शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

दिव्यात राहणा-या प्रेयसीची हत्या करून प्रियकराची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2017 06:02 IST

अंबरनाथ : दिव्यात राहणा-या तरुणीची हत्या करून प्रियकराने आत्महत्या केल्याचा खळबळजनक प्रकार अंबरनाथ कानसई गावात घडला.

अंबरनाथ : दिव्यात राहणा-या तरुणीची हत्या करून प्रियकराने आत्महत्या केल्याचा खळबळजनक प्रकार अंबरनाथ कानसई गावात घडला. या मुलीची हत्या दोन ते तीन दिवस आधीच केल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. हत्येनंतर प्रियकराने मुलीच्या नातेवाइकांना फोन करून या घटनेची कल्पना दिली.वर्धा जिल्ह्यातील पिंपरी मेघे येथील आचल महल्ले ही ठाण्यातील एका खासगी कंपनीत इंजिनीअर म्हणून कामाला होती. आचल दिव्यात आई आणि भावासह भाड्याच्या घरात राहात होती. तिचा प्रियकर नेत्राम वर्मा हा अंबरनाथमध्ये कानसई गावात एक खोली भाड्याने घेऊन राहात होता. महिन्याभरापासून आचल तेथे येत असे. तिची आई -भाऊ गावाला गेल्यावर आचलने आपण रुग्णालयात जात असल्याचे शेजाºयांना सांगितले आणि ती घराबाहेर पडली.त्यानंतर ती प्रियकर नेत्रामसोबत अंबरनाथच्या घरात होती. नेत्राम याने तिची गळा आवळून हत्या केली. तसेच दोन दिवस मृतदेह घरातच ठेवला. दुर्गंधी पसरू लागल्यावर, त्याने आचलच्या मोबाइलवरून तिच्या मावशीला फोन करून हत्येची माहिती दिली. तसेच मावशीला स्वत:च्या घरचा पत्तादेखील एसएमएसद्वारे पाठविला.मावशीला हा निरोप मिळताच, आचलच्या नातेवाइकांनी दिव्यातील गाजेखान पठाण याला संपर्क साधत, आचलचा शोध घेण्यास सांगितले. मंगळवारी सकाळी पठाण यांनी कानसई गावात तो पत्ता शोधला. पोलिसांच्या मदतीने घर उघडल्यावर आचलचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत, तर नेत्रामचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत सापडला.