शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

मुलीवर अत्याचार केले, बंधूंना ३ वर्षांनी अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 00:09 IST

लग्नाचे अमिष दाखवून एका १२ वर्षीय मुलीचे भिवंडीतील कामतघर भागातून तीन वर्षांपूर्वी अपहरण केले होते. जबरदस्तीने विवाह करून तिच्यावर लैंगिक अत्याचार करणाºया अशोक यादव

ठाणे : लग्नाचे अमिष दाखवून एका १२ वर्षीय मुलीचे भिवंडीतील कामतघर भागातून तीन वर्षांपूर्वी अपहरण केले होते. जबरदस्तीने विवाह करून तिच्यावर लैंगिक अत्याचार करणा-या अशोक यादव (२८) आणि त्याला यात मदत करणारा त्याचा मोठा भाऊ विरेंद्र (३०) या दोघांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाने रविवारी भिवंडीतून अटक करून पिडीतेची त्यांच्या ताब्यातून सुटका केली आहे.कामतघर भागातून एका १२ वर्षीय मुलीचे तिच्याच घरासमोर राहणाºया अशोक आणि विरेंद्र या दोन भावांनी तीन वर्षांपूर्वी अपहरण केले होते. याबाबतचा गुन्हा भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात १५ जून २०१४ रोजी तिच्या आईने दाखल केला होता. याप्रकरणी या मुलीचे अपहरण करणाºया अशोक आणि विरेंद्र या दोघांची माहिती पोलीस उपनिरीक्षक कल्याणी पाटील यांना खबºयाने दिली. तिच्या आधारे पथकाने भिवंडीतील कामतघर परिसरातील फेणागाव झोपडपट्टीतून अपहरण झालेल्या (सध्या १५ वय) पिडीत मुलीचा १७ फेब्रुवारी २०१८ रोजी शोध घेतला. तिच्याकडे केलेल्या चौकशीत तीन वर्षांपूर्वी विरेंद्र आणि अशोकने अपहरण करून तिला नेपाळ आणि भारताच्या सीमेवर असलेल्या कपिलवास्तू जिल्ह्यातील पटपर गावात नेऊन अशोकने तिच्याशी जबरदस्तीने हिंदू विवाह पद्धतीने विवाह केला. नंतर तिच्यावर सतत लैंगिक अत्याचार केले. यातून तिने दोन मुलींना जन्म दिला. त्यातील एक तीन वर्षांची तर दुसरी दोन महिन्यांची आहे. आपल्यावर कारवाई होणार नाही, या अविर्भावात असलेल्या यादव बंधूंनी तिला तिच्या मुलीसह पुन्हा भिवंडीत (जिल्हा ठाणे) आणले. असता ते पोलीसांच्या हाती लागले.