शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
3
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
7
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
8
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
9
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
10
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
11
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
12
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
13
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
14
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
15
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
16
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
17
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
18
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
19
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
20
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

कन्या शाळेचा भूखंड बिल्डरच्या घशात, शिक्षणाचे बाजारीकरण, पटसंख्येअभावी जिल्ह्यातील दहा शाळा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2017 06:02 IST

गरीब मुलींसाठी ठाणे शहरात जिल्हा परिषदेची एक ब्रिटीशकालीन कन्या शाळा आहे. मात्र, तिची इमारत तोडण्याचा निर्णय जिल्हा परिषद प्रशासनाने घेतला आहे.

ठाणे : गरीब मुलींसाठी ठाणे शहरात जिल्हा परिषदेची एक ब्रिटीशकालीन कन्या शाळा आहे. मात्र, तिची इमारत तोडण्याचा निर्णय जिल्हा परिषद प्रशासनाने घेतला आहे. इमारतीच्या रिकाम्या जागेचे काय करणार याचे उत्तर मात्र अनुत्तरीत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार शहराच्या मध्यवर्ती भागात असलेली ही कोट्यवधींची जागा बिल्डरच्या घशात घालण्याच्या हालचाली काही अधिकाºयांनी राजकीय नेत्यांच्या मदतीने सुरू केल्याचे समजते. तेथील विद्यार्थीनींसह बी.जे. हायस्कूलचे विद्यार्थ्यांना अन्य शाळेत स्थलांतरीत करण्यात येणार आहे.जि.प.तील यशवंतराव चव्हाण सभागृहात मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भीमनवार यांनी मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत जिपच्या विविध योजनांच्या प्रगतीचा आढावा घेतला. यावेळी ग्रामीण भागातील सुमारे एक हजार ३६३ शाळा शंभर टक्के डिजिटल केल्याचा दावा करून ९५० शाळा प्रगत केल्याचे त्यांनी नमूद केले. यास अनुसरून शहरात असलेली ब्रिटीशकालीन जिल्हा परिषदेची कन्या शाळा डिजिटल का झाली नाही, या विषयी विचारले असता ही इमारत तोडणार असल्याचे भीमनवार यांच्यासह शिक्षणाधिकारी मीना शेंडकर यांनी सांगितले. शाळा तोडल्यानंतर संबंधीत भूखंडाचा वापर कशासाठी करणार, यावर मात्र समाधानकारक उत्तर देता आले नाही. जिल्हा परिषदेत येणाºया लोकप्रतिनिधींची बॉडी आल्यावर त्याचा काय तो विचार करणार असल्याचे शेंडकर म्हणाल्या. चांगल्या कामांमुळे राज्यपालानी पुुरस्कृत केलेल्या शेंडकर यांना जिल्हा परिषदेची ही शाळा ठाणे महापालिकेत वर्ग केल्याचा प्रश्न विचारला असता त्यांनी ‘आम्ही तर काही प्रस्ताव दिलेला नाही ’ असे सांगून त्यावर अधिक बोलणे टाळले. शाळेच्या या भूखंडाचा वापर कशासाठी करणार... मुलांना अन्य शाळेत स्थलांतरीत करणार काय... यावरून विद्यार्थी महापालिकेसह अन्य शाळांमध्ये समाविष्ट होण्याची भनक शिक्षणाधिकाºयांना नसल्याचे निदर्शनात आले.एकीकडे महिला व मुलींच्या सबलीकरणसाठी शासन कोट्यवधी रूपये खर्च करीत आहे. तर दुसरीकडे गरीब, दीन दलितांच्या मुली शिक्षण घेत असलेली कन्या शाळा तोडून तिचा भूखंड जिल्हा परिषद मोकळा करण्याच्या प्रयत्नात असल्याचे त्यांच्या बोलण्यावरून उघड झाले. ‘लेक शिकवा’ हा शासनाचा उपक्रम राबवणारी जिल्हा परिषद ग्रामीण भागाप्रमाणे कन्या शाळेला डिजिटल न करता तीला आगामी सहा महिन्यात तोडण्याचे नियोजन आहे. तसेच विद्यार्थी संख्ये अभावी जिल्ह्यातील दहा शाळा झाल्या बंद झाल्याचे यावेळी सांगण्यात आले.यामुळे हक्काच्या शाळेपासून वंचित होणाºया ठाणे शहरातील सावित्रीच्या लेकींना शहरातील महागड्या शाळेत शिक्षण घेणे शक्य होणार नसल्याचे आजच्या शिक्षणाच्या बाजारीकरणावरून उघड होत आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची पटसंख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याचा दावा करणाºया जिल्हा परिषदेच्या सुमारे दहा शाळा मागील वर्षात बंद पडल्याचे या पत्रकार परिषदेत उघड झाले. विद्यार्थी संख्येअभावी जवळच्या तीन किलोमीटरच्या शाळेत या विद्यार्थ्यांना समाविष्ट करण्यात आले.प्रगतीपथावर असलेल्या कामांची माहितीशासनाच्या धोरणानुसार दरवर्षी हा कार्यक्रम राबवताना विद्यार्थ्याच्या वाहन व्यवस्थेचीदेखील काळजी घेतली जात असल्याचे भीमनवार यांनी सांगितले. जिल्ह्यात ९५ हजार शौचालये बांधून जिल्हा शंभर टक्के हागणदरीमुक्त होत आहे, नादुरूस्ती शौचालयांची दुरुस्ती, ६५ ग्रामपंचायतींच्या विकास कामांचे आराखडे, गावातील शाळांच्या वीजपुरवठ्याचे बील भरण्यासह साफसफाई व शौचालय देखभालीची जबाबदारी संबंधीत ग्रामपंचायतींवर सोपवण्यात आली. घरकूल बांधणीत जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर असून बहुतांशी घरकूल बांधून पूर्ण झाले. विविध करणांनी रखडलेल्या सुमारे १८८ पाणीपुरवठा योजनांचे कामे पूर्ण करण्यात आले. सॅम, मॅमचे बालके कुपोषणातून मुक्त करण्याची प्रगती आदी विषयांची माहिती दिली. 

टॅग्स :Schoolशाळा