ठाण्यातील झोपडीधारकाला 269 स्क्वेअर फुटाचे घर दिले जात आहे. हा दुजाभाव असून ठाणेकरांनाही 300 स्क्वेअर फुटाचे घर मिळावे अन्यथा ठाण्यातील 210 झोपड्यांमधील नागरिक येत्या विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार घालतील असा इशारा ठाणे शहर झोपडपट्टी रहिवाशी संघटनेने आज पत्रकार परिषदेत दिला. सोमवारी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी ठाणे जिल्हधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. 

पत्रकार परिषदेला ठाणे शहर झोपडपट्टी रहिवाशी संघटनेचे अध्यक्ष राकेश मोदी, आनंद कांबळे, महादेव पवार, विजयप्रताप सिंह, इमॅन्युअल नाडार, प्रमोद पांडे, सुरेश खेराडे, सितारम नायडू, बाबा राऊत, उमा भालेराव आदी मान्यवर उपस्थित होते. ठाणे महानगरपालिका हद्दीत 2011 च्या जनगणनेनुसार शासकीय, निमशासकीय, खासगी तसेच इतर विविध जमिनींवर एकूण 210 झोपडपट्ट्या आहेत. या झोपडपट्ट्यांमध्ये सुमारे साडेनऊ लाखांच्या घरात नागरिक वास्तव्य करित आहेत. झोपडीमध्ये राहणाऱ्या नागरिकांचे राहणीमान सुधारावे यासाठी शासनाने झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाची स्थापना केली. मात्र आता शासन मुंबईसाठी एक न्याय तर ठाण्यासाठी एक न्याय असा दुजाभाव करत असल्याची टीका राकेश मोदी यांनी केली.  

मुंबई मध्येही पूर्वी झोपडपट्टी पुनर्वसन योजनेंतर्गत 269 स्क्वेअर फुटाचे घर दिले जात होते. मात्र मे 2018 रोजी मुंबई मध्ये राहणाऱ्या झोपडट्टीधारकांना 300 स्क्वेअर फुटाचे घर देण्याचा निर्णय झाला. ठाण्यातील झोपडीधारकांना मात्र 269 स्क्वेअर फुटाचे घर देण्याचा निर्णय कायम ठेवला गेला. या निर्णयामुळे ठाणेकर झोपडीधारकांवर अन्याय झालेला आहे. ठाणे शहरालाच या योजनेतून का डावलण्यात आले असा संतप्त सवाल यावेळी पत्रकार परिषदेत करण्यात आला. शासनाने घेतलेला हा निर्णय म्हणजे ठाण्यातील झोपडीधारकांना दिलेली ही सापत्नक वागणूकच आहे.  

एसआरए योजनेसाठी मुंबईला मिळणारा एफएसआय व मुंबईला लागून असलेल्या ठाण्याला मिळणारा एफएसआय यामध्ये 31 स्क्वे.फुटाचा फरक, एखादा झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प राबविताना मुंबईला 51 टक्के झोपडपट्टीधारकांची सहमती व तोच प्रकल्प ठाण्यामध्ये राबवायचा झाल्यास त्याकरीता 70 टक्के झोपडीधारकांची संमती, मुंबईसाठी चटईक्षेत्र निर्देशांक 4.00 तर ठाण्यासाठी 3.00 चटईक्षेत्र आहे. योजना एकच आणि प्राधिकारण पण एकच मात्र निकष वेगवेगळे कसे असा सवाल पत्रकार परिषदेत उपस्थित करण्यात आला.  

झोपडपट्टी पुनर्वसन योजनेंतर्गत मुंबईला लागू असलेले नियम ठाण्यासाठी लागू करा अशी आमची प्रमुख मागणी आहे. ही मागणी मान्य न झाल्यास या झोपडपट्ट्यांमधील 25 हजार नागरिकांचा धडक मोर्चा काढण्यात येऊन येत्या विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा पत्रकार परिषदेत देण्यात आला. 

टॅग्स :thaneठाणेElectionनिवडणूक